मुखीं नाम नाहीं – संत सेना महाराज अभंग – २५

मुखीं नाम नाहीं – संत सेना महाराज अभंग – २५

मुखीं नाम नाहीं।
त्याची संगती नको पाही ॥१॥
ऐसियाचे मुखीं माउली।
वार घालितां विसरली ॥२॥
जया नावडे संतसंगती।
अधम जाणावा निश्चिती ॥३॥
नाम घेतां लाज वाटे।
रंभे निर्लज्ज भेटें ॥४॥
जातां हरिकीर्तना।
नावडे ज्याच्या मना ॥५ ॥
सेना म्हणे त्यास।
कुलासुद्धां नर्कवास ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मुखीं नाम नाहीं – संत सेना महाराज अभंग – २५