ही माझी मिरासी – संत सेना महाराज अभंग – १०९संत सेना महाराज ही माझी मिरासी – संत सेना महाराज अभंग – १०९ ही माझी मिरासी। पांडुरंग पायापासी ॥१॥ करीन आपुलें जतन । वागवितों अभिमान ॥२॥ जुनाट जुगादीचें । वडिलें साधियेलें साचें ॥३॥ सेना म्हणे कमळापती। पुरातन हे माझी वृत्ती ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. ही माझी मिरासी – संत सेना महाराज अभंग – १०९