Skip to content
धन्य धन्य दिन – संत सेना महाराज अभंग – १००
धन्य धन्य दिन।
तुमचे झाले दरुषण ॥१॥
आजि भाग्य उदया आलें।
तुमचें पाऊल देखिलें ॥२॥
पूर्व पुण्य फळा आलें।
माझें माहेर भेटलें ॥३॥
सेना म्हणे झाला।
धन्य दिवस आजि भला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
धन्य धन्य दिन – संत सेना महाराज अभंग – १००