म्हणवितो विठोबाचा दास – संत सेना महाराज अभंग – १०५
म्हणवितो विठोबाचा दास – संत सेना महाराज अभंग – १०५
म्हणवितो विठोबाचा दास।
शरण जाईन संतास ॥१॥
सदा सुकाळ प्रेमाचा।
नासे मळ दुष्ट बुद्धीचा ॥२॥
ऐकत हरिचें कीर्तन ।
अभक्ति भक्ति लागे ज्ञान ॥३॥
उभा राहे कीर्तनांत ।
हर्षे डोले पंढरीनाथ ॥४॥
सेना म्हणे हें सुख ।
नाहीं ब्रह्मयासी देख ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
म्हणवितो विठोबाचा दास – संत सेना महाराज अभंग – १०५