शरण जाऊं कोणासी – संत सेना महाराज अभंग – १०

शरण जाऊं कोणासी – संत सेना महाराज अभंग – १०

शरण जाऊं कोणासी ।
तुजविण ऋषीकेशी ॥१॥
पाहतां नाहीं त्रिभुवनी।
दुजा तुज ऐसा कोणी ॥२॥
पाहिला शोधुनी ।
वेदशास्त्र पुराणीं ॥३॥
सेना म्हणे पंढरीराया।
शरण सांभाळी सखया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शरण जाऊं कोणासी – संत सेना महाराज अभंग – १०