Skip to content
निवृत्ति निवृत्ति – संत सेना महाराज अभंग – ११४
निवृत्ति निवृत्ति ।
म्हणतां पाप नुरेची ॥१॥
जप करितां त्रिअक्षरीं ।
मुक्ती लोळे चरणावरी ॥२॥
ध्यान धरितां निवृत्ती।
आनंदमय राहे वृत्ती ॥३॥
सेना म्हणे चित्तीं धरा।
स्मरता चुके येरझार ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
निवृत्ति निवृत्ति – संत सेना महाराज अभंग – ११४