Skip to content
स्वहिताकारणें सांगतसे तुज – संत सेना महाराज अभंग – ११०
स्वहिताकारणें सांगतसे तुज ।
अंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥
करा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥
कृपा नारायणे केली मजवरी ।
तुम्हालागीं हरी विसंबेना ॥३॥
सेना सांगूनियां जातो वैकुंठासी।
तिथि ते द्वादशी श्रावणमास ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
स्वहिताकारणें सांगतसे तुज – संत सेना महाराज अभंग – ११०