Skip to content
आम्ही वारीक वारीक – संत सेना महाराज अभंग – १०६
आम्ही वारीक वारीक।
करूं हजामत बारीक ॥ १॥
विवेक दर्पण आयना दाऊं।
वैराग्य चिमटा हालऊं ॥२॥
उदक शांती डोई घोळू ।
अहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥
भावार्थाच्या बगला झाडूं ।
काम क्रोध नखें काढू ॥४॥
चौवर्णा देऊनी हात ।
सेना राहिला निवांत ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्ही वारीक वारीक – संत सेना महाराज अभंग – १०६