रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें

रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें

लक्षणे – १ ते ३


प्रथम लिहीणें दुसरें वाचणें । तिसरें सांगणें अर्थातर ॥१॥
आशंकानिवृत्ति ऐसी चौथी स्थिती । पांचवी प्रचीती अनुभवें ॥२॥
साहावें तें गाणें सातवें नाचणें । ताळी वाजवणें आठवें तें ॥३॥
नवां अर्थभेद दहावा प्रबंध । आक्रावा प्रबोध प्रचीतीसीं ॥४॥
बारावें वैराग्य तेरावा विवेक । चौदावा तो लोक राजी राखे ॥५॥
पंध्रावें लक्षण तें राजकारण । सोळावें तें जाण अव्यग्रता ॥६॥
प्रसंग जाणावा हा गुण सत्रावा । काल समजावा सर्वां ठाईं ॥७॥
आठ्रावें लक्षण वृत्ती उदासीन । लोलंगता जाण तेथें नाहीं ॥८॥
येकोणीसावें चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचें त्याचें ॥९॥
विसावें लक्षण रामउपासना । वेध लावी जना भक्तिरंगें ॥१०॥
भक्तिरंगें देव देवाल्यें शिखरें । वोटे मनोहरें वृंदावनें ॥११॥
बावी पोखरणी रम्य सरोवरें । मंडप विवरें धर्मशाळा ॥१२॥
धर्मशाळा नाना ना दीपमाळा । तेथें रविकुळा वाखाणावें ॥१३॥
तरूवर पुष्पवाटिका जीवनें । पावनें भुवनें होमशाळा ॥१४॥
उदंड ब्राह्मण ब्रह्मसंतर्पण । पुराणश्रवण आध्यात्मीक ॥१५॥
जन्मासी येउनी अध्यात्म साधावें । नित्य विवरावें सारासार ॥१६॥
असार संसार येणें साधे सार । पाविजेतो पार भवसिंधु ॥१७॥
आयुष्य हें थोडें फार आटाआटी । कठीण सेवटीं वृद्धपण ॥१८॥
येकलेंची यावें येंकलेंची जावें । मध्येंची स्वभावें मायाजाळ ॥१९॥
मायाजाळ तुटे तरी देव भेटे । दास म्हणें खोटें भक्तीहीण ॥२०॥


संसार करावा जीवें सर्व भावें । तुज विसंभावें अंतरंगा ॥१॥
ऐसें मज नको करूं रे राघवा । माझा सावाधावा तूंचि येक ॥२॥
स्वयें महापापी पापची वर्तावें । सज्जना निंदावें सावकास ॥३॥
दोष राहाटणें । या पोटाकारणें । सज्जनाचें उणें काढूं पाहे ॥४॥
कर्म करवेना धारणा धरवेना । भक्ती उपासना अंतरली ॥५॥
विषयांचें ध्यान लागलें अंतरीं । दंभ लोकाचारी खटाटोप ॥६॥
निष्ठा भ्रष्ट जाली स्नानसंध्या गेली । दुराशा लागली कांचनाची ॥७॥
देव धर्म घडे ते ठाईं वेंचीना । पुण्य तें सांचीना कदाकाळीं ॥८॥
स्वधर्म बुडाला परिग्रहे नेला । वेवादीं दादुला भंडरूपी ॥९॥
अशक्त दुर्जन पाहे परन्यून । अभिलाषीं मन गुंतलेंसें ॥१०॥
कीर्तनीं बैसला पाहे परनारी । परद्रव्यापरी मन गेलें ॥११॥
न दिसे अंतरीं देवाची आवडी । पापरूपी जोडी पापरासी ॥१२॥
काम क्रोध दंभ लोभ मोहो माया । कीर्तनाच्या ठाया समागम ॥१३॥
घातला उदकीं न भिजे पाषाण । हृदय कठीण तयापरी ॥१४॥
स्वये नेणे हित श्रवणीं दुश्चित । चंचळ हे चित्त स्थिर नाहीं ॥१५॥
तुझीये रंगणीं राहे अभीमान । नाहीं समाधान दास म्हणे ॥१६॥


देहे हें असार कृमींचें कोठार । परी येणें सार पाविजेतें ॥१॥
लागवेग करी लागवेग करी । स्वहित विचारी आलया रे ॥२॥
देहेसंगें घडे संसारयातना । परी हा भजना मूळ देहो ॥३॥
देहोचेनि संगें हिंपुटि होईजे । विचारें पाविजे मोक्षपद ॥४॥
जन्मास कारण मूळ देहबुद्धी । परी ज्ञानसिद्धी देहसंगे ॥५॥
देहसंगें उठे स्वयातीमत्सर । आणी पैलपार देहेसंगें ॥६॥
देहेसंगे जीव होतसे चांडाळ । आणी पुण्यसीळ देहेसंगे ॥७॥
देहेसंगे प्राणी अधोगती जाती । आणी धन्य होती देहेसंगे ॥८॥
देहेसंगें बद्ध देहेसंगे मुक्त । देहेसंगे भक्त होत असे ॥९॥
देहेसंगें देव आणी भावाभाव । पाप पुण्य सर्व देहेसंगें ॥१०॥
देहेसंगें वृत्ती होतसे निवृत्ती । गती अवगती देहेसंगें ॥११॥
देहेसंगें भोग देहेसंगें रोग । देहेसंगें योग साधनाचा ॥१२॥
देहेसंगें देही विदेही संसारी । सद्भाव अंतरीं देहेसंगें ॥१३॥
देहेसंगें तारी देहेसंगें मारी । संतसंग धरी देहेसंगें ॥१४॥
देहेसंगे गती रामदासीं जाली । संगती जोडली राघवाची ॥१५॥


लक्षणे – ४ ते ६


संसार करीतां म्हणती हा दोषी । न करीतां आळसी पोटपोसा ॥१॥
ऐसा हा लोकीक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥२॥
भक्ती करूं जातां म्हणती हा पसारा । न करीतां नरा निंदिताती ॥३॥
आचारें आसतां म्हणती नाक धरी । येर अनाचारी पापरूपी ॥४॥
सत्संग धरीतां म्हणती हा उपदेसी । येर अभाग्यासी ज्ञान कैंचें ॥५॥
अभाग्यासी म्हणती ठाईंचा करटा । समर्थासी ताठा लावीतसे ॥६॥
बहु बोलों जातां म्हणती हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वीं ॥७॥
’भेटिस नवजातां म्हणती हा निष्ठुर । जातां म्हणती घर बुडविलें ॥८॥
धर्म न करीतां म्हणती हा संचीतो । करीतां काढीतो दिवाळें कीं ॥९॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करीता जाला नपुंसक ॥१०॥
निपुत्रिकां म्हणती पाहा हा चांडाळ । पातकांचें फळ पोरवडा ॥११॥
’मुखें नाम घेतां करीती टवाळी । न घेतां ढवाळी सर्वकाळ ॥१२॥
दिसां मरों नये रात्री मरों नये । कदां सरों नये मागांपुढां ॥१३॥
मर्यादा धरीतां लाजाळू चोखट । न धरीतां धीट म्हणती लोक ॥१४॥
लोक जैसा वोक धरीतां धरेना । अभक्ती सरेना अंतरीची ॥१५॥
दास म्हणे मज तुझाची आभार । दुस्तर संसार तरीजेल ॥१६॥


होणार तें कांहीं आतां पालटेना । तरी चिंत मना कां करीसी ॥१॥
नादाबिंदा भेटी जाली जये काळीं । तेव्हांची कपाळीं लीहीयेलें ॥२॥
हानी मृत्यु लाभ होणार जाणार । सर्वही संसार संचीताचा ॥३॥
लल्लाटीं लीहिलें होउनीयां गेलें । संचीत भोगीलें पाहिजे तें ॥४॥
त्यागूनीया देश सेवीला विदेश । तरी सावकास भोगप्राप्ती ॥५॥
सुखाचा आनंद दुखें होये खेद । ऐसे दोनी भेद पुरातन ॥६॥
देहाचें निमीत्य चुकवितां नये । आतां चिंता काये करूनीयां ॥७॥
त्रैलोक्य त्यागावें तर्‍हीं तें भोगावें । प्राचीन सांगावें कोणापासीं ॥८॥
प्रालब्ध चुकेना ब्रह्मादिकांचेनी । सर्व देवयानि भोगीयेलें ॥९॥
भोगीयेलें देव दानव मानव । किन्नर गंधर्व लोकपाळ ॥१०॥
प्राप्त पालटाया बहु प्रेत्न केले । परी पालटीले नाहीत कीं ॥११॥
रावण वोहर आणी कंसासुर । परीं तें होणार होत आहे ॥१२॥
पुत्राचेनी सळें जालीं नागकुळें । सुटेना कपाळें परीक्षीती ॥१३॥
ऐसे थोर थोर सांगतां अपार । भोगीलें साचार होणारातें ॥१४॥
होणार तें आहे देहाचा समंध । रामदासीं बोध देहातीत ॥१५॥


कोणाचें हें घर कोणाचा संसार । सांडुनी जोजार जाणें लागे ॥१॥
जाणें लागे अंतीं येकलें सेवट । व्यर्थ खटपट सांडुनियां ॥२॥
जन्मवरी देहे संसारी गोविलें नाहिं काहिं केलें आत्महित ॥३॥
आत्महित गेलें संसाराचे वोढी । अंती कोण सोडी रामेंवीण ॥४॥
रामेंवीण कोण्ही सोडविना अंतीं । वायांची रडती जिवलगें ॥५॥
जिवलगीं राम दुरी दुर्‍हाविला । विचार आपुला जाणवेना ॥६॥
जाणवेना पूर्व सुकृतावांचुनी । पापीयाचे मनीं राम कैचा ॥७॥
राम कैचा तया लोकिकांची चाड । पुरविती कोड संसाराचें ॥८॥
संसाराचें कोड तेंचि वाटे गोड । जया नाहिं वाड अनुतप ॥९॥
अनुतापी जाले संसारीं सुटले । राजे राज्य गेले सांडुनीयां ॥१०॥
सांडुनीयां गेले वैभव संपत्ती । पुढें यातायातीचेनी भेणें ॥११॥
भेणें ते शरण रीघाले देवासी । नेले वैकुंठासी भक्तराज ॥१२॥
भक्तराज भावें भेटले देवासी । रामीरामदासीं धन्य वेळा ॥१३॥


लक्षणे – ७ ते ९


अनुमानें रान घेतसे वाजट । तयासी चावट कोण बोले ॥१॥
बोलतां बोलतां सीणची होतसे । संतोष जातसे अंतरीचा ॥२॥
अंतरीचा देव अंतरीं पाहावा । मीपण हें देवा समर्पावें ॥३॥
समर्पावें भावें तन मन धन । आत्मनिवेदन कैसें आहे ॥४॥
कैसे आहे सोहं कैसे आहे हंसा । वाक्यार्थ आमासा वोळखावा ॥५॥
वोळखतां तेथें तत्वेंची सरती । नाही अहंकृती कांहिं येक ॥६॥
कांहिं तरी येक वृत्ती कामा नये । घडतो अपाय बहुविध ॥७॥
बहुविध आग्र करावा येकाग्र । सुक्षम समग्र विवंचावें ॥८॥
विवंचावे चळ चंचळ सर्वदा । तुटती आपदा संसारीच्या ॥९॥
संसारीक लोक त्या नाहिं विवेक । मुख्य देव येक विसरलीं ॥१०॥
विसरली तेणें पुनरागमन । श्रवण मनन केलें नाहिं ॥११॥
केलें नाहिं हित आपुलें स्वहित । सर्व अंतवंत लोकिक हा ॥१२॥
लोकिकाकरितां कांहींच घडेना । अंतरीं जडेना समाधान ॥१३॥
समाधान होये साधुचे संगती । पाविजेते गति दास म्हणे ॥१४॥


देव सर्व जेणे घातले बांदोडीं । त्याची मुरकुंडी रणांगणीं ॥१॥
ऐसा काळ आहे सर्वां गिळीताहे । विचारूनी पाहें आलया रे ॥२॥
इंद्रजीतनामें इंद्रासी जिंकीलें । त्याचें श्री नेलें गोलांगुळीं ॥३॥
देवां दैत्या वाळी बळी भूमंडळीं । तया येका काळीं मृत्यू आला ॥४॥
देवासी पिटीलें तया जाळांधरें । तोडीलें शंकरे शीर त्याचें ॥५॥
करें भस्म करी नामें भस्मासुर । तया संव्हार विष्णु करी ॥६॥
प्रल्हादाचा पिता चिरंजीव होता । नृसिंह मारिता त्यासी होये ॥७॥
विरोचनाघरीं विष्णु जाला नारी । तया यमपुरी दाखविली ॥८॥
गजासुर गेला दुंदुभी निमाला । प्रताप राहिला वैभवाचा ॥९॥
ऐसे थोर थोर प्रतापी अपार । गेले कळेवर सांडुनीयां ॥१०॥
शरीर संपत्ती सर्व गेली अंतीं । सोसील्या विपत्ती येकायेकी ॥११॥
म्हणोनि वैभवा कदा भुलों नये । क्षणा योये काये तें कळेना ॥१२॥
रामदास म्हणे स्वहित करणें । निर्धारें मरणें मागें पुढें ॥१३॥


दृश्य हें काशाचें कोणें उभारिलें । मज निरोपीलें पाहिजे हें ॥१॥
पाहिजे हें दृश्य भूतपंचकाचें । उभारलें साचें मायादेवी ॥२॥
मायादेवी कैसी कोण वोळखावी । आणी हे त्यागावी कोणेपरि ॥३॥
परी हे मायेची कैसी वोळकावी । जाणोनि त्यागावी ज्ञानबोधे ॥४॥
ज्ञानबोधें माया जाणोनि त्यागिली । परी नाहीं गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरूपण संतांचे संगतीं । तेणें शुद्ध मती होत असे ॥६॥
होत असे परी तैसेंचि असेना । निश्चयो वसेना मनामध्यें ॥७॥
मनामध्यें सदा विवेक धरावा । निश्चयो करावा येणें रीती ॥८॥
रीती विवेकाची पाहातां घडीची । जातसे सवेंची निघोनीयां ॥९॥
निघोनीयां जाये विवेक आघवा । तो संग त्यागावा साधकानें ॥१०॥
साधकाने संग कोणाचा त्यागावा । सदृढ धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरें धरीं सज्जनाचा । त्यागीं दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥


लक्षणे – १० ते १३

१०
आपुल्या भजनें पोटही भरेना । लागे उपार्जना दुसर्‍याची ॥१॥
दुसर्‍याची सेवा करितां वेतन । पाविजेतें अन्न लोकामधें ॥२॥
लोकामधें उपासितां देहदारा । मागावा मुषारा कोणापासीं ॥३॥
कोणापासीं कोणें काये हो सांगावें । कैसेनि मागावें वेतनासी ॥४॥
वेतनासी जनीं तरीच पाविजे । जरी सेवा कीजे स्वामीयाची ॥५॥
स्वामीयाची सेवा करितां उत्पन्न । स्वामी सुप्रसन्न होत असे ॥६॥
होत असे देव संतुष्ट भजतां । मुक्ति सायुज्यता तेणें लाभे ॥७॥
लाभे नवविधा तेणें चतुर्विधा । पुसावें सुबुद्धा सज्जनासी ॥८॥
सज्जनासी पुसा देहासी भजतां । भार भगवंता कैसा पडे ॥९॥
कैसा पडे भार देहाच्या भजनें । भक्तीचेनि गुणें देव पावे ॥१०॥
देव पावतसे भजतां देवासी । सेवितां देहासी देव कैचा ॥११॥
देव कैचा देव सेविल्यावांचुनी । तत्वविवंचना दास म्हणे ॥१२॥

११
येतां संसारासी जाल्या दुःखरासी । कोणाला असोसी कासयाची ॥१॥
पात्र कोण्ही येक भरला वमक । खायाचा विवेक तेथें कैंचा ॥२॥
विषय नासका कळला असका । सुख नाहें येका देवेंविण ॥३॥
देवेंवीण येका सर्व कांहिं फोल । वासना गुंतेले कोणे ठाईं ॥४॥
कोणे ठाईं आतां असोसी राहिली । वासना गुंतली रामपाई ॥५॥
रामपाईं जन्म मृत्यु आडळेना । दास म्हणे मना सावधान ॥६॥

१२
सावधानपणें कांहिंच नुरावें । त्वरें उद्धरावें कोण्ही येकें ॥१॥
कोण्ही येकें इच्छा देवाची मानावी । आपुली नाणावी वासना हे ॥२॥
वासनेसी मनापासूनि कंटाळा । जन्मासी वेगळा सहजची ॥३॥
सहजची आतां मन कंटाळलें । पोंचट वाटले सर्व कांहिं ॥४॥
सर्व कांहिं दीसे मिथ्या वोडंबरी । साचाचीये परी कोण मानी ॥५॥
मानेसेंहि नाहीं असोसीही नाहीं । दास कांहिं नाहिं राम येक ॥६॥

१३
सर्व कांहि चिंता केली भगवंतानें । आपुले चिंतेनें काय होतें ॥१॥
काय होतें देव कांहीं कां करीना । विश्वासानें मना उर्ध्वगती ॥२॥
उर्ध्वगती हे तों बुद्धीच्या वैभवें । उत्तराई व्हावें काय आतां ॥३॥
काय आतां द्यावें काय आहे माझें । मीपणाचें वोझें कासयासीं ॥४॥
कासयासी चित्त दुश्चित्त करावें । संसारी तरावें देवाचेनि ॥५॥
देवाचेनि नामें हरतील कर्में । परी नित्यनेमें जपध्यान ॥६॥
जपध्यान पूजा आखंड करावी । बुद्धी विवरावें देव देणें ॥७॥
देवदेणें बुद्धी तेणें सर्व सिद्धी । गती निरवधी होत असे ॥८॥
होत असे गती देवीं विश्वासतां । चिंता नाहीं आतां कासयाची ॥९॥
कासयाची चिंता कासया करावी । भक्ती हे धरावी राघवाची ॥१०॥
राघवाची भक्ती तेणें होय मुक्ती । भक्तीविण युक्ते कामा नये ॥११॥
कामा नये युक्ती धरावा विश्वास । सांगतसे दास प्रचीतीनें ॥१२॥


लक्षणे – १४ ते १७

१४
करावे तें काये तेणें होतें काये । अनुमानें कायें प्राप्त होतें ॥१॥
प्राप्त होतें काये ऐसेंही कळेना । नये अनुमाना सर्व कांहिं ॥२॥
सर्व कांहिं येका आत्मज्ञानेंविण । दिसताहे सीण वाउगाची ॥३॥
वाउगाची लाभ प्रचीतीवेगळा । उगाचि आगळा दीसताहे ॥४॥
दिसातहे फळ लोकचि म्हणती । आपुली प्रचीती कांहिं नाहीं ॥५॥
कांहिं नाहीं पूर्वजन्माचें स्मरन । होये विस्मरण सर्व कांहिं ॥६॥
सर्व कांहिं मागें जाहलें कळेना । म्हणोनी फळेना केलें कर्म ॥७॥
केलें कर्म कोणें कोणासी पुसावें । अनुमानें व्हावें कासावीस ॥८॥
कासावीस जाला कर्में जाजावला । व्यर्थ भ्रमें गेला अंतकाळीं ॥९॥
अंतकाळीं गेला सर्व सांडुनीयां । भ्रमला प्राणी या विस्मरणें ॥१०॥
विस्मरण जाये सद्गुरूकरितां । दास म्हणे आतां गुरू करीं ॥११॥

१५
आतांची ये देहीं मुक्ति पाविजेना । तरी कां सज्जना शरण जावें ॥१॥
शरण जातां भावें सज्जनचि व्हावें । सीघ्र उद्धरावें निरूपणीं ॥२॥
निरूपणें निजस्वरूप सांपडे । गुज ठाईं पडे अकस्मात ॥३॥
अकस्मात ठाव न दिसे आपुला । निरंजनीं जाला निरंजन ॥४॥
निरंजन जाला ये लोकीं असोनी । अन्मनीगीन्मनी नाडळती ॥५॥
नाडळती जेतें कांहिं देहभाव । तत्त्वज्ञानें वाव देहबुद्धी ॥६॥
देहेबुधी गेली देखत देखतां । मी हें कोण आतां सांपडेना ॥७॥
शुद्धी मीपण पाहातां । मीपण तें जातां वस्तुरूप ॥८॥
वस्तुरूप बोधें अरूप होईजे । विवेकेंचि कीजे विचारणा ॥९॥
विचारणा जाली रामीरामदासीं । आतां या जन्मासी ठाव नाहीं ॥१०॥
ठाव नाहिं ऐसें राघवाचें देणें । थोराहुनि होणें थोर स्वयें ॥११॥

१६
प्रातःकाळ जाल्या राम आठवावा । हृदई धरावा क्षण येक ॥१॥
क्षण येक राम हृदई धरीजे । संसारीं तरीचें हेळामात्रें ॥२॥
हेळामात्रें रामनामें होय गती । भाग्यवंत घेती सर्व काळ ॥३॥
सर्व काळ राम मानसीं धरावा । वाचे उच्चारावा नामघोष ॥४॥
नामघोष वाचे श्रवण कीर्तन । चरणीं गगन देवाळया ॥५॥
देवाळयां जातां सार्थक जाहालें । कारणीं लागलें कळेवर ॥६॥
कळेवर त्वचा जोडुनी हस्तक । ठेवावा मस्तक रामपांई ॥७॥
रामपांईं शिळा जाली दिव्यबाळा । तैसाची सोहळा मानवांसीं ॥८॥
मानवांसीं अंतीं रामनामें गती । सांगे उमापती महादेव ॥९॥
महादेव सांगे जप पार्वतीस । तोची तो विश्वास रामदासीं ॥१०॥

१७
धन्य त्याचें कुळ धन्य त्याचा वंश । जे कुळीं हरिदास अवतरला ॥१॥
धन्य ते जननी धन्य तीची कुसी । जे हरीप्रियासी प्रसवली ॥२॥
धन्य ते संबंधी संतांचे सोईरे । संसर्गें उद्दरे कुळ त्यांचें ॥३॥
धन्य तो पै ग्राम धन्य तो पै देश । जेथें हरिवास वैषवाचा ॥४॥
धन्य त्यांचे सखे वैष्णवी सर्वदा । ते सर्व गोविंदा जीवलग ॥५॥
धन्य ते भाविक वंदिती हरिदास । तया हृषीकेश वंदितसे ॥६॥
धन्य ते निंदक निंदिती सज्जन । येणें भावें धान्य घडे त्यांचें ॥७॥
धन्य दासदासी सज्जनसेवेसी॥ ते सुरवरासी वंद्य होती ॥८॥
धन्य पशु श्वान वैष्णवा गृहिंचें । कळिकाल त्यांचे पाय वंदी ॥९॥
रामदास म्हणे तरीच धन्य होणें । जरी संग लाधणें सज्जनाचा ॥१०॥

 


लक्षणे – १८ ते २१

१८
रामाचें चरित्र सांगता अपार । जाहला विस्तार तीहीं लोकीं ॥१॥
तीहीं लोकीं हरें वांटुनी दीधलें । तें आम्हां लाधलें कांहिं येक ॥२॥
कांहि येक भाग्य होतें पूर्वजांचें । पापियासी कैचें रामनाम ॥३॥
रामनामें कोटी कुळें उद्धरती । संशय धरीती तेचि पापी ॥४॥
पापीयाचें पाप जळे येकसरें । जरी मनीं धरे रामनाम ॥५॥
’रामनाम काशीं शिव उपदेसी । आधार सर्वांसी सर्व जाणे ॥६॥
सर्व जाणे अंतीं रामनामें गती । आणी वेदश्रुती गर्जताहे ॥७॥
गर्जती पुराणें आणी संत जन । करावें भजन राघवाचें ॥८॥
राघवाचें ध्यान आवडे कीर्तन । तोची तो पावन लोकांमध्यें ॥९॥
लोकांमध्यें तरे आणी जना तारी । धन्य तो संसारी दास म्हणे ॥१०॥१९
ऐसें आत्मज्ञान उद्धरी जगासी । पाहेना तयासी काय करूं ॥१॥
काय करूं जना जन विवरेना । नेणतां सरेना जन्ममृत्यु ॥२॥
जन्म मृत्यु बाधी मानीना तयासी । कल्पतरू ज्यासी तुच्छ वाटे ॥३॥
तुच्छ वाते देव तोची तो निर्देव । तयासी सदेव कोण करी ॥४॥
कोण करी येका राघवावांचुनी । राम धरा मनीं सर्वकाळ ॥५॥
सर्वकाळ गेला दरिद्र भोगीतां । वैराग्य पाहातां तेथें नाहिं ॥६॥
नाहिं भक्तिज्ञान परमार्थाचें सुख । संसारींही दुःख दरिद्राचें ॥७॥
दरिद्राचें दुःख केलें देशधडी । रामराज्यागुढी उभविली ॥८॥
उभविली गुढी भक्तिपंथें जावें । शीघ्रची पावावें समाधान ॥९॥
समाधान रामीरामदासीं जालें । सार्थकानें केलें सार्थकची ॥१०॥

२०
जाणे सुखदुःख रामा माझा येक । येर तें माईक वैभवाचीं ॥१॥
वैभवाचीं सकीं वोरंगोनि जाती । आत्माराम अंतीं जीवलग ॥२॥
जीवलग नाहिं श्रीरामवांचुनी । हाची माझे मनीं दृढभाव ॥३॥
भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा । रामेंवीण कैचा अंतरंग ॥४॥
अंतरीची व्यथा श्रीराम समर्था । जाणवल्या चिंता दुरी करी ॥५॥
करी प्रतिपाळ शरण आलियांचा । राम त्रैलोक्याचा मायबाप ॥६॥
मायबाप धन सज्जन सोयरा । येका रघुवीरावीण नाहिं ॥७॥
नाहिं मज चिंता श्रीराम असतां । संकटीं बोहातां उडि घाली ॥८॥
उडी घाली मज अनाथा कारणें । राम सर्व जाणे अंतरीचें ॥९॥
अंतरीचें गुज राम सर्वबीज । रामदासीं नीज प्रगटलें ॥१०॥

२१
ऐका नव रस सुंदर सरस । जेणें होय रस सर्व काळ ॥१॥
प्रथम शृंगार दुसरा तो हास्य । तिसरा तो रस करूणेचा ॥२॥
रौद्र तो चतुर्थ वीर तो पांचवा । रस तो साहवा भयानक ॥३॥
मोहो तो सातवा वीभत्स आठवा । लज्या तो नववा रस जाण ॥४॥
रसीक बोलणें रसीकची गाणें । रसीक वाचणें प्रसंगींत ॥५॥
ज्याचें त्याचें परी आवडीसारीखें । बोलतां आरिखें लुब्ध होती ॥६॥
लुब्ध होती तरी मृदुची बोलावें । नेमस्त चालावें नीतिन्यायें ॥७॥
नीतिन्यायेंबहुतेकांसी मानतो । व्याप करील तो भाग्यवंत ॥८॥
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर । अखंड विचार चाळणेचा ॥९॥
चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा । अखंड शहाणा तोची येक ॥१०॥
प्रवृत्ती निवृत्ति चाळणा पाहिजे । दास म्हणे कीजे विचारणा ॥११॥

—————————–

लक्षणे – २२ ते २५

२२
नमूं वागीश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्न करी व्यक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचें लक्षण सांगा स्वामी ॥२॥
सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा । बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणें केला संच । मागुचा विसंच कोण करी ॥४॥
कोण ते अविद्या सांगिजे ती विद्या । कैसें आहे आद्याचें स्वरूप ॥५॥
स्वरूप तें माया कैसी मूळमाया । ईस चाळावया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कैसें तें चैतन्य । समाधान अन्य तें कवण ॥७॥
कवण जन्मला कोणा मृत्यु आला । बद्ध मुक्त जाला तो कवण ॥८॥
कवण जाणता कोणाची हे सत्ता । मोक्ष हा तत्वता कोण सांग ॥९॥
सांग ब्रह्मखूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्न ऐसे केले ॥१०॥

२३
सत्य राम येक सर्वहि माईक । जाणावा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाहिं खेव । जेथें जीवशिव ऐक्यरूप ॥२॥
ऐक्यरूप जेतें हें पिंडब्रह्मांड । तें ब्रह्म अखंड निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रुती । आद्य मध्य अंतीं सारिखेंची ॥४॥
सारिखेंची ब्रह्म नभाचीये परी । सबाह्य अंतरीं कोंदलेंसे ॥५॥
कोंदलेंसे परी पाहतां दिसेना । साधुवीण येना अनुभवा ॥६॥
अनुभवा येना ब्रह्म हें निश्चळ । जया तळमळ संसाराची ॥७॥
संसाराचें दुःख सर्वहि विसरे । जरी मन भरे स्वस्वरूपीं ॥८॥
स्वस्वरूपीं नाहिं सुख आणी दुःख । धन्य हा विवेक जयापासीं ॥९॥
जयापासीं ज्ञान पूर्ण समाधान । त्याची आठवण दास करी ॥१०॥

२४
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं । देवा तुझी भेटी केविं घडे ॥१॥
भक्तांसी निंदिती अभक्त दुर्जन । दुर्जनासी जन निंदिताती ॥२॥
भिन्न उपासना भिन्न संप्रदाव । येकमेकां सर्व निंदीता ॥३॥
क्रियेसी निंदीतीती क्रियाभ्रष्ट ज्ञानी । क्रियाभ्रष्टां जनीं निंदीताती ॥४॥
निस्पृहां निंदीती संसारीक जन । संसाकां जनरी निंदीताती ॥५॥
पंडितां पंडितां वेवाद लागला । पुराणिकां जाला कळहो थोर ॥६॥
वैदिकां वैदिक भांडती निकुरें । योगी परस्परें भांडताती ॥७॥
प्रपंची परमार्थीं भांडण तुटेना । लोभ हा सुटेना तेणें गुणें ॥८॥
स्मार्त ते वैष्णव शाक्त आणी शैव । निंदीताती सर्व परस्परें ॥९॥
स्वजाती विजाती भांडण लागलें । दास म्हणें केले अभिमानें ॥१०॥

२५
बहुसाल शीण होतसे कठीण । देवासी जतन करावया ॥१॥
करावया भक्ति भावें महोत्सव । देवासाठीं राव वोळगावा ॥२॥
वोळगावा रावा राखावया देव । देवासी उपाव मनुष्याचा ॥३॥
मनुष्याचा देव पूजीतां कष्टलों । कासावीस जालों वाउगाची ॥४॥
वाउगाची देव पाषाणाचा केला । भाव हा लागला तया पासीं ॥५॥
तयापासीं मन अखंड लागलें । तों तया फोडीलें कोण्ही येकें ॥६॥
कोण्ही येकें बरा विवेक पाहावा । देवाआदिदेवा वोळखावें ॥७॥
वोळखावें देवा निर्मळा निश्चळा । निर्गुणा केवळ निरंजना ॥८॥
निरंजना देवा कोण्ही उच्छेदीना । फुटेना तुटेना कदाकाळीं ॥९॥
कदाकाळीं देव पडेना झडेना । दृढ उपासना रामदासीं ॥१०॥


लक्षणे – २६ ते ३०

२६
वोकीतां वोकीतां मन कंटाळलें । राखेनें झांकीलें सावकास ॥१॥
सावकास तया कोण अभिलाषी । कोणाला असोसी कासयाची ॥२॥
कासयाची आतां वासना धरावी । गोडी विवरावी विषयांची ॥३॥
विषयांची गोडी कंटाळलें मन । नागवले जन असोसीचे ॥४॥
असोसीचे जन ते जन्म घेईल । जीवचे देईल विषयांसीं ॥५॥
विषयांसी वीट मनापासूनीयां । निर्वासना तया जन्म नाहिं ॥६॥
जन्म नाहिं ऐसें केलें देवरायें । वासना उपायें सोडविली ॥७।
सोडविली देव धन्य दयानिधी । तुटली उपाधी सर्वकांहिं ॥८॥
सर्व कांहिं नाहिं हेंची हें प्रमाण । दास म्हणे खूण देव जाणे ॥९॥
देव जाणे सर्व राहिला विकार । ब्रह्म निर्विकार दास म्हणे ॥१०॥

२७
ब्रीद साच केलें भक्तां उद्धरीलें । प्रचीतीस आलें मनाचीये ॥१॥
मनाची प्रचीती जाली निर्वासना । लेशहि असेना विषयांचा ॥२॥
विषयांचा लेश संसारदायक । जानकीनायक चुकवितो ॥३॥
चुकवितो जन्ममृत्यु सेवकाचा । विचार हा काचा कदा नव्हे ॥४॥
कदा नव्हे कांहिं वाक्य अप्रमाण । धरावे चरण राघवाचे ॥५॥
राघवाचे दास सर्वस्वें उदास । तोडि आशापाश देवराणा ॥६॥
देवराणा भाग्यें जालीयां कैपक्षी । नानापरी रक्षी सेवकांसी ॥७॥
सेवकांसी कांहिं नलगे साधन । करितो पावन ब्रीदासाठीं ॥८॥
ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगों ॥९॥
किती सांगों देव पतितपावन । करावें भजन दास म्हणे ॥१०॥

२८
स्वप्नीच्या सुखें सुखावला प्रशरी । थोर जाली हाणी जागृतीसी ॥१॥
जागृतीसी नाहिं स्वप्नीचे सुख । तेणें जालें दुःख बहुसाल ॥२॥
बहुसाल खेद मानीला अंतरीं । वांयां झदकरी जागा जालों ॥३॥
जागा जालों म्हणे वायां अवचीता । निजोनि मागुता सुख पाहे ॥४॥
सुख पाहे पुन्हा स्वप्नीचें न दिसे । भयानक दिसे प्राणीयासी ॥५॥
प्राणीयासी दुःख जाहालें मागुतें । जागा जालियातें सर्व मिथ्या ॥६॥
मिथ्या सुखदुःख स्वप्नाचा वेव्हार । तैसा हा संसार नाथिलाची ॥७॥
नाथिलाची जाय क्षण आनंदाचा । सवेंची दुःखाचा क्षण जाये ॥८॥
क्षण येक मनाराघवी सावध । तेणें नव्हे खेद दास म्हणे ॥९॥

२९
देव हे समर्थ आणी देहेधारी । कष्टी परोपरीं ब्रह्मादिक ॥१॥
ब्रह्मादिक तया रावणाचे बंदीं । दैत्य उणी संधी पाहाताती ॥२॥
पाहाताती येकीं केल्या हज्यामती । रासभें राखती येक देव ॥३॥
देवची गादले बहु दगदले । कासाविस जाले कारागृहीं ॥४॥
कारागृहीं देहेसंबंधानें होती । विवेकें राहाती देहातीत ॥५॥
देहातीत दुःख सांडुनि संसार । येथें काय सार सांपदलें ॥६॥
सांपडलें नाहिं कष्ट जन्मवरी । दीनाचीयेपरी दैन्यवाणे ॥७॥
दैन्यवाणे देव जाले संवसारीं । मनुष्याचा करी कोण लेखा ॥८॥
लेखा नाहिं ऐसें कसया करावें । निश्चळची व्हावें दास म्हणे ॥९॥

३०
जीव येकदेसी शीव येकदेसी । याचेनी सायासीं कांहिं नव्हे ॥१॥
हित करवेना आपुलें आपण । त्यासी कर्तेपण घडे केवि ॥२॥
देहे त्याचा त्याला न जाय राखीला । निमित्य भक्षिला अकस्मात ॥३॥
काळ आवर्षण पडतां कठीण । तेव्हां पंचप्राण सोडूं पाहे ॥४॥
जीवा जीव्पाण देता नारायण । तयावीण कोण करूं शके ॥५॥
राया करी रंक रंका करी राव । तेतें धरीं भाव आलया रे ॥६॥
आलया रे जना भावासीं कारण । येर निःकरण सर्व कांहिं ॥७॥
सर्वही हे देहे देवाचीपासुनि । तयाचे भजनीं रामदास ॥८॥

 


लक्षणे – ३१ ते ३५

३१
छत्रसुखासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रिलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडले वर्म थोर भाग्य ॥४॥
थोर भाग्य ज्याचें राम त्याचें कुळी । संकटीं सांभाळीं भावबळें ॥५॥
भावबळें जेहीं धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंबेना ॥६॥
विसंबेना कदा आपुल्या दासासी । रामी रामदासीं कुळस्वामी ॥७॥

३२
काया हे काळाची घेऊनी जाणार । तुझेनी होणार काय बापा ॥१॥
काय बापा ऐसें जाणोनी नेणसी । मी माझें म्हणसी वायावीण ॥२॥
वायावीण शीण केला जन्मवरी । दंभ लोकाचारी नागवण ॥३॥
नागवण आली परलोका जातां । लोकिक तत्वता येंही लोकीं ॥४॥
केली नाहिं चिंता नामीं कानकोडें । आतां कोण्या तोंडें जात आहे ॥५॥
जात आहे सर्व सांडूनि करंटा । जन्मवरी ताठा धरूनियां ॥६॥
धरूनीयां ताठा कासया मरावें । भजन करावें दास म्हणे ॥७॥

३३
पूर्ण समाधान इंद्रियदमन । श्रवण मनन निरंतर ॥१॥
निरंतर ज्याचे हृदई विवेक । उपासना येत कोची धन्य ॥२॥
धन्य तोचि येक संसारीं पाहातां । विवेकें अनंता ठाइं पाडी ॥३॥
ठाईं पाडी निजस्वरूप आपुलं । असोनी चोरलें जन्मोजन्मीं ॥४॥
जन्मोजन्मीं केलें पुण्य बहुसाल । तरीच घडेल संतसंग ॥५॥
संतसंग जया मानवा आवडे । तेणें गुणें घडे समाधान ॥६॥
समाधान घडे सज्जनाच्या संगें । स्वरूपाच्या योगें रामदासीं ॥७॥

३४
साधु आणी भक्त व्युत्पन्न विरक्त । तपोनिधी शांत अपूर्वता ॥१॥
अपूर्वता जनीं शुद्ध समाधानी । जनाचे मिळणीं मिळों जाणें ॥२॥
मिळों जाणे जना निर्मळवासना । अंतरिं असेना निंदाद्वेष ॥३॥
निंदाद्वेष नसे जनीं लक्ष असे । जेथें कृपा वसे सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ जेणें सार्थकीं लाविला । वंश उद्धरीला नामघोषें ॥५॥
नामघोष वाचे उच्चारीं सर्वदा । संतांच्या संवादा वांटेकरी ॥६॥
वाटेकरी जाला सायुज्यमुक्तीचा । धन्य तो दैवांचा दास म्हणे ॥७॥

३५
विश्रांतीचें स्थळ स्वरूप केवळ । द्वैततळमळ जेथें नाहिं ॥१॥
जेथें नाहिं काया नाहिं मोह माया । रंका आणी राया सारिखेंची ॥२॥
सारिखेंची सदा सर्वदा स्वरूप । तेंच तुझें रूप जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वयें तूंची आपणासी । सोहंस्मरणासी विसरतां ॥४॥
विसरतां सोहं स्मरण आपुलें । मग गुंडाळलें मायाजाळीं ॥५॥
मायाजाळीं तुझा तूंची गुंतलासी । यातना भोगिसि नेणोनीयां ॥६॥
म्हणोनीयां होईं सावध अंतरीं । सोहं दृढ धरीं दास म्हणे ॥७॥


लक्षणे – ३६ ते ४०

३६
आम्हां तुम्हा मुळीं जाली नाहिं तुटी । तुटिवीण भेटी ईच्छीतसा ॥१॥
ईच्छीतसा नसतां वियोग । तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाल तुम्ही आम्ही येकेस्थळीं । वायां मृगजळीं बुडों नयें ॥३॥
बुडों नये आतां सावध असावें । रूप वोळखावें जवळीच ॥४॥
जवळीच आहे नका धरूं दुरी । बाह्यअभ्यंतरीं असोनीयां ॥५॥
असोनि सन्निध वियोगाचा केद । नसोनीयां भेद लाऊं नये ॥६॥
लाऊं नये भेद माईक संबंदी । रामदासीं बोधीं भेटी जाली ॥७॥

३७
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चयो । जया नाहीं लयो तोची देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर । व्यापूनी अंतर देव आहे ॥२॥
देव आहे सदा सबाह्य अंतरीं । जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी देवासी नेणवे । म्हणोनीयां धांवे नाना मती ॥४॥
नाना मती देव पाहतां दिसेना जंव तें वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे । अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टी ॥६॥
ज्ञानदृष्टी होतां पाविज अनंता । हा शब्द तत्वता दास म्हणे ॥७॥

३८
अनंताचा अंत पाहावया गेलों । तेणें विसरलों आपणासि ॥१॥
आपणा आपण पाहतां दिसेना । रूप गंवसेना दोहिंकडे ॥२॥
दोहींकडें दे आपणची आहे । संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत । देखत अनंत कळों आला ॥४॥
कळों आला भार पहिला विचार । पुढें सारसारविचारणा ॥५॥
विचारणा जाली रामीरामदासीं । सर्वही संगासी मुक्त केलें ॥६॥
मुक्त केलें मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणी येक ॥७॥

३९
पूर्वपक्ष भेद सिद्धांत अभेद । संवाद विवाद समागमें ॥१॥
समागमें आहे सर्व अनुमान । कल्पनेचें रान जेथें तेथें ॥२॥
जेथें तेतें पूर्ण ब्रह्म कोंडाटलें । दृश्यहि दाटलें कल्पनेचें ॥३॥
कल्पनेचें दृश्य करि कासाविस । नाहिं सहवास सज्जनाचा ॥४॥
सज्जनाचा वास संदेहाचा नास । विचारें विलास जेथें तेथें ॥५॥
जेथें तेथें आहे देव निरंजन । तन मन धन त्यासी पावो ॥६॥
तन मन धन तो जगजीवन । आत्मनिवेदन रामदासीं ॥७॥

४०
कोण्ही येकें आधीं देवसी भजावें । तेणें पदे ठावें सर्व कांहिं ॥१॥
सर्व कांहिं चिंता देवची करीतो । स्वयें उद्धरीतो सेवकासी ॥२॥
सेवकासी काय कळे देवेंविण । साधनाचा शीण वाउगाची ॥३॥
वाउगाची शीण हें आलें प्रचीती । दे आदिअंती सांभाळितो ॥४॥
सांभाळितो देव तेथें जाला भाव । देवची उपाव सेवकांसी ॥५॥
सेवकांसी कांहिं न चले उपाय । दाखविली सोये साभिमानें ॥६॥
साभिमानें सोये देव धन्य होये । सहज उपाये दास म्हणे ॥७॥


लक्षणे – ४१ ते ४५

४१
देव त्वां घेतला मत्स्यअवतार । कासव डुकर कासयासी ॥१॥
कासयासी देवें कपट करावें । खुजटची व्हावें बळीचेथें ॥२॥
बळीचेथें नाना कपट करावें । मतेसी मारावे कासयासी ॥३॥
कासयासी वाळी उगाची मारिला । मिथ्या शोक केला वनांतरीं ॥४॥
वनांतरी शोक चोरी घरोघरीं । देव परद्वारी म्हणताती ॥५॥
म्हणताती बोध्य जाला निःसंगळ । कलंकी दुरूळ दास म्हणे ॥६॥

४२
निरूपणीं जनीं लाभे सर्व काहिं दुजे ऐसें नाहिं पाहों जातां ॥१॥
साराचेंही सर वेदां अगोचर । ते लाभे साचार निरूपणें ॥२॥
दाखवीतां नये बोलिलें न जाये । त्याची कळे सोये निरूपणें ॥३॥
मनासी नाकळे मीपणा नाडळे । तें गुज निवळे निरूपणें ॥४॥
व्यत्पत्तीचें कोडें तर्काचें सांगडें । तें जोडें रोकडें निरुपणें ॥५॥
मन हें चंचळ तें होय निश्चळ । साधनाचें फळ साद म्हणे ॥६॥

४३
तूं काय जालासी अगा निरंजना । आम्हां भक्तजना सांभालावें ॥१॥
सांभाळावें सदा बाह्यअभ्यंतरीं । आम्हां क्षणभरी सोडूं नये ॥२॥
सोडूं नको वायांगुप्त कां जालासि । देवा देखिलासी संतसंगें ॥३॥
संतसंगें गुप्त होउनी पाहिलें । संगत्यागें जालें दरूशण ॥४॥
दरूशण जालें तेची ते जाणती । नसोनी असती कल्पकोडी ॥५॥
कल्पकोडी जाडी जाली निर्गुणाची । दास म्हणे कैची देहेबुद्धी ॥६॥

४४
माणसाचें ब्रह्म होतें कोणेपरी । ऐसं तूं विचारीं आलया रे ॥१॥
आलया माणुस हें कोणा म्हणावें । बरें हें जाणावें शोधूनीयां ॥२॥
शोधूनीयां पाहतां स्थूळाचा चाळक । सूक्ष्माचा येक मनप्राण ॥३॥
मनप्राणेंविण हें कांहिं घडेना । हेंच आणा मना विवेकी हो ॥४॥
विवेकी हो तुम्ही विवेक पाहावा । संसाराचा गोवा कोण करी ॥५॥
कोण करीतसे सर्वहि करणी । दास निरूपणीं सावधान ॥६॥

४५
सावधान व्हावे विवेका पाहावें । वायोच्या स्व्भावें सर्व कांहिं ॥१॥
सर्व कांहिं घदे वायोची करीतां । वायो पाहां जातां आडळेना ॥२॥
आडळेना वायो आकाशीं विराला । कर्ता काय जाला अंतरीचा ॥३॥
अंतरीचा सर्व विवेक पाहातां । ब्रह्मरूप आतां सहजची ॥४॥
सहजची जालें विचारानें केलें । माणूस पाहीलें शोधुनीयां ॥५॥
शोधुनी या जीत माणूस पाहावें । वर्म पडे ठावें दास म्हणे ॥६॥


लक्षणे – ४६ ते ५०

४६
अलभ्याचा लाभ अकस्मात जाला । देव हा वोळला येकायेकीं ॥१॥
येकायेकीं सुख जाहलें येकट । व्यर्थ खटपट साधनाची ॥२॥
साधनाची चिंता तुटली पाहातां । वस्तुरूप होतां वेळ नाहिं ॥३॥
वेळ नाहिं मज देवदरूशना । सन्मुखची जाणा चहूंकडे ॥४॥
चहूंकडे मज देवाचे स्वरूप । तेथेंमाझें रूप हारपलें ॥५॥
हारपले चित्त देवासी चिंतीतां । दास म्हणे आतां कोठें आहे ॥६॥

४७
रामभक्तीविण अनु नाहिं सार । साराचेंही सार रामनाम ॥१॥
कल्पनाविस्तारू होतसे संव्हारू । आम्हां कल्पतरू चाड नाहिं ॥२॥
कामनेलागुनि विटलासे मनु । तेथें कामधेनु कोण काज ॥३॥
चिंता नाहिं मनीं राम गातां गुणी । तेथें चिंतामणी कोण पुसे ॥४॥
कदा नाहीं नाश स्वरूप सुंदरे । तेथें काय हिरे नासीवंत ॥५॥
रामदास म्हणे रामभक्तीविणें । जाणावें हें उणें सर्व कांहिं ॥६॥

४८
नमूं वक्रतुंडा स्वरूपें प्रचंडा । स्थूळ हे ब्रह्मांडा विराटाचें ॥१॥
विराटाचें सत्य पाताळीं चरण । तेथें अधिष्ठान त्रिविक्रमा ॥२॥
त्रिविक्रम स्थूळ तें सप्तपाताळ । कटमहितळ विराटाचें ॥३॥
विराटाचें रोम गुल्मलता द्रुम । सर्व नद्या नेम नाडीचक्रें ॥४॥
नाडीचक्र नद्या सप्तही सागर । जाणावें उदार विराटाचें ॥५॥
विराटाचा पोटीं क्षुधेचा प्रबळ । तोची दावानळ सागरीचा ॥६॥

४९
कर्ता येक देव तेणें केलें सर्व। तयापासीं गर्व कामा नये ॥१॥
देहे हें देवाचें वित्त कुबेराचे । तेथें या जीवाचें काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । कर्ता करविता जीव नव्हे ॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पाहातां निर्वाणीं जीव कैचा ॥४॥
लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण जीवाची उरी नाहिं ॥५॥
दास म्हणे मना सावध असावें । दुश्चीत नसावें सर्व काळ ॥६॥

५०
आलया देवाची वात चुकलासी । म्हणोनी आलासी संवसारा ॥१॥
संवसारीं दुखें करीसी रूदन । चुकलें भजन राघवाचें ॥२॥
राघवाची भक्ती नेणतां विपत्ती ॥ तुज अधोगती जन्म जाला ॥३॥
जन्म जाल अपरी वेगीं सोये धरीं । सत्वर संसारीं मोकळीक ॥४॥
मोकळीक होये भक्तिपंथें जातां । वाक्य हें तत्वता दास म्हणे ॥५॥


लक्षणे – ५१ ते ५५

५१
माझा स्वामी आहे संकल्पापरता । शब्दीं कैसी आतां स्तुती करूं ॥१॥
स्तुतीं करूं जातां अंतरला दुरी । मीतूंपणा उरी उरों नेंदी ॥२॥
उरों नेंदी उरी स्वामीसेवकपण । येकाकी आपणा ऐसें केलें ॥३॥
केलें संघटण कापुरें अग्नीसी । तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं ॥४॥
उरी नायिं कदा रामी रामदासा । स्वयें होय ऐसा तोची धन्य ॥५॥

५२
जेथें तेथें देव नाहीं रिता ठाव । ऐसा माझा भाव अंतरीचा ॥१॥
अंतरीचा देव अंतरीं जोडला । विकल्प मोडला येकसरा ॥२॥
येकसरा लाभ जाला अकस्मात । ब्रह्म सदोदीत सर्वां ठायीं ॥३॥
सर्वां ठाईं ब्रह्म पंचभूत भ्रम । साधुसंगें वर्म कळों आलें ॥४॥
कळों आलें वर्म आत्मनिवेदनें । ज्ञानें समाधान रामदासीं ॥५॥

५३
संसारीचें दुःख बहुसाल होतें । तें जालें परतें विचारानें ॥१॥
विचारानें सर्व संग वोरंगला । रामरंग जाल असंभाव्य ॥२॥
असंभाव्य सुख मर्यादेवेगळें । विचाराच्या बळें तुंबळलें ॥३॥
तुंबळलें सर्व चंचळ निश्चळ । द्वैत तळमळ तेथें नाहिं ॥४॥
तेतें नाहिं दैन्य वस्तु सर्वमान्य । तयासी अनन्य देवदास ॥५॥

५४
माया हे असार वस्तु आहे सार । कळें विचार साधुसंगें ॥१॥
साधुसंगें संग भंगे साधकांचा । सिद्ध साधकाचा होत आहे ॥२॥
होतसे साधक बरें विवरतां । विवेकें थिरतां परब्रह्मीं ॥३॥
परब्रह्मीं माया पाहातां दिसेना । येर निरसेना कांहीं केल्यां ॥४॥
कांहिं केल्यां तरी कांहिं होत नाहिं । आत्मज्ञानें पाहिं दास म्हणे ॥५॥

५५
माझीया देहाचें सांडणें करीन । तुज वोवाळीन चारी देहे ॥१॥
चारी देहे त्यांची व्यर्थ थानमानें । कुर्वंडी करणें देवराया ॥२॥
देवराया जीवें प्राणें वोवाळीन । हृदईं धरीन रात्रंदिवस ॥३॥
रात्रंदिवस मज देवाची संगती । तेची मज गती सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ माझा सार्थक जाहला । देव सांपडला भक्तपणें ॥५॥


लक्षणे – ५६ ते ६०

५६
माजा देहे तुज देखतां पडावा । आवडी हे जीवा फार आहे ॥१॥
फार होती परी पुरली पाहातां । चारी देहे आतां हारपले ॥२॥
हारपले माझे सत्य चारी देहे । आतां निःसंदेहे देहातीत ॥३॥
देहातीत जाले देहा देखतांची । चिंतीलें आतांसी सिद्ध जालें ॥४॥
सिद्ध जालें माझें मनीचें कल्पीलें । दास म्हणे आले प्रत्ययासी ॥५॥

५७
उतावेळ चित्त भेटीचें आरत । पुरवीं मनोरथ मायबापा ॥१॥
रात्रंदिवस जीव लागलास झासा । उच्चाट मानसा वाटतसे ॥२॥
पराधीन जीणें काये करूं रामा । नेईं निजधामा माहियेरा ॥३॥
तुजवीण रामा मज कोण आहे । विचारूनी पाहे मायबाप ॥४॥
रामी रामदास बहु निर्बुजला । मीतूपणा ठेला बोळउनी ॥५॥

५८
राघवाचें घरीं सदा निरूपण । श्रवण मनन निजध्यास ॥१॥
निजध्यासें सत्य प्रचीत बाणली । साक्षात्कारें जाली सायुज्यता ॥२॥
स्वायुज्यता मुक्ती विवेकें पाहावी । अंतरीं राहावी विचारणा ॥३॥
विचारणा सारासार थोर आहे । अनुभवें पाहें साधका रें ॥४॥
साधका रें साध्य तूंची तूं आहेसी । रामी रामदासीं समाधान ॥५॥

५९
ज्ञाता ज्ञान ज्ञेये ध्याता ध्यान ध्येये । बोधें साध्य होये साधक तो ॥१॥
साधकु तो वस्तु होउनी राहिला । दृश्य द्रष्टा गेला हारपोनी ॥२॥
हारपोनी गेलें कार्य तें कारण । ठाकलें मरण येणें जाणें ॥३॥
येणें जाणें गेलें निरूपणासरिसें । ब्रह्म निजध्यास ब्रह्मरूप ॥४॥
ब्रह्म रूपातीत अच्युत अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥

६०
राजा सांडूनीया प्रजांचा सेवक । त्यासी कोणी येक रागिजेल ॥१॥
रागेजेना कोण्ही राव वोळगतां । तैसें भगवंता वोळगावें ॥२॥
वोळगावें भावें देवा निर्गुणा । भजतां गुणासी नाश आहे ॥३॥
नाश आहे गुणा पाहावें निर्गुणा । योगियांच्या खुणा वोळखाव्या ॥४॥
वोळखतां खूण श्रवण मननें । आत्मनिवेदनें दास म्हणे ॥५॥


लक्षणे – ६१ ते ६५

६१
सर्व धर्म कर्म हातींचें सांडावें । सत्वर धुंडावें शाश्वतासे ॥१॥
शाश्वतासी ठाईं पाडावें विवेके । निरूपणें येकें साधुसंगें ॥२॥
साधुसंगें बोध साधूनीयां घ्यावा । वेगची करावा चमत्कार ॥३॥
चमत्कारें आतां प्रचीत बाणावी । स्थिती वोळखावी सज्जनाची ॥४॥
सज्जनाची स्थिती सज्जन जाणती । साधकांसी गजी दास म्हणे ॥५॥

६२
तीर्थें व्रतें तपें ज्यालागी शिणावें । त्यासी कां नेणावें विवेकानें ॥१॥
विवेकानें अविवेकची करावा । निस्चयो धरावा बहुविधा ॥२॥
बहुविध जरी बाणला निश्चयो । त्यासी होये लयो वेळ नाहिं ॥३॥
वेळ नाहिं बहु रूप संव्हारतां । शाश्वत पाहतां आडळेना ॥४॥
आडळेना जंव दिसेना लोचना । ठाउकें सज्जना दास म्हणें ॥५॥

६३
सृष्टीची रचना सर्वत्र पाहाती । विवेकें राहाती ऐसे थोडे ॥१॥
ऐसे थोडे जन जया आत्मज्ञान । नित्य निरंजन वोळखीला ॥२॥
वोळखीला देव वोळखीला भक्त । वोळखीला मुक्त योगीराज ॥३॥
योगीयांसी योग आहे निरंतर । वियोगें इतर वर्तताती ॥४॥
वर्तताती ऐसें कदा न करावें । सार्थक करावें दास म्हणे ॥५॥

६४
सृष्टी नांदताहे सर्व लोक पाहे । तयांवरी आहे परब्रह्म ॥१॥
परब्रह्म आहे निर्मळ निश्चळ । चंचळ चपळ सृष्टी नांदें ॥२॥
सृष्टी नांदें तेंची शोधवें अंतर । नित्य निरंतर वोळखावें ॥३॥
वोळखावें निजगुज वेदबीज । सहजीं सहज सदोदीत ॥४॥
सदोदीत देव येर सर्व माव । ऐसा अभिप्राव दास म्हणे ॥५॥

६५
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥
पावतसे दश भुजा उचलून । माझा पंचानन कईवारी ॥२॥
कैवारी देव हा व्याघ्राच्या स्वरूपें । भूमंडळ कोपें जाळूं शके ॥३॥
जाळूं शके सृष्टी उघडीतां दृष्टी । तेथे कोण गोष्टी इतरांची ॥४॥
इतरांची शक्ती शंकराखालती । वांचविली क्षिती दास म्हणे ॥५॥


लक्षणे – ६६ ते ७०

६६
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥२॥
महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥
उच्चारीतां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥
कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास म्हणे जना सावधान ॥५॥

६७
द्रव्य दारा जनी कदा नव्हे धणी । तसें नाम वाणी असों द्यावें ॥१॥
रात्रंदिवस द्रव्यदारेंचें चिंतन । तैसें लावी मन राघवासी ॥२॥
राघवासी मन लागितां आनंद । तेणें तुटे खेद संसारीचा ॥३॥
संसारीचा केद संसारिकां होय । जया नाहिं सोय राघवाची ॥४॥
राघवाची सोय पुर्वपुण्यें होय । अंतीचा उपाय दास म्हणे ॥५॥

६८
देवाचीये पोटीं आयुष्याच्या कोटीं । ऐशा किती सृष्टी होती जाति ॥१॥
होते एजाती किती रंक जीव जंतु । अप्री तो अनंतु जैसा तैसा ॥२॥
जैसा तैसा देव आम्हां सांपडला । संदेह तुटला फुटायाचा ॥३॥
फुटायाचा भाव फुटोनियां गेला । थोर लाभ जाला शाश्वताचा ॥४॥
शाश्वताचा लाभ रामीं रामदासीं । कल्पांती तयासी भय नाहिं ॥५॥

६९
धन्य माझें भाग्य जालें सफळीत । देव सप्रचीत जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें देव येर सर्व माव । माझा अंतर्भाव निवळला ॥२॥
निवळला भाव निर्गुणीं लागतां । विवेकें जाणतां नित्यानित्य ॥३॥
नित्यानित्य बरें शोधुनि पाहिलें । मन हें राहिलें समाधानें ॥४॥
समाधानें मन जाहालें उन्मन । शुद्ध ब्रह्मज्ञान रामदासीं ॥५॥

७०
माझें मीतूंपण विवेकानें नेलें । देवाजीनें केलें समाधान ॥१॥
मी देह म्हणतां केल्या येरझारा । चुकविला फेरा चौर्‍यासीचा ॥२॥
आपुल्या सुखाचा मज दिल्हा वांटा । वैकुंठीच्या वाटा कोण धांवे ॥३॥
देवासी नेणतां गेले बहु काळ । सार्थकाची वेळ येकायेकी ॥४॥
येकायेकी येक देव सांपडला । थोर लाभ जाला काय सांगों ॥५॥


लक्षणे – ७१ ते ७५

७१
कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश । विद्येचा अभ्यास तेथें कैंचा ॥१॥
तेथे कैंचा देव कैचा तेथे धर्म । कर्माकर्म कळेचीना ॥२॥
कळेना परीक्षा चातुर्यमर्यदा । लागतसे सदा पोटधंदा ॥३॥
पोटधंदा नीच जनाची संगति । तेथें कैंची गती विवेकाची ॥४॥
विवेकाची गती सज्जनसंगती । दास म्हणे स्थिती पालटावी ॥५॥

७२
देवा तुझी पागा थोर देते दगा । धान्य वस्त्रें कीं गा नासीयेलीं ॥१॥
नासीयेलीं घरें पाडिली विवरें । घरांत उकीरें ढीग केलें ॥२॥
ढीग केले रानीं वनीं ते पर्वती । मोकाटें हिंडती चहुंकडे ॥३॥
चहुंकडे तया वेर्थ बाळगीसी । तुंहि लवंडसी क्षणक्षणा ॥४॥
क्षणक्षणा देवा रागहि येतोसी । दास म्हणे ऐसी स्थिती नव्हे ॥५॥

७३
पिंपळाची भक्ती केल्यां नव्हे मुक्ती । उगेची फिरती दुराशेनें ॥१॥
दुराशेची फेरी घेती नानापरी । कामना अंतरीं धरूनीयां ॥२॥
धरूनीयां भाव माईकची माव । तेणें मुख्यदेव अंतरला ॥३॥
अंतरला देव असोनी अंतरीं । दंभ लोकाचरी लोकलाज ॥४॥
लोकलाज कांहिं सेवट करीना । जन्म चुकवीना दास म्हणे ॥५॥

७४
शिमग्याचा खेळ बोंबेचा सुकाळ । बोलणें बाष्फळ जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें भंड उभंड वाचाळी । राख माती धुळी शेणकाला ॥२॥
शेणकाला पाणी तडक मारिती । तेथें न्यायनीती कोठें आहे ॥३॥
आहे तेथें आहे विचारूनि पाहे । बाष्फळ न साहे नेमकासी ॥४॥
नेमकाचा संग भाग्याचा उदयो । दास म्हणे जयो प्रपत होतो ॥५॥

७५
संसाराची आलें देवासी चुकलें । प्राणी आलें गेलें वायांविण ॥१॥
वायांविण सीण केला जन्मवरी । मायामोहपुरी वाहोनियां ॥२॥
वाहोनियां जीवें भोगिली आपदा । आत्महित कदा केलें नाहिं ॥३॥
केलें नाहिं आतां ऐसें न करावें । विवेकें भरावें निरूपणीं ॥४॥
निरूपणीं सारासार विचारणें । दास म्हणे येथें समाधान ॥५॥


लक्षणे – ७६ ते ८०

७६
श्रवण ह्मणिजे ऐकतची जावें । बरें विवरावें ग्रन्थांतरीं ॥१॥
ग्रन्थांतरीं कळे तें मुखें बोलावें । कीर्तन जाणावें याचें नंव ॥२॥
नांव घ्यावें साचें सर्वदा देवाचें । तिसरें भक्तीचे लक्षण हे ॥३॥
लक्षण चौथीचें तें ऐसे जाणावें । पाउले सेवावें सद्गुरूचे ॥४॥
गुरूदेवपूजा तेची ते अर्चन । साहावें वंदन नमस्कार ॥५॥
नमस्कार कीजे सर्व दास्यभावें । भक्तीचें जाणावें लक्षण हें ॥६॥
लक्षण हें सख्य आठवें भक्तीचें । सांगावें जीवीचें देवापासीं ॥७॥
देवापासी होतां उरेना मीपण । आत्मनिवेदन रामदासीं ॥८॥

७७
आरंभी वंदीन बिघ्नविनाशक । मुख्य देव येक कळावया ॥१॥
कळावया कांहिं आपुलें स्वहीत । सत्क्रिया विहित वेदाधारें ॥२॥
वेदाधारें क्रिया ज्ञान प्रचीतीचें । तरीच मनाचें समाधान ॥३॥
समाधान होतें श्रवणमननें । सगुणभजनें अनुतापें ॥४॥
अनुतापें त्याग तोची येक योग । देवाचा संयोग दास म्हणे ॥५॥

७८
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । निसंदेह मनीं सर्वकाळ ॥१॥
मिथ्या देहभान प्रारब्धा आधीन । राखे समाधान पूर्णपणें ॥२॥
आवडिनें करी कर्मउपासना । सर्वकाळ ध्यानरूढ मन ॥३॥
जाणे ब्रह्मज्ञान स्वयें उदासीन । मानितो वमन द्रव्यदारा ॥४॥
पदार्थाची हाणी होतां नये कोणी । जयाची करणी बोलाऐसी ॥५॥
दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव ॥६॥

७९
जाणावा तो योगी सदा वीतरागी । अहंभाव त्यागी अंतरींचा ॥१॥
स्वजन स्वदेश सांडुनि उदास । तेणें आशापाश तोडियेला ॥२॥
रमा सरस्वती वैभव व्यत्पत्ती । ज्ञानबळें चित्तीं चाड नाहीं ॥३॥
पूर्णी पूर्णकाम तेणें जो निःकाम । विषयांचा श्रम तुच्छ केला ॥४॥
विवेकाचें बळ जाहलें प्रबळ । बाह्य मायाजाळ त्यागियेला ॥५॥
धन्य तो पैं दास संसारी उदास । तया रामदास मानितसे ॥६॥

८०
लाज हे पापिणी लागलीसे पाठीं । तेणें नव्हे भेटी राघवाची ॥१॥
राघवाची भेटी तरीच लाहिजे । कीर्तनीं राहिजे क्षण येक ॥२॥
क्षण येक मन राघवीं असावें । दुश्चित नसावें सर्वकाळ ॥३॥
सर्वकाल गेला देवा न भजतां । कैसे परी आतां परलोक ॥४॥
परलोकीं पुण्यशीळ होती धन्य । रामदासी मान्य हरिभक्ती ॥५॥


लक्षणे – ८१ ते ८५

८१
दुर्जना दुर्जना होय समाधान । येकांमेकां मानें भेटताती ॥१॥
दुधगा चालीला वृंदावना भेटी । काळकुट पोटीं भरूनियां ॥२॥
आगीयाचे भेटी मिरगोड चालिलें । येकमेकां आलें प्रेम दुणें ॥३॥
आरांटी बोरांटी रिंगणी सराटीं । काचकुहिरी भेटी भेटों आल्या ॥४॥
सेबी सागरगोटी निवडंग वाघांटी । कांटी आली भेटी दास म्हणे ॥५॥

८२
सोहं हंसा म्हणिजे तो मी तो मी ऐसें । हें वाक्य विश्वा विवरावें ॥१॥
विवरावें अहं ब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंची येक ॥२॥
तूंचि येक ब्रह्म हेंचि महावाक्य । परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ॥३॥
अर्थबोध रामी रामदास जाला । निर्गुण जोडला निवेदनें ॥४॥

८३
राघवाची कथा पतीतपावन । गाती भक्तजन आवडीनें ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासीचा राणा लांचावला ॥२॥
देवांचे मंडण भक्तांचें भूषण । धर्मसंरक्षण राम येक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्यांचें जीणें । कथानिरूपणे जन्म गेला ॥४॥

८४
संगती सज्जन कतानिरूपण । सगुणे पाविजेतें ॥१॥
सगुणाची भक्ती केल्या होय मुक्ती । ऐसें वेदश्रुती बोलतसे ॥२॥
भक्तिविणें ज्ञान कदा पाविजेना । हें वाक्य सज्जना अंतरीचें ॥३॥
रामदास म्हणे साराचेंहि सार । सर्वांसी आधार भक्तिभाव ॥४॥

८५
घडेना नसे भाव त्या भक्ति कांहीं । नसे भक्ति न्या मुक्ति होणार नाहीं । म्हणोनी मना भक्ति ते सार आहे । विवेकें अती शांतिं होऊनि राहे ॥१॥


लक्षणे – ८६ ते ९०

८६
भावेंविण भक्ती भक्तीविण मुक्ती । मुक्तीवीण शांति आढळेना ॥१॥
भावें भक्ती सार भक्ती भावें सार । पावे पैलपार विश्वजन ॥२॥
भावभक्तीविण उद्धरला कोण । यालागी सगुण भक्तीभाव ॥३॥
रामदास म्हणे दक्ष ज्ञानी जाणे । भक्तीचीये खुणे पावईल ॥४॥

८७
भजनरहित ज्ञानें मोक्ष होणार नाहीं । सकळ निगम त्यंचें सार शोधूनि पाहीं । सगुणभजन मागें रक्षिलें थोरथोरीं । अधम नर तयांचें ज्ञान संदेहकारी ॥१॥

८८
भक्तीविण ज्ञान त्या नांव अज्ञान । जाणती सज्ञान संतजन ॥१॥
पायाविणें थोर केलें दामोदर । पावतां संव्हार वेळ नाहिं ॥२॥
तारूविण नांव तो नव्हे उपाव । ठाकवेना ठाव पैलथडी ॥३॥
रामदास म्हणे शुद्ध उपासनें । विश्रांती पावणें केवी घडे ॥४॥

८९
भजन रघुविरांचें पाहातां सार आहे । अगणित तुळणा हें सर्व कांहीं न साहे । भुषण हरिजनाचें ध्यान योगीजनाचें । स्वहित मुनिजनाचें गूज हें सज्जनाचों ॥१॥

९०
राघवाची भक्ती ज्ञानाचे मंडण । भक्तांचें भूषण राम येक ॥१॥
नलगे पिंडज्ञान नलगे तत्त्वज्ञान । राघवाचें ध्यान आठवितां ॥२॥
शब्दज्ञान पोथी वाचितां प्रबळे । मागुतें मावळे क्षण येका ॥३॥
रामीरामदासी राघवाची भक्ती । तेथें चारी मुक्ती वोळंगती ॥४॥


रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें समाप्त .