नाम हें अमृत भक्तासी – संत सेना महाराज अभंग – १२०

नाम हें अमृत भक्तासी – संत सेना महाराज अभंग – १२०

नाम हें अमृत भक्तासी दिधलें ।
ठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥१॥
प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी।
मार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥
कृतयुगामाजी वरिष्ठ जाणता।
नाम तो घेतां नारद मुनि ॥३॥
कलियुगामाजी न घडे साधन।
जातील बुडोन महा डोहीं ॥४॥
रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ।
स्मरा वेळोवेळां सेना म्हणे ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाम हें अमृत भक्तासी – संत सेना महाराज अभंग – १२०