वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी – संत सेना महाराज अभंग – १२२

वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी – संत सेना महाराज अभंग – १२२

वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी ।
तयाच्या सुकृतासी नाहीं पार ॥१॥
पूर्वीचे सुकृत फळासि आलें।
वाचें उच्चारिलें ज्ञानदेवा ॥२॥
या अलंकापुरीं आला जन्मांसि ।
पूर्वज तयासी मानिती धन्य ॥३॥
सेना म्हणे त्यानें उद्धरिलें कुळ।
पूर्वज सकळ आशिर्वाद देती॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी – संत सेना महाराज अभंग – १२२