गिरजेप्रती शंकर उपदेशिले – संत सेना महाराज अभंग – १२५
गिरजेप्रती शंकर उपदेशिले – संत सेना महाराज अभंग – १२५
गिरजेप्रती शंकर उपदेशिले।
तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥१॥
ऐसें निज गुज साराचेंही सार।
उघडे दाविलें साचार ज्ञानदेवें ॥२॥
हे सुखाचें सुख साधन।
भक्तिज्ञानाचें अंजन ।
हेचि परब्रह्म जीवन ॥३॥
हेंचि मुख निज राममंत्र सार ।
सुलभ साकार सेना ध्याये निरंतर ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
गिरजेप्रती शंकर उपदेशिले – संत सेना महाराज अभंग – १२५