त्रैलोक्य पाळतां । नाहीं उबग तुमच्या चित्ता ॥ १ ॥ तया आमुची चिंता। नसे काय रुक्मिणीकांता ॥२॥ दर्दर राहे पाषाणांत। तया चारा कोण देत ॥३॥ पक्षी अजगर । तया पाळी सर्वेश्वर ॥४॥ सेना म्हणे पाळुनी भार। राहिलों निर्धार उगाची ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.