धन्य महाराज पुंडलीक – संत सेना महाराज अभंग – १२संत सेना महाराज धन्य महाराज पुंडलीक – संत सेना महाराज अभंग – १२ धन्य महाराज पुंडलीक मुनी। वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी ॥१॥ केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ॥२॥ आली चंद्रभागा गर्जना करीत । तुझिया भेटीलागी उतावीळ धांवत ॥ ३॥ जोडोनिया पाणी सेना करी विनवणी। म्हणे धन्य पुंडलीका माथा ठेविला चरणीं ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्य महाराज पुंडलीक – संत सेना महाराज अभंग – १२