धन्य धन्य निवृत्तिराया – संत सेना महाराज अभंग – ११६

धन्य धन्य निवृत्तिराया – संत सेना महाराज अभंग – ११६

धन्य धन्य निवृत्तिराया ।
शरण आले तुझियां पायां॥१॥
नको पाहूं दुसरें आतां।
गुण दोषाची वार्ता ॥२॥
नाहीं माझा अधिकार ।
यातीहीन मी पामर ॥३॥
अपराधाचा केलों।
सेना म्हणे काय बोलो ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्य धन्य निवृत्तिराया – संत सेना महाराज अभंग – ११६