विटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग

विटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग

विटेवरी उभा नीट कटावरी कर ।
वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥
श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा ।
तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥
कंठी शोभे एकावळी ।
तोडर गर्जे भूमंडळी।
भक्तजनाची माउली तो गे माये ॥३॥
सोनसळा पीतांबर।
ब्रीद वागवी मनोहर ।
सेना वंदि निरंतर तो गे माय ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग

View Comments

  • या अभंगात श्री संत सेना महाराज सांगतात पंढरी परमात्मा हा विटेवरी उभा नीट आहे , नीट म्हणजे संतांच्या भाषेत सांगायचं तर ,समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, याप्रमाणे सम आहे, व आपल्या भक्तांचे तो आतुरतेने वाट पाहत आहे, पांडुरंगाच्या डोक्यावरती श्री मुकुट रत्नांची माळ व कानी कुंडल हे खूप शोभून दिसत आहे, आणि सर्व भक्तांची एक माऊलीच आहे, आई आहे असा पितांबर घातलेला तो परमात्मा त्याला सेना महाराज म्हणतात सदैव मी त्याला वंदन करीत राहील, त्या परमात्म्याचा सेवक आहे, ?राम कृष्ण हरी?