Skip to content
धन्य महाराज अलंकापुरवासी – संत सेना महाराज अभंग – १२१
धन्य महाराज अलंकापुरवासी।
साष्टांग तयासी नमन माझें ॥ १॥
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें ।
उद्धरती तयाचें सकळ कुळे ॥२॥
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा ।
तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥
सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें।
ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
धन्य महाराज अलंकापुरवासी – संत सेना महाराज अभंग – १२१