देहूडे ठाण सुकुमार – संत सेना महाराज अभंग – ११संत सेना महाराज देहूडे ठाण सुकुमार – संत सेना महाराज अभंग – ११ देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥१॥ मनीं वेध लागला त्या गोपाळाचा। जो जिवलग गोपगोपिकेचा ॥२॥ जी सावळी सगुण घनानंद मूर्ति। पाहतां वेधली माझी चित्तवृत्ती ॥३॥ जो उभाचि राहिला व्यापुनी सकळ। भेटिलागींसेना व्हावी उतावळी ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. देहूडे ठाण सुकुमार – संत सेना महाराज अभंग – ११