दासबोध दशक विसावा

दासबोध दशक नववा

दासबोध दशक नववा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक नववा : गुणरूप

समास पहिला : आशंकानाम
॥ श्रीराम ॥

निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये ।
निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥
या समासात श्रोत्यांनी अनेक शंका विचारलेल्या आहेत म्हणून त्याला हे नाव दिले असावे. श्रोता विचारत आहे की, निराकार म्हणजे काय ? निराधार म्हणजे काय ? व निर्विकल्प म्हणजे काय हे मला समजावून सांगावे. (१)

निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं ।
निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥
वक्ता म्हणत आहे की, परब्रह्माला निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही आणि निर्विकल्प म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पना नाही. (२)

निरामय म्हणिजे काये । निराभास म्हणिजे काये ।
निरावेव म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ३ ॥
निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निसवेव म्हणजे काय, हे मला सांगावे. (३)

निरामय म्हणिजे जळमये नाहीं । निराभास म्हणिजे भासचि नाहीं ।
निरावेव म्हणिजे अवेव नाहीं । परब्रह्मासी ॥ ४ ॥
निरामय म्हणजे जे जलमय नाही. आमय म्हणजे विकार जलमय होणे हा प्रलयकाळचा ब्रह्मांडविकार होय. हा विकार नसलेले ते निरामय म्हणजे परब्रह्म. निराभास म्हणजे जेथे भास नाही आणि निरावेव म्हणजे ज्याला अवयव नाहीत, ते परब्रह्म. (४)

निःप्रपंच म्हणिजे काये । निःकळंक म्हणिजे काये ।
निरोपाधी म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ५ ॥
निःप्रपंच म्हणजे काय ? निःकळंक म्हणजे काय ? आणि निरोपाधी म्हणजे काय, ते मला सांगावे. (५)

निःप्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं । निःकळंक म्हणिजे कळंक नाहीं ।
निरोपाधी म्हणिजे उपाधी नाहीं । परब्रह्मासी ॥ ६ ॥
निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निःकळंक म्हणजे कलंक नाही आणि निरूपाधी म्हणजे ज्याला उपाधी नाही, ते परब्रह्म होय. (६)

निरोपम्य म्हणिजे काये । निरालंब म्हणिजे काये ।
निरापेक्षा म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ७ ॥
निरोपम्य म्हणजे काय, नियलस्व म्हणजे काय व निसपेक्ष म्हणजे काय ते मला सांगावे. (७)

निरोपम्य म्हणिजे उपमा नाहीं । निरालंब म्हणिजे अवलंबन नाहीं ।
निरापेक्षा म्हणिजे अपेक्षा नाहीं । परब्रह्मासी ॥ ८ ॥
निरोपम्य म्हणजे पद्याला उपमा नाही, निगलंब म्हणजे ज्याला आधार नाही आणि निसपेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षा नाही, ते परब्रह्म असे जाणावे. (८)

निरंजन म्हणिजे काये । निरंतर म्हणिजे काये ।
निर्गुण म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ९ ॥
निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय, ते मला सांगावे. (९)

निरंजन म्हणिजे जनचि नाहीं । निरंतर म्हणिजे अंतर नाहीं ।
निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १० ॥
निरंजन म्हणजे जेथे जन नाहीत, सर्व लोकादी वृष्टीच जेथे झालेलीच नाही ते. निरंतर म्हणजे कमी- अधिकपणाचा परिणाम नसलेले आणि निर्गुण म्हणजे जे गुणरहित आहे, ते परब्रह्म जाणावे. (१०)

निःसंग म्हणिजे काये । निर्मळ म्हणिजे काये ।
निश्चळ म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ११ ॥
निःसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय आणि निश्चळ म्हणजे काय, हे मला सांगावे. (११)

निःसंग म्हणिजे संगचि नाहीं । निर्मळ म्हणिजे मळचि नाहीं ।
निश्चळ म्हणिजे चळण नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥
निःसंग म्हणजे ज्याला संग नाही, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही आणि निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलनवलन नाही, ते परब्रह्म असे जाणावे. (१२)

निशब्द म्हणिजे काये । निर्दोष म्हणिजे काये ।
निवृत्ती म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १३ ॥
निःशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय, ते मला सांगावे. (१३)

निशब्द म्हणिजे शब्दचि नाही । निर्दोष म्हणिजे दोषचि नाही ।
निवृत्ति म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥
निःशब्द म्हणजे जेथे शब्दच नाही, निर्दोष म्हणजे जेथे दोषच नाही आणि निवृत्ती म्हणजे जेथे वृत्तीच नाही, असे परब्रह्म होय. (१४)

निःकाम म्हणिजे काये । निर्लेप म्हणिजे काये ।
निःकर्म म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १५
निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय आणि निष्कर्म म्हणजे काय, ते मला सांगावे. (१५)

निःकाम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे लेपचि नाहीं ।
निःकर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६
निष्काम म्हणजे जेथे कामच नाही, निर्लेप म्हणजे जेथे लेपच नाही आणि निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही, ते परब्रह्म असे जाणावे. (१६)

अनाम्य म्हणिजे काये । अजन्मा म्हणिजे काये ।
अप्रत्यक्ष म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १७ ॥
अनाय्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, हे मला सांगावे. (१७)

अनाम्य म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि नाहीं ।
अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥
अनाभ्य म्हणजे ज्याला नामच नाही, अजन्मा म्हणजे ज्याला जन्मच नाही आणि अप्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष नाही, ते परब्रह्म होय. (१८)

अगणित म्हणिजे काये । अकर्तव्य म्हणिजे काये ।
अक्षै म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १९ ॥
अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय आणि अक्षय म्हणजे काय, हे मला सांगावे. (१९)

अगणित म्हणिजे गणित नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्यता नाहीं ।
अक्षै म्हणिजे क्षयचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥
अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही ते, अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही ते आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षयच नाही, ते परब्रह्म असे जाणावे. (२०)

अरूप म्हणिजे काये । अलक्ष म्हणिजे काये ।
अनंत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २१ ॥
अरूप म्हणजे काय, अल्प म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय, हे मला सांगावे. (२१)

अरूप म्हणिजे रूपचि नाहीं । अलक्ष म्हणिजे लक्षत नाहीं ।
अनंत म्हणिजे अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥
अरूप म्हणजे ज्याला रूपच नाही, अलक्ष म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, ते परब्रह्म होय. (२२)

अपार म्हणिजे काये । अढळ म्हणिजे काये ।
अतर्क्य म्हणिजे काये । मज निरूपावें ॥ २३ ॥
अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय व अतर्क्य म्हणजे काय, हे आपण मला सांगावे. (२३)

अपार म्हणिजे पारचि नाहीं । अढळ म्हणिजे ढळचि नाहीं ।
अतर्क्ये म्हणिजे तर्कत नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥
अपार म्हणजे ज्याला पारच नाही, अढळ म्हणजे जे जसे आहे तसेच असते आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच करवता येत नाही असे ते परब्रह्म होय. (२४)

अद्वैत म्हणिजे काये । अदृश्य म्हणिजे काये ।
अच्युत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २५ ॥
अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय आणि अच्युत म्हणजे काय, ते मला सांगावे. (२५)

अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं । अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं ।
अच्युत म्हणिजे चेवत नाहीं । परब्रह्म तें ॥ २६ ॥
अद्वैतम्हणजेजेथेद्वैतच नाही, अदृश्य म्हणजे जेपाहता येतनाही, आणि अच्युत म्हणजे जे कधी आपल्यास्थानावरून खाली घसरत नाही, ते परब्रह्म असे जाणावे. (२६)

अच्हेद म्हणिजे काये । अदाह्य म्हणिजे काये ।
अक्लेद म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २७ ॥
अच्छेद म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे जळेना ।
अक्लेद म्हणिजे कालवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥
अच्छेद्य म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय आणि अक्लेद म्हणजे काय ते मला सांगावे. अच्छेद्य म्हणजे जे छेदले जात नाही, अदाह्य म्हणजे जे जळत नाही आणि अक्तेद्य म्हणजे जे पाण्याने काक्यता येत नाही, ते परब्रह्म होय. (२७-२८)

परब्रह्म म्हणिजे सकळांपरतें । तयास पाहातां आपणचि तें ।
हें कळे अनुभवमतें । सद्गुपरु केलियां ॥ २९ ॥
याप्रमाणे ज्याचे वर्णन केले जाते ते परब्रह्म सर्वांच्या पलीकडील असून त्याचा शोध घेऊ गेल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव सद्‌गुरू केला असता त्यांच्या कृपेने येतो. (२९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आशंकानाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आशंकानाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : ब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥

जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांतीं नासे ।
स्वरूप तें असतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥
जे जे या जगात आकाराला येते, ते ते सर्व कल्पांती नाश पावते. पण स्वरूपाचा कधीही नाश होत नाही. ते सर्वकाळ जसेच्या तसेच असते. (१)

जें सकळांमधें सार । मिथ्या नव्हे तें साचार ।
जें कां नित्य निरंतर । संचले असे ॥ २ ॥
ते सर्वांचे सार असून तेच सत्य आहे. ते मिथ्या नसून नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापले आहे. (२)

तें भगवंताचें निजरूप । त्यासि बोलिजे स्वरूप ।
याहि वेगळे अमूप । नामें तयाचीं ॥ ३ ॥
तेच भगवंताचे खरे रूप असून त्यालाच स्वरूप असे म्हणतात. याशिवायही त्याची अनेक नामे आहेत. (३)

त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत ।
परी तें स्वरूप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥
त्याचे स्वरूप कळवे म्हणूनच त्याला नामे दिली जातात व दृष्टांत दिले जातात. पण खरे तर ते स्वरूप नामातीत असून ते सदैव जसेच्या तसेच असते. (४)

दृश्यसबाह्य संचलें । परी तें विश्वास चोरले ।
जवळिच नाहीसें जालें । असतचि कैसें ॥ ५ ॥
वास्तविक दृश्य वृष्टीच्या आत-बाहेर सर्वत्र ते कोंदाटले आहे, पण तरी ते जगातील सामान्य लेकांपासून गुप्त राहिले आहे. म्हणून ते अत्यंत जवळ असूनही नाहीच असे लोकांना वाटते. (५)

ऐसा ऐकोनियां देव । उठे दृष्टीचा भाव ।
पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि आवघें ॥ ६ ॥
असे हे देवाचे वर्णन ऐकून लोकांच्या मनात त्यात्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे, असा भाव उत्पन्न होतो. पण त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तो देव तर दिसतच नाही, पण अवघी दृश्य वृष्टीच दिसते. (६)

दृष्टीचा विषयो दृश्य । तोचि जालिया सादृश्य ।
तेणें दृष्टी पावे संतोष । परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥
नेत्रांचा विषयच दृश्य हा आहे. प्रत्यक्ष दिसला असता संतोष होतो. पण ते खरे पाहाणे नव्हेच. (७)

दृष्टीस दिसे तें नासे । येतद्विषईं श्रुति असे ।
म्हणौन जें दृष्टीस दिसे । तें स्वरूप नव्हे ॥ ८ ॥
जे जे दृष्टीला दिसते ते ते नाश पावते या अर्थाची सुती आहे. (यद्‌दृष्ट तटून. म्हणूनच जे जे दृष्टीला दिसते, ते स्वरूप नव्हे. (कारण स्वरूप तर शाश्वत आहे.) (८)

स्वरूप तें निराभास । आणी दृश्य भासलें साभास ।
भासास बोलिलें नास । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥
दृश्य हे भासमय असते म्हणून ते भासते आणि वेदांत शास्त्रात भास हा नाशिवंत असतो असे म्हटले आहे. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी भास मुळीच नाही. (९)

आणी पाहातां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे ।
स्वानुभवें पाहातां दिसे । तें दृश्यासबाह्य ॥ १० ॥
आपण जेव्हा खेळ्यांनी पाहातो, तेव्हा दृश्यच डेळ्याल दिसते. पण आत्मवस्तूही दृश्यावेगळी आहे- च्या वेळी आत्म- वस्तूचा साक्षात अनुभव येतो, तेव्हा ती दृश्याच्या सबाह्य अत्यंतरी व्यापून रहिली आहे, असा अनुभव येतो. (१०)

जें निराभास निर्गुण । त्याची काये सांगावी खूण ।
परी तें स्वरूप जाण । सन्निधचि असें ॥ ११
जे आभासरहित, गुणरहित आहे, त्याची खूण तरी कशी काय सांगणार ? पण ते स्वरूप आपल्या अगदी जवळच असते. (११)

जैसा आकाशीं भासला भास । आणी सकळांमध्यें आकाश ।
तैसा जाणिजे जगदीश । सबाह्य अभ्यांतरीं ॥ १२ ॥
जसे आकाशातच सर्व भास भासतात आणि सर्वांमध्ये आकाशच व्यापून असते, त्याप्रमाणे जगदीशही सर्व जगास सबाह्य अध्यंतरी व्यापून राहिलेला असतो. (१२)

उदकामधें परी भिजेना । पृथ्वीमधें परी झिजेना ।
वन्हीमधें परी सिजेना । स्वरूप देवाचें ॥ १३ ॥
स्वरूप पाण्यामध्ये असते, तरी ते भिजत नाही. पृथ्वीमध्ये असते तरी ते झिजत नाही. अग्रीमध्ये असले तरी शिजत नाही, असे देवाचे स्वरूप विलक्षण आहे. (१३)

तें रेंद्यामधें परी बुडेना । तें वायोमधें परी उडेना ।
सुवर्णीं असे परी घडेना । सुवर्णासारिखें ॥ १४ ॥
ते चिखलात असते तरी बुडत नाही आणि वायूमध्ये असते तरी उडत नाही आणि सुवर्णात असून सुवर्णासारखे ते घडविता येत नाही. (१४)

ऐसें जें संचलें सर्वदा । परी ते आकळेना कदा ।
अभेदामाजीं वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥
असे ते सदा सर्वत्र संचल्लै असूनही ते कधीही कळून येत नाही. अशा त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे भेद वाढतो. (१५)

तिच्या स्वरूपाची खूण । सांगों कांहीं वोळखण ।
अहंतेचें निरूपण । सावध ऐका ॥ १६ ॥
ती अहंता कशी असते हे ओळखता यावे म्हणून तिच्या स्वरूपाची खूण वर्णन करून सांगतो. तरी आता अहेतेचे निरूपण सावध होऊन ऐका. (१६)

जे स्वरूपाकडे पावे । अनुभवासवें झेंपावे ।
अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी ॥ १७ ॥
अहंता स्वरूपाकडे वड्ये (म्हणजे ‘अहं ब्रह्मास्मि’) असे चिंतन घडू लागते. तसे अनुसंधान होता होता स्वस्वरूपानुभव येतो. मग ती अहंता आपला अनुभव शब्दांत बोलून दाखवते. (१७)

म्हणे आतां मीच स्वरूप । तेंचि अहंतेचें रूप ।
निराकारीं आपे ंआप । वेगळी पडे ॥ १८ ॥
ती म्हणते की, ‘मीच स्वरूप आहे’ असे म्हणणे हेच अहेतेचे रूप आहे. ‘मीच स्वरूप’ असे म्हणताना साहजिकच जाणीव मी रूपाने आणि स्वरूप रूपाने द्विधा झालेली असते, म्हणून निराकार ब्रह्मापासून वेगळी पडते. (१८)

स्वयें मीच आहे ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम ।
ऐसियें सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहातां दिसे ॥ १९
मीच स्वतः ब्रह्म आहे, असे म्हणताना अहेतेचा भूम अजून कायम आहे. हेच सूक्ष्म ब्रह्मासंबंधी सूक्ष्म विचार केल्यावर कळून येते. (१९)

कल्पना आकळी हेत । वस्तु कल्पनातीत ।
म्हणौन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥
‘अहं ब्रह्मास्मि’ हा भाव कल्पनेने जाणता येतो. पण वस्तू तर कल्पनातीत आहे. अनंताचा अंत जाणताच येत नाही. कारण अनंताचा शोध घेणारा अनंताशी एकरूप होतो. त्याचे अस्तित्वच राहत नाही. (२०)

अन्वये आणि वीतरेक । हा शब्द कोणीयेक ।
निशब्दाच अंतरविवेक । शोधिला पाहिजे ॥ २१ ॥
अन्वय म्हणजे उभारणी व व्यतिरेक म्हणजे संहारणी हा केवळ शाब्दिक भेदच असतो. जेथे शब्द पोहोचूच शकत नाही, त्या निःशब्दाचा म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपाचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. (२१)

आधीं घेईजे वाच्यंश । मग वोळखिजे लक्ष्यांश ।
लक्ष्यांशीं पाहातां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥
आधी शब्दार्थाकडे लक्ष द्यावे. मग त्यात जो गूढ भावार्थ असेल तो लक्षात घ्यावा. लक्ष्यार्थाचे चिंतन करू लग्नाले की वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मागे पडतो. (२२)

सर्वब्रह्म आणी विमळब्रह्म । हा वाच्यांशाचा अनुक्रम ।
शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नसे ॥ २३ ॥
सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म यात केवळ शब्दार्थाचाच भेद आहे. लक्ष्मांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्हींनी निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे हे कळून येते आणि ते परब्रह्म तर शब्दाच्या पलीकडील आहे. तेथे वाच्यांश पोहोचूच शकत नाही. (२३)

सर्व विमळ दोनी पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष ।
लक्ष्यांशी लावीता लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥
सर्व ब्रह्म व विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशात आटून जातात हे प्रत्यक्ष दिसते. दोन्हींच्या लक्ष्मांशाकडे लक्ष केंद्रित केले की हे दोन्ही पक्ष गळून पडतात म्हणजे दोन्हीचा भावार्थ परब्रह्म एकले एकच असा होतो. (२४)

हें लक्ष्यांशें अनुभवणें । येथें नाहीं वाच्यांश बोलणे ।
मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैंचा ॥ २५ ॥
लक्ष्यांशाचे अनुसंधान करून अनुभव घ्यावा. स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कामच राहात नाही. ही खूण अनुभवण्याची आहे. तेथे वाचेचे कामच उरत नाही. (२५)

परा पश्यंती मधेमां वैखरी । जेथें वोसरती च्यारी ।
तेथें शब्द कळाकुंसरी । कोण काज ॥ २६ ॥
ज्या परब्रह्माच्या ठिकाणी पस, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चारी वाचा ओसरतात, पोहोचू शकत नाहीत, तेथे शब्दपांडित्य काय कामाचे ? (२६)

शब्द बोलतां सवेंच नासे । तेथें शाश्वतता कोठें असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । बरें पाहा । २७ ॥
शब्द उच्चारला गेला की लगेच तो नाहीसा होतो. मग तेथे शाश्वतता कोठे आहे ? ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. (२७)

शब्द प्रत्यक्ष नासिवंत । म्हणोन घडे पक्षपात ।
सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८
शब्द प्रत्यक्ष नाशिवंत असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद, मतभेद नष्ट होतात. तेथे सर्व ब्रह्म की विमल ब्रह्म असा प्रश्न उरत नाही, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो. (२८)

ऐक अनुभवाचें लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्य जाण ।
ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे॥ २९ ॥
आता अनुभवाचे लक्षण ऐक. अनुभव म्हणजे अनन्य म्हणजेच जेथे अन्य नाही, ते एकले एक स्वस्वरूप तेच आपण होणे. (२९)

अनन्य म्हणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें ।
संगभंगें असतचि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥
अनन्य म्हणजे दुसरा कुणी नसणे म्हणजेच आत्मनिवेदन असे जाणावे. मीपणाच्या त्यागानंतर ‘मी आत्मा’ या अनुभवातील ‘मी’ ची जाणीव नष्ट झाल्यावर तलतेने केवळ आत्याच उरतो. (३०)

आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि निःसंगाचें लक्षण ।
हें वाच्यांशें बोलिले जाण । कळावया कारणें ॥ ३१ ॥
आल्याच्या ठिकाणी ‘मी आत्मा’ ही जाणीवही नसते. हे निःसंगाचे लक्षण होय. वास्तविक ह्या अवस्थेचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही, पण कळावे यासाठी सांगणे भाग पडते. (३१)

येरवीं लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडे कैसें ।
वाक्य विवरणें अपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥
एरवी जो क्लाश असतो तो वाच्यांशाने म्हणजे केवळ शब्दार्थाने सांगणे शक्य नसते. पण त्या लक्ष्यांशाचे सूक्ष्म बुद्धीने विवरण केले की, तो आपोआप कळू लागतो. (३२)

करावें तत्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण ।
पाहावें आपणास आपण । म्हणिजे कळे ॥ ३३ ॥
तत्त्वांचे विवरण करून निर्गुण ब्रह्माचा शोध घेण्याचा अभ्यास करावा म्हणजे आपल्या ख्या स्वरूपाचे ज्ञान होते व अनुसंधानाने स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. (३३)

हें न बोलतांच विवरिजे । विवरोन विरोन राहिजे ।
मग अबोलणेंचि साजे । माहापुरुषीं ॥ ३४ ॥
न बोक्याच या सांगण्याचे मनन करावे व तेथेच तन्मय होऊन रहावे. असे तन्मय झाले महापुरुषच नुसत्या कृपादृष्टीने साधकात स्वानुभव संचरित करू शकतात. त्यांचे मौन हेच खरे प्रवचन ठरते. (३४)

शब्दचि निशब्द होती । श्रुति नेति नेति नेति म्हणती ।
हें तों आलें आत्मप्रचिती । प्रत्यक्ष आतां ॥ ३५ ॥
स्वरूपापर्यंत शब्द पोहोचूच शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचीती आली की तुती त्याचे ‘नेति, नेति’ म्हणून वर्णन का करतात हे कड्ये. (३५)

प्रचित आलियां अनुमान । हा तों प्रत्यक्ष दुराभिमान ।
तरी आतां मी अज्ञान । मज कांहींच न कळे ॥ ३६ ॥
असा अनुभव आल्यावरही अनुमान करीत सहाणे म्हणजे प्रत्यक्ष दुरभिमानच आहे आणि अभिमान जेथे असतो तेथे अज्ञान असतेच. त्यामुळे असा दुरभिमानी जो, त्याला काहीच कळत नसते. (३६)

मी लटिका माझें बोलणें लटिकें । मी लटिका माझें चालणें लटिकें ।
मी माझें अवघेंचि लटिकें । काल्पनिक ॥ ३७ ॥
आपण ज्याला ‘मी’ म्हणतो तो तर खोडच असतो, त्यामुळे त्या ‘मी’ चे बोलणे, चालणे, मी माझे म्हणणे वगैरे सर्वच काल्पनिक लटके असते. (३७)

मज मुळींच नाहीं ठाव । माझे बोलणें अवघेंचि वाव ।
हा प्रकृतीचा स्वभाव । प्रकृती लटिकी ॥ ३८ ॥
‘मी’ पणालाच जेथे स्थान नाही, तेथे माझे सर्व बोलणेही व्यर्थच होय. हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसारच घडते आणि प्रकृती ही खोटी भासमय आहे. (३८)

प्रकृती आणी पुरुष । यां दोहींस जेथें निरास ।
तें मीपण विशेष । हें केवि घडे ॥ ३९ ॥
स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप स्कृरण व पुरुष म्हणजे शुद्ध जाणीव या दोहींचा निरास होतो, तेथे ‘मी’ ही विशेष भावना राहीलच कशी ? (३९)

जेथें सर्व हि अशेष जालें । तेथें विशेष कैंचे आलें ।
मी मौनी म्हणतां भंगलें । मौन्य जैसें ॥ ४० ॥
जेथे सर्व दृश्य निःशेष झाले, तेथे ‘मी पण’ हे विशेष तरी कसे राहील ? एखाद्या माणसाने म्हणावे की ‘मी मौनी आहे’ म्हणजे त्याच्या या बोलण्यानेच त्याचे मौन भंग पावते, तसेच जे निःशेष आहे, त्याला विशेष ठरविल्याने घडते. (४०)

आतां मौन्य न भंगावें । करून कांहींच न करावें ।
असोन निशेष नसावें । विवेकबळें ॥ ४१
म्हणून आता स्वरूपानुभव घ्यावा, पण मौन भंगू देऊ नये. सर्व करीत असूनही काही करू नये. म्हणजे देहाने व्यवहार करीत असूनही अंतर्यामी पूर्णपणे मीपणाविरहत विवेकाच्या बळावर असावे. (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
ब्रह्मनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘ब्रह्मनिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : निःसंदेह निरूपण
॥ श्रीराम ॥

श्रोतीं केला अनुमान । ऐसें कैसें ब्रह्मज्ञान ।
कांहींच नाहीं असोन । हें केवि घडे ॥ १ ॥
मागील निरूपण ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला की असे कसे ब्रह्मज्ञान ? ब्रह्म असून काहीच नाही हे कसे शक्य आहे ? (१)

सकळ करून अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता ।
सकळांमधें अलिप्तता । येईल कैसी ॥ २ ॥
सर्व करून अकर्ता सहाणे, सर्व भोगून अभोक्ता असणे आणि सर्वांत राहून अलिसता हे कसे शक्य होईल ? (२)

तथापि तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता ।
स्वर्गनरकहि आतां । येणेंचि न्यायें ॥ ३ ॥
तथापि तुम्ही म्हणता की, योगी हा सर्व भोगून अभोक्ता असतो, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच .न्याय लागू पडतो की काय ? (३)

जन्म मृत्यु भोगिलेच भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी ।
यातना हि तयालागीं । येणेंचि पाडें ॥ ४ ॥
जरी जन्ममृत्यू भोगावे लागले, तरी ते भोगूनही तो अभोक्ताच असतो का ? मग याच न्यायाने तो यातनाही भोगून भोगत नाही, असे म्हणायचे का ? (४)

कुटून नाहीं कुटिला । रडोन नाहीं रडला ।
कुंथोन नाहीं कुंथिला । योगेश्वर ॥ ५ ॥
याचा अर्थ असा होतो का की, त्याला कुणी मारून कुटून काढला तरी तो मार खातच नाही. दुःखाने रडूनही रडत नाही. कण्हत कुंथत असूनही तो योगेश्वर कुंथत कण्हत नाही. (५)

जन्म नसोन घातला । पतित नसोन जाला ।
यातना नसोन पावला । नानापरी ॥ ६ ॥
जन्म घेऊनही जन्मत नाही, पतित नसून पतित होतो आणि यातना नसूनही नाना यातना भोगतो. (६)

ऐसा श्रोतयांचा अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान ।
आतां याचें समाधान । केलें पाहिजे ॥ ७ ॥
वक्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आडरानात शिरून अनेक आक्षेप घेतले. तेव्हा आता याचे समाधान केलेच पाहिजे. (७)

वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें ।
परी हें तुमच्याच अनुभवें । तुम्हास घडे ॥ ८ ॥
वक्ता म्हणू लागला की, तुम्ही सावध व्हावे. तुमच्या अनुभवानुसार तुम्हांला जे वाटते, ते तुम्ही बोक्या, हे योग्यच आहे. (८)

ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा ।
संपदेविण हो धिवसा । तो निरार्थक ॥ ९ ॥
ज्याला जसा अनुभव येतो, तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. ज्याच्याजवळ संपत्ती नसते, त्याचा भरवसाही निरर्थक ठरतो. (९)

नाहीं ज्ञानाची संपदा । अज्ञानदारिद्रें आपदा ।
भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें ॥ १० ॥
ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते आणि जो अज्ञानरूपी दास्त्रित्याने सर्वकाळ आपदाच भोगत असतो, त्याला शब्दज्ञान असले, तरी त्यामुळे जन्ममरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. (१०)

योगी वोळखावा योगेश्वरें । ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्वरें ।
माहाचतुर तो चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥
योग्याची ओळख योग्यालचपस्ते. जो श्रेष्ठज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओवू शकतो. जो अत्यंत चतुर असेलतोच चतुरमाणसाची पारख करूशकतो. (११)

अनुभवी अनुभवियास कळे । अलिप्त अलिप्तपणें निवळें ।
विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥
जो अनुभवी असतो, तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. जो अक्कि असतो, त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो आणि जो विदेही असतो त्यास कुणी विदेही भेट, तर आनंदाने त्याचे देहभान हरपते. (१२)

बद्धासारिखा सिद्ध । आणी सिद्धासारिखा बद्ध ।
येक भावील तो अबद्ध । म्हणावाच नलगे ॥ १३ ॥
कुणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो, तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाचे सोंग आणीत असतो. त्यांना जो एकसारखे मानतो, तो मूर्ख असतो, हे सांगण्याचीही आवश्यकता नाही. (१३)

झडपला तो देहधारी । आणी देहधारक पंचाक्षरी ।
परंतु दोघां येकसरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥
ज्याला एखाद्या भूताने झडले असते तोही देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो, म्हणून दोघांना एकसारखे कसे म्हणता येईल ? (१४)

तैसा अज्ञान पतित । आणी ज्ञानी जीवन्मुक्त ।
दोघे समान मानील तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥
त्याप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला आणि ज्ञानी जीवमुक्ताला समान मानील, त्या पुरुषाला शहाणा कसे म्हणावे ? (१५)

आतां असो हे दृष्टांत । प्रचित बोलों कांहीं हेत ।
येथें श्रोतीं सावचित्त । क्षणयेक व्हावें ॥ १६ ॥
आता हे दृष्टान्त देणे पुरे झाले. आता प्रचीतीचा, स्वानुभवाचा काही विचार सांगतो, तरी श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकावे. (१६)

जो जो ज्ञानें गुप्त जाला । जो विवेकें विराला ।
जोअनन्यपणें उरला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥
जो जो कुणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही, (१७)

तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि व्हावें ।
तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥
त्याला कसे शोधून काढावे ? कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणाराच तदूप होतो. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. (१८)

देहीं पाहातां देसिना । तत्वें शोधितां भासेना ।
ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्यां ॥ १९ ॥
त्याच्या देहात त्याचा शोध ध्यावा तरतो तेथे नसतोच. तत्त्वांत म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटले तर तेथे तो भासत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केल्या निवडून वेगळाही काढता येत नाही. (१९)

दिसतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं ।
तयास पाहातां वरिवरी । कळेल कैसा ॥ २० ॥
दिसायला इतर सामान्य देहधारी माणसांसारखाच तो दिसतो, पण त्याच्या अंतरात ‘मी देह’ हा भावच नसतो. पण वरवर पाहिले असता हे कसे कळून येईल ? (२०)

कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर ।
जयास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥
त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावे, तर तो स्वरूपाकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की शोध घेणाराच निर्विकार होतो. (२१)

तो परमात्मा केवळ । तयास नाहीं मायामळ ।
अखंड हेतूचा विटाळ । जालाच नाहीं ॥ २२ ॥
तो केवळ परमात्मरूपच झालेला असतो. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो, त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा वियळ त्याला झालेला नसतो. (२२)

ऐसा जो योगीराज । तो आत्मा सहजीं सहज ।
पूर्णब्रह्म वेदबीज । देहाकारें कळेना ॥ २३ ॥
असा जो योगीराज असतो, तो अगदी सहजपणे आत्म-रूपच असतो. पूर्णब्रह्म आणि वेदाचे बीजच असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. (२३)

देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।
तयास शोधितां नसे । जन्म मरण ॥ २४ ॥
देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो, पण त्याची अंतस्थिती अगदी वेगळी असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले, तर त्याला जन्ममरण नाही हे कळून येते. (२४)

जयास जन्ममरण व्हावें । तें तो नव्हेचि स्वभावें ।
नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥
ज्याला जन्ममृत्यू असतात तो देह तो स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसतेच ते तेथे कोठून आणि कसे आणावे ? (२५)

निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ।
तरी उडाला आणी जन्मला । आपला आपण ॥ २६ ॥
ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्मस्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटले किंवा तो मेला असे म्हटले तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. तो जन्मला आणि मेला ह्या अज्ञानी माणसाच्या कल्पना असतात. (२६)

माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणांच वरी ।
दुसयास चिंतितां अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥
भर दुपारी सूर्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला तर ती धुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून दुक्यासबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो, त्याप्रमाणे आपल्यालाच भोगावे लागते. म्हणजे ज्ञानी पुरुषाला जन्ममरण आहे हे चिंतिले असता आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते. त्यामुळे त्याचे तर काहीच बिघडत नाही, पण दोष आपल्याला लागतो. (२७)

समर्थ रायाचे महिमान । जाणतां होते समाधान ।
परंतु भुंकों लागलें स्वान । तरी तें स्वानचि आहे ॥ २८ ॥
एखादा सामर्थ्यसंपन्न सजा आहे, तर त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते. पण कुत्री त्याच्यावर भुंकतात. ती बोलून-चालून कुत्रीच असतात. (त्यांना त्याची थोरवी कशी कळणार ?) (२८)

ज्ञानी तो सत्यस्वरूप । अज्ञान देखे मनुष्यरूप ।
भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥
ज्ञानी तो सत्यस्वरूप असतो, पण अज्ञानी माणसात्य तो मनुष्यरूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल, तसा देव त्याला फल्यप होतो. त्याप्रमाणेच अज्ञानी माणसाचे असते. (२९)

देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥ ३० ॥
देव वास्तविक, निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. पाषाण फुटतो, पण निर्गुण-निसकार देव कसा फुटेल ? (३०)

देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध जाला । हें तों घडेना ॥ ३१ ॥
देव एकला एकच सर्वत्र ओतप्रोत संचक्के असतो. पण सामान्य लोकांनी त्याल अनेक नामारूपांचा केल आहे. म्हणून तो बहुविध झाल, पण असे तर घडत नाही. (३१)

तैसा साधु आत्मज्ञानी । बोधें पूर्ण समाधानी ।
विवेकें आत्मनिवेदनी । आत्मरूपी ॥ ३२ ॥
त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. साससारविवेकाने आत्मनिवेदन करून तो आल्याशी एकरूप झालेला असतो. (३२)

जळोन काष्ठाचा आकार । अग्नि दिसे काष्ठाकार ।
परी काष्ठ होईल हा विचार । बोलोंच नये ॥ ३३ ॥
लाकूड जळते, तेव्हा त्यातील अग्नी काष्ठाचा जसा आकार असेल तसेच त्या आकाराचा दिसतो. पण ते परत काष्ठ होईल असा विचार तर बोलू सुद्धा नये. (३३)

कर्पूर असे तों जळतां दिसे । तैसा ज्ञानीदेह भासे ।
तयास जन्मवितां कैसें । कर्दळीउदरीं ॥ ३४ ॥
कापूर जळ्याना त्याचा आकार भासत असतो. त्याप्रमाणे ज्ञान्याचा देह भासत असतो. जळत असलेला कापसचा खडा परत कर्दळीतून उत्पन्न होत नसतो. तसा ज्ञानाग्रीने दग्ध झालेला ज्ञान्याचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मास येत नाही. (३४)

बीज भाजलें उगवेना । वस्त्र जळालें उकलेना ।
वोघ निवडितां निवडेना । गंगेमधें ॥ ३५ ॥
भाजले बीज असले की ते पेरले तरी उगवून येत नाही. वस्त्र एकदा जळले की त्याचीघडी उकलत नाही. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. (३५)

वोघ गंगेमागें दिसे । गंगा येकदेसी असे ।
साधु कांहींच न भासे । आणी आत्मा सर्वगत ॥ ३६ ॥
गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळ्या दिसत असतो आणि गंगा तर एकदेशी आहे. पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्या तर आहे म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहात नाही. (३६)

सुवर्ण नव्हे लोखंड । साधूस जन्म थोतांड ।
अज्ञान प्राणी जडमूढ । तयास हें उमजेचिना ॥ ३७ ॥
परीसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण झाले की, ते सुवर्ण परत लोखंड होत नाही. त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जडमूढ असतात, त्यांना हे उमजत नाही. म्हणून साफ जन्म असतो, असे ते समजतात. (३७)

अंधास कांहींच न दिसे । तरी ते लोक आंधळे कैसे ।
सन्नपातें बरळतसे । सन्नपाती ॥ ३८ ॥
आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल ? सन्निपात ज्वर झालेला रोगी त्या ज्यसमुळेवाटेल ते बरळू लागतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोकज्ञानी साधूबद्दत्की हवेते बरळत असतात. (३८)

जो स्वप्नामधें भ्याला । तो स्वप्नभयें वोसणाला ।
तें भये जागत्याला । केवि लागे ॥ ३९ ॥
जो स्वप्नात घ्यालेला असतो, तो स्वप्नात भयाने बरळू लागतो. पण जो जागा झालेत्य असतो, त्याला स्वप्नभय कसे वाटणार ? (३९)

मुळी सर्पाकार देखिली । येक भ्याला येकें वोळखिली ।
दोघांची अवस्था लेखिली । सारिखीच कैसी ॥ ४० ॥
दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली. एकाने ही मुळी आहेहे ओळ्यलेनाही. त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्याला. दुसऱ्याने ती मुळी आहे, सर्प नव्हे, हे ओळखले. त्यामुळेतो मुळीच भ्याला नाही. मग दोघांची अवस्था सारखी कशी लेखता येईल ? (४०)

हतीं धरितां हि डसेना । हें येकास भासेना ।
तरी ते त्याची कल्पना । तयासीच बाधी ॥ ४१ ॥
ती मुळी हातात धरली तरी ती डसत नाही, हे भ्यालेल्या माणसाला पटत नाही.म्हणजे त्याची कल्पनाच त्याला बाधक ठरते. (४१)

विंचु सर्प डसला । तेणें तोचि जाकळला ।
तयाचेनि लोक जाला । कासावीस कैसा ॥ ४२ ॥
ज्याला साप, विंचू डसतो तो त्यामुळे व्याकूळ होतो, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील ? (४२)

आतां तुटला अनुमान । ज्ञानियास कळे ज्ञान ।
अज्ञानास जन्ममरण । चुकेचिना ॥ ४३ ॥
आता श्रोत्यांच्या शंकेचे समाधान झाले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसास ओवू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसास ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्ममरणही चुकत नाही. (४३)

येका जाणण्यासाठीं । लोक पडिले अटाटीं ।
नेणपणें हिंपुटी होती । जन्ममृत्यें ॥ ४४
एका आक्याला जाणण्यासाठी लोक आयपिय करीत राहतात आणि अज्ञानाने कष्टी होतात. जन्ममृत्यूचे दुःख भोगत वहातात. (४४)

तेंचि कथानुसंधान । पुढें केलें परिच्हिन्न ।
सावधान सावधान । म्हणे वक्ता ॥ ४५ ॥
हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितला जाईल तरी ‘सावधान’ ‘सावधान’ असे वक्ता म्हणाला. (४५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निःसंदेहनिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंयादे ‘निःसंदेहनिरूपणनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : जाणपणनिरूपण
॥ श्रीराम ॥

पृथ्वीमधें लोक सकळ । येक संपन्न येक दुर्बळ ।
येक निर्मळ येक वोंगळ । काय निमित्य ॥ १ ॥
येथे श्रोत्याने प्रथम काही प्रश्न केले आहेत. तो म्हणतो की, पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यांत कुणी संपन्न असतो, तर कुणी दुर्बळ असतो. कुणी निर्मळ असतो, तर कुणी ओंगळ असतो. याचे कारण काय आहे ? (१)

कित्येक राजे नांदती । कित्येक दरिद्र भोगिती ।
कितीयेकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमोद्धम ॥ २ ॥
कित्येक राज्यपद भोगतात, तर कित्येक दरिद्री असतात. कित्येकांची स्थिती उत्तम असते, तर कित्येकांची अधमाहून अधम असते. (२)

ऐसें काय निमित्य जालें । हें मज पाहिजे निरोपिलें ।
याचे उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥
ह्या विषमतेचे कारण काय ? असे व्हावयास काय निमित्त घडते ? ते मला सांगितले पाहिजे. श्रोत्यांनी ते उत्तर ऐकले पाहिजे. (३)

हे सकळ गुणापासीं गती । सगुण भाग्यश्री भोगिती ।
अवगुणास दरिद्रप्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥
हे सर्व गुणांवर अवलंबून आहे. जे सद्‌गुणी असतात ते भाग्यश्रीचाउपभोग घेतात आणि अवगुणी असतात त्यांना एाड्यि प्रास होते. यात संशयास जगही जागा नाही. (४)

जो जो जेथें उपजला । तो ते वेवसाईं उमजला ।
तयास लोक म्हणती भला । कार्यकर्ता ॥ ५ ॥
जो जो माणूस ज्या च्या व्यवसायात तो व्यवसाय करणाऱ्या घरात वा कुळात जन्माला येतो, तो व्यवसाय करणे त्याला चांगले जमते. अशा रीतीने तो व्यवसाय करू लागला की, लोक त्याला चांगला कार्यकर्ता आहे असे म्हणून वाखाणतात. (५)

जाणता तो कार्य करी । नेणतां कांहींच न करी ।
जाणता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥
जाणता, हुशार असेल तो काम करतो. जो नेणता असतो तो काहीच करीत नाही. त्यामुळे जाणता माणूस व्यवस्थित पोट भरू शकतो, तर नेणत्याला भीक मागण्याची पाळी येते. (६)

हें तों प्रकटचि असे । जनीं पाहातां प्रत्यक्ष दिसे ।
विद्येवीण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥
ही गोष्ट तर जगात प्रत्यक्षच दिसून येते की, जो विद्याहीन असतो तो करंय राहातो आणि ज्याच्याजवळ विद्या असते, तो भाग्यवान ठरतो. (७)

आपुली विद्या न सिकसी । तरी काये भीक मागसी ।
जेथें तेथें बुद्धी ऐसी । वडिलें सांगती ॥ ८ ॥
आपली विद्या शिकला नाहीस, तर भीक मागण्याची वेळ येईल. अशा प्रकारे जेथे तेथे वडील माणसे मुलांना उपदेश करीत असतात. (८)

वडिल आहे करंटा । आणी समर्थ होये धाकुटा ।
कां जे विद्येनें मोटा । म्हणोनिया ॥ ९ ॥
एखाद्या घरी मोठा भाऊ भाग्यहीन करंय असतो, तर धाकटा पुष्कळ विद्या शिकून समर्थ, कर्तबगार आणि भाग्यवान ठरतो. (९)

विद्या नाही बुद्धी नाही । विवेक नाहीं साक्षेप नाहीं ।
कुशळता नाहीं व्याप नाहीं । म्हणौन प्राणी करंटा ॥ १० ॥
ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, आग्रह नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल, तर तो प्राणी करंट भाग्यहीन ठरतो. (१०)

इतुकें हि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे ।
वैभव सांडितां अपैसें । पाठीं लागे ॥ ११ ॥
या सर्व गोष्टी म्हणजे विद्या बुद्धि जेथे असतील, तेथे वैभवाला तोड नसतो. त्याने वैभव नको म्हटले, तरी ते आपोआप पाठीस लागून येते. (११)

वडिल समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी ।
वडिला ऐसा व्याप न करी । म्हणोनियां ॥ १२ ॥
एखाद्या घरी वडील भाऊ कर्तबगार असतो, समर्थ असतो, तर धाकटा भिकारी असतो. याचे कारण हेच असते की, धाकटा मोठ्या भावाप्रमाणे व्याप करीत नाही. (१२)

जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव ।
तोलासारिखा हावभाव । लोक करिती ॥ १३ ॥
जशी विद्या असेल तिला अनुसरून त्या माणसाची महत्त्वाकां झा असते. जितका त्याचा व्याप असेल तितक्या प्रमाणात त्या माणसाला वैभव प्रास होते. प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार जो तो कर्तबगारी दाखवितो. (१३)

विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे ।
करंटेपणें वोखटा दिसे । वोंगळ आणी विकारी ॥ १४ ॥
ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही, तो निर्मळ कसा असेल ? तो करंटेपणाने वाईट दिसतो, गलिच्छ आणि विकारी असतो. (१४)

पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ ।
गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ॥ १५ ॥
पशु पक्षी, यांच्या ठिकाणी सुद्धा जरकाही गुण असतील तर समर्थ लोक त्यांच्यावर कृपा करतात. काही चांगले गुण नसतील, तर त्या प्राणिमात्रांचे जिणे व्यर्थ होय. (१५)

गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं ।
कुशळता नाहीं तर्क नाहीं । प्राणीमात्रासी ॥ १६ ॥
काही माणसे अशी असतात की, त्यांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, महत्त्व, कुशक्या अथवा तर्क यांपैकी काहीच नसते. (१६)

याकारणें उत्तम गुण । तेंचि भाग्याचें लक्षण ।
लक्षणेवीण अवलक्षण । सहजचि जालें ॥ १७ ॥
म्हणून उत्तम गुण हेच भाग्याचे लक्षण होय. याउलट ते नसतील, तर भाग्याच्या लक्षणाऐवजी तेथे सहजच अवलक्षण दिसून येते. (१७)

जनामधें तो जाणता । त्यास आहे मान्यता ।
कोणी येक विद्या असतां । महत्व पावे ॥ १८ ॥
जो जाणता माणूस असतो, त्याला लोकात मान्यता मिल्ले. काही ना काही विद्या येत असेल, तर सहजच महत्त्व प्रास होते. (१८)

प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि समर्थ ।
नेणता जाणिजे वेर्थ । निःकारण ॥ १९ ॥
प्रपंच असो वापरमार्थ त्यात जाणता मनुष्यच समर्थ ठरतो. नेणता असेल तो कुचकामाचा असून व्यर्थच जगतो. (१९)

नेणतां विंचु सर्प डसे । नेणतां जीवघात असे ।
नेणतां कार्य नासे । कोणी येक ॥ २० ॥
अज्ञानामुळेविंचू साप डसतो किंवा अज्ञानामुळेजीवघात होतो किंवा एखादे कार्यही अज्ञानामुळेच बिघडते. (२०)

नेणतां प्राणी सिंतरे । नेणपणें तर्ह्हे भरे ।
नेणपणे ठके विसरे । पदार्थ कांहीं ॥ २१ ॥
अज्ञानी माणूसच फसतो, अज्ञानी माणूसच त्केवाईकपणे वागतो किंवा पदार्थ, वस्तू यांचा त्याला विसर पडतो. (२१)

नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपाईं पडती ।
नेण्तां संव्हारती घडती । जीवनास ॥ २२ ॥
अज्ञानी माणसाला वैरी जिंकतात. अज्ञानामुळे सकलत पडावे लागते. अज्ञानामुळेच संहार घडतो आणि अनेक जीवांचा नाश होतो. (२२)

आपुले स्वहित न कळे जना । तेणें भोगिती यातना ।
ज्ञान नेणतां अज्ञाना । अधोगती ॥ २३ ॥
लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाही, त्यामुळे यातना भोगाव्या लागतात. ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती होते. (२३)

मायाब्रह्म जीवशिव । सारासार भावाभाव ।
जाटिल्यासाठीं होतें वाव । ज्न्ममरण ॥ २४ ॥
माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव कुणाला म्हणावे, शिव कुणाला म्हणावे, भाव म्हणजे काय, अभाव म्हणजे काय, सार काय आहे, असार काय आहे वगैरे सर्व जाणून घेतले की जन्ममरणातून सुटका होते. (२४)

कोण कर्ता निश्चयेंसीं । बद्ध मोक्ष तो कोणासी ।
ऐसें जाणतां प्राणीयासी । सुटिकां घडे ॥ २५ ॥
कर्ता कुणाला म्हणावे, याचा निश्चय, बंध, मोक्ष कुणाचा होतो इत्यादी जाणले असता मनुष्याची जन्ममरणांतून सटका होते. (२५)

जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण ।
जाणिजे अनन्यलक्षण । म्हणिजे मुक्त ॥ २६ ॥
देव निर्गुण आहे हे जाणावे. आपण ‘मी’ म्हणतो तो ‘मी’ कोण हे जाणून घ्यावे. अनन्य म्हणजे काय, त्याचे लक्षण कोणते वगैरे जाणले म्हणजे मुक्ती मिठ्ये. (२६)

जितुकें जाणोन सांडिलें । तितुकें दृश्य वोलांडिलें ।
जाणत्यास जाणतां तुटलें । मूळ मीपणाचें ॥ २७ ॥
सर्वांचे स्वरूप जाणून त्याचा त्याग केला, जितके दृश्य आहे ते नाशिवंत जाणून त्यास ओलांडले आणि हे सर्व जाणारा जो आत्या त्याला जाणले असता मीपणाचे मूळच नाहीसे होते. (२७)

न जाणतां कोटीवरी । साधनें केलीं परोपरीं ।
तरी मोक्षास अधिकारी । होणार नाहीं ॥ २८ ॥
वरीलसर्व गोष्टी न जाणता परोपरीने कोट्यवधी साधने केली, तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणारनाही. (२८)

मायाब्रह्म वोळखावें । आपणास आपण जाणावें
इतुक्यासाठीं स्वभावें । चुके जन्म ॥ २९ ॥
माया कशी आहे, ब्रह्माचे स्वरूप काय आहे हे ओळखावे व स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपण आपणास जाणून घ्यावे. हे सर्व केल्यानेच स्वाभाविकपणे पुन्हा जन्मावे लागत नाही. (२९)

जाणतां समर्थाचें अंतर । प्रसंगें वर्ते तदनंतर ।
भाग्य वैभव अपार । तेणेचि पावे ॥ ३० ॥
समर्थांचे अंतरंग जाणून घेऊन नंतरप्रसंगानुसारयोग्य आचरण केल्याने अपार भाग्य, वैभव प्रास होते (३०)

म्हणौन जाणणें नव्हे सामान्य । जाणतां होईजे सर्वमान्य ।
कांहींच नेणतां अमान्य । सर्वत्र करिती ॥ ३१ ॥
म्हणून जाणणे ही सामान्य गोष्ट समजू नये. जाणून जे काही केले जाते, ते सर्वांना मान्य होते. काहीही जाणून न घेता जे काही केले जाते ते सर्वांना अमान्य होते. (३१)

पदार्थ देखोन भूत भावी । नेणतें झडपोन प्राण ठेवी ।
मिथ्या आहे उठाठेवी । जाणते जाणती ॥ ३२ ॥
एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे नीट दिसला नाही, तर तेथे भूताची कल्पना करतो आणि अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटले असे मानून भीतीने प्राण सोडतो. हे सर्व काही अज्ञानामुळे जो मिथ्या भास झाला, त्याची उठाठेव आहे हे जाणती माणसे ओळखतात. (३२)

जाणत्यास कळे वर्म । नेण्त्याचें खोटें कर्म ।
सकळ कांहीं धर्माधर्म । जाणतां कळे ॥ ३३ ॥
जाणत्याला यातील रहस्य कळ्ये. नेणता अज्ञानाने कर्म करतो ते खोटे असते. जाणून घेतल्याने सर्व धर्म- अधर्माचे ज्ञान होते. (३३)

नेणत्यास येमयातना । जाणत्यास कांहींच लागेना ।
सकळ जाणोन विवंचना । करी तो मुक्त ॥ ३४ ॥
अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. जाणता असतो त्याला काहीच भोगावे लागत नाही. कारण तो सर्व काही जाणून घेऊन त्यावर विचार करतो व मुक्त होतो. (३४)

नेणतां कांहीं राजकारण । अपमान करून घेती प्राण ।
नेणतां कठीण वर्तमान । समस्तांस होये ॥ ३५ ॥
ज्याला व्यवहारात कसे वागावे याचे ज्ञान नसते, तो एखादे वेळी दुसऱ्याचा अपमान करून त्याचा प्राणही घेतो. यामुळे त्याच्या अज्ञानामुळे सगळ्यांच्यावर कठीण प्रसंग येतो (३५)

म्हणोनियां नेणणें खोटें । नेणते प्राणी करंटे ।
जाणतां विवरतां तुटे । जन्ममरण ॥ ३६ ॥
म्हणूनच अज्ञान हे वाईट असून अज्ञानी प्राणी करंटे असतात. म्हणून ज्ञान प्रास करून त्याचे चिंतन केले असता जन्ममरणातून सुटका होते. (३६)

म्हणोन अलक्ष करूं नये । जाणणें हाचि उपाये ।
जाणतां सापडें सोये । परलोकाची ॥ ३७ ॥
म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच एकमेव उपाय असून त्यानेच परलोकाची सोय सापडते. (३७)

जाणणें सकळांस प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण ।
परंतु अलिप्तपणाची खूण । जाणतां कळे ॥ ३८ ॥
ज्ञान हे सर्वांना प्रमाण वाटते, पण मूर्खाला ते अप्रमाण वाटते. पण ज्ञानामुळेच अल्लिपणाची खूण कळ्ये. (३८)

येक जाणणें करून परतें । कोण सोडी प्राणीयातें ।
कोणी येक कार्य जें तें । जाटिल्याविण न कळे ॥ ३९ ॥
एका ज्ञानाशिवाय प्राण्यांची जन्ममरणातून सुटका करणारे कोण आहे ? कुठलेही कार्य असो, ते जाणल्याशिवाय सिद्धीस जात नाही. (३९)

जाणणें म्हणिजे स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण ।
दोहींमधें कोण प्रमाण । शाहाणे जाणती ॥ ४० ॥
जाणणे म्हणजे (स्वस्वरूपाचे) स्मरण आणि नेणणे म्हणजे (स्वस्वरूपाचे) विस्मरण होय. या दोन्हीमध्ये प्रमाण कोण ते शहाणे लोक जाणतात. (४०)

जाणते लोक ते शाहाणे । नेणते वेडे दैन्यवाणे ।
विज्ञान तेहि जाणपणें । कळो आलें ॥ ४१ ॥
जाणते लोक असतात ते शहाणे असतात. नेणते वेडे दैन्यवाणे असतात. विज्ञान म्हणजेच अनुभव म्हणजे काय हे पण जाणपणामुळेच कळू लागते. (४१)

जेथें जाणपण खुंटलें । तेथें बोलणें हि तुटलें ।
हेतुरहित जालें । समाधान ॥ ४२ ॥
जेथे जाणीवही ख्ये तेथे बोलणेही तुटते स्वरूपानुभव आला की जाणीवही वहात नाही आणि शब्दही तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हेतुरहित अनिर्वचनीय असे समाधान प्रास होते. (४२)

श्रोतें म्हणती हें प्रमाण । जालें परम समाधान ।
परी पिंडब्रह्मांड ऐक्यलक्षण । मज निरोपावें ॥ ४३ ॥
श्रोते म्हणतात की आपले हे सांगणे प्रमाण आहे. त्यामुळे परम समाधान प्रास झाले आहे. परंतु आता पिंड- ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजावून सांगावे. (४३)

ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे । बहुत बोलती ऐसें ।
परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥
जे ब्रह्मांडात असते, तेच पिंडत असते असे अनेक लोक सांगतात, पण त्याचा प्रत्यय यावा असे आपण केले पाहिजे (४४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
जाणपणनिरूपणनाम समास चवथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंचादे ‘जाणपणनिरूपणनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : अनुमाननिर्शन
॥ श्रीराम ॥

पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । नये आमुच्या अनुमाना ।
प्रचित पाहातां नाना । मतें भांबावती ॥ १ ॥
श्रोते येथे विचारत आहेत की, पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात. ते आमच्या तर्काला पटत नाही. त्याची प्रचीती पाहावी म्हटले, तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो. (१)

जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । ऐसी बोलावयाचि प्रौढी ।
हें वचन घडिनें घडी । तत्वज्ञ बोलती ॥ २ ॥
‘जे पिंडी तेचि ब्रह्मांडी’ अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे. तत्त्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलतात. (२)

पिंड ब्रह्मांड येक राहाटी । ऐसी लोकांची लोकधाटी ।
परी प्रत्ययाचे परीपाटीं । तगों न सके ॥ ३ ॥
पिंड-ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे. पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही. (३)

स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । हे च्यारी पिंडींचे देह जाण ।
विराट हिरण्य अव्याकृत मूळप्रकृती हे खूण । ब्रह्मांडींची ॥ ४ ॥
स्थल सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे चार पिंडाचे देह आहेत असे जाण व विशद हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे चार देह आहेत. (४)

हे शास्त्राधाटी जाणावी । परी प्रचित कैसी आणावी ।
प्रचित पाहातां गथागोवी । होत आहे ॥ ५ ॥
शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे हे खरे पण याची प्रचीती कशी घ्यावी ? प्रचीती घेण्याचा प्रयत्न केला की, सर्व गोंधळ होतो. (५)

पिंडीं आहे अंतःकरण । तरी ब्रह्मांडीं विष्णु जाण ।
पिंडीं बोलिजेतें मन । तरी ब्रह्मांडीं चंद्रमा ॥ ६ ॥
वक्ता म्हणतो की, पिंडात अंतःकरण असते, तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा. पिंडत मन म्हणतात, तर ब्रह्मांडात चंद्रमा आहे. (६)

पिंडीं बुद्धी ऐसें बोलिजे । तरी ब्रह्मांडीं ब्रह्मा ऐसें जाणिजे ।
पिंडीं चित्त ब्रह्मांडीं वोळखिजे । नारायेणु ॥ ७ ॥
पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा. पिंडात चित्त, तसा ब्रह्मांडात नारायण आहे. (७)

पिंडीं बोलिजे अहंकार । ब्रह्मांडीं रुद्र हा निर्धार ।
ऐसा बोलिला विचार । शास्त्रांतरीं ॥ ८ ॥
पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले आहे. (८)

तरी कोण विष्णूचें अंतःकर्ण । चंद्राचें कैसें मन ।
ब्रह्मयाचे बुद्धीलक्षण । मज निरोपावें ॥ ९ ॥
यावर परत श्रोता विचारत आहे की, विजू म्हणजे अंतःकरण कसे, चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला सांगावे. (९)

नारायणाचें कैसें चित्त । रुद्राहंकाराचा हेत ।
हा विचार पाहोन नेमस्त । मज निरोपावा ॥ १० ॥
चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे, ह्यासंबंधी सर्व विचार मला सांगावा. (१०)

प्रचितनिश्चयापुढें अनुमान । जैसें सिंहापुढें आलें स्वान ।
खयापुढें खोटें प्रमाण । होईल कैसें ॥ ११ ॥
अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसे आहे. ख्यापुढे खोटे कसे टिकून राहील ? (११)

परी यास पारखी पाहिजे । पारखीनें निश्चय लाहिजे ।
परिक्षा नस्तां राहिजे । अनुमानसंशईं ॥ १२ ॥
पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही, तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहातो. (१२)

विष्णु चंद्र आणी ब्रह्मा । नारायेण आणी रुद्रनामा ।
यां पाचांची अंतःकर्णपंचकें आम्हा । स्वामी निरोपावीं ॥ १३ ॥
विष्णू चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र ह्यांना ब्रह्मांडाचे अंतःकरणपंचक का म्हणतात, ते हे स्वामी, तुम्ही आम्हांला समजावून द्यावे. (१३)

येथें प्रचित हें प्रमाण । नलगे शास्त्राचा अनुमान ।
अथवा शास्त्रीं तरी पाहोन । प्रत्ययो आणावा ॥ १४ ॥
वक्ता यावर म्हणतो की, या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही. अथवा शास्त्रग्रंथात जरी पाहाण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. (१४)

प्रचितीवीण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।
तोंड पसरून जैसें सुणें । रडोन गेलें ॥ १५ ॥
प्रत्यक्ष अनुभवावाचून जे सांगितले जाते, ते सर्व कंठळ्याणे वाटते. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लगते, ते जसे ऐकवत नाही, तशी स्थिती होते. (१५)

तेथें काये हो ऐकावें । आणी काये शोधून पाहावें ।
जेथें प्रत्यायाच्या नावें । सुन्याकार ॥ १६ ॥
जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो, तेथे काय हो ऐकायचे ? आणि शोधून तरी काय पाहायचे ? (१६)

आवघें आंधळेचि मिळाले । तेथें डोळसाचें काय चाले ।
अनुभवाचे नेत्र गेले । तेथें अंधकार ॥ १७ ॥
जेथे सर्व आंधळेच जमले असतात, तेथे डोळ्याचे काय चालणार ? अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच भासणार (१७)

नाही दुग्ध नाही पाणी । केली विष्ठेची सारणी ।
तेथें निवडावयाचे धनी । ते एक डोंबकावळे ॥ १८ ॥
जेथे दूध व पाणी एकत्र केले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला नीरक्षीरविवेकी राजहंसाची आवश्यकता असते. संत हेगजहंसासारखे सारासारविवेकाने दृश्य वृष्टीचा त्याग करून आत्मवस्तु ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही, तेथे राजहंसाचे कामच नाही. जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे, तेथे निवड करण्यास डोमकावळेच योग्य असतात. (१८)

आपुले इच्हेनें बोलिलें । पिंडाऐसे ब्रह्मांड कल्पिले ।
परी तें प्रचितीस आलें । कोण्या प्रकारें ॥ १९ ॥
ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली, पण ते प्रचीतीला कशा प्रकारे आणावे, हे कोणी सांगत नाही. (१९)

म्हणोन हा अवघाच अनुमान । अवघें कल्पनेचें रान ।
भलीं न घ्यावें आडरान । तश्करीं घ्यावें ॥ २० ॥
म्हणून हेसर्व बोलणे अनुमानाचे आहे. सर्व काल्पनिक आहे. शब्दारण्य आहे. भल्या माणसाने आडरानात शिरू नये. चोर असतात, तेच आडरानात शिरतात. (२०)

कल्पून निर्मिले मंत्र । देव ते कल्पनामात्र ।
देव नाहीं स्वतंत्र । मंत्राधेन ॥ २१ ॥
निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याप्रमाणेच देवही कल्पनेने निर्मिले. ते देव स्वतंत्र नसतात, तर मंत्रांच्या अधीन असतात. (२१)

येथें न बोलतां जाणावें । बोलणें विवेका आणावें ।
आंधळें पाउलीं वोळखावें । विचक्षणें ॥ २२ ॥
या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्यांनी जाणून घ्यावा. आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात. (२२)

जयास जैसें भासलें । तेणें तैसें कवित्व केलें ।
परी हें पाहिजे निवडिलें । प्रचितीनें ॥ २३ ॥
ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले. पण अनुभव घेऊन त्यातील ख्या-खोट्याची निवड केली पाहिजे. (२३)

ब्रह्म्यानें सकळ निर्मिलें । ब्रह्म्यास कोणें निर्माण केलें ।
विष्णूनें विश्व पाळिलें । विष्णूस पाळिता कवणु ॥ २४ ॥
ब्रह्मदेवाने सर्व वृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केले ? विष्णू विश्वाचे पालन करतो, पण त्या विष्णूचे पाल्य कोण करतो ? (२४)

रुद्र विश्वसंव्हारकर्ता । परी कोण रुद्रास संव्हारिता ।
कोण काळाचा नियंता । कळला पाहिजे ॥ २५ ॥
रुद्र सर्व विश्वाचा संहारकर्ता आहे, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो ? काळाचा नियंता कोण आहे हे सर्व कळ्ये पाहिजे. (२५)

याचा कळेना विचार । तों अवघा अंधकार ।
म्हणोनियां सारासार । विचार करणें ॥ २६ ॥
जोपर्यंताचा विचारकव्य नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणूनचसायसतिवचारकरणे आवश्यक आहे. (२६)

ब्रह्मांड स्वभावेंचि जालें । परंतु हें पिंडाकार कल्पिलें ।
कल्पिलें परी प्रत्यया आलें । नाहीं कदा ॥ २७ ॥
ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले, परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. (२७)

पाहातां ब्रह्मांडाची प्रचिती । कित्येक संशय उठती ।
हें कल्पनिक श्रोतीं । नेमस्त जाणावें ॥ २८ ॥
ब्रह्मांडाची प्रचीती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घ्यावे. (२८)

पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । कोण आणितो अनुमाना ।
ब्रह्मांडीं पदार्थ नाना । ते पिंडीं कैंचे ॥ २९ ॥
पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत ते पिडत कोठे आढळून येतात ? (२९)

औटकोटी भुतावळी । औटकोटी तीर्थावळी ।
औटकोटी मंत्रावळी । पिंडीं कोठें ॥ ३० ॥
ब्रह्मांडात साडेतीन को भूते आहेत. साडेतीन को तीर्थे आहेत. साडेतीन कोय मंत्र आहेत. पण पिंडात हे असणे शक्य नाही. (३०)

तेतीस कोटी सुरवर । अठ्यांसि सहस्त्र ऋषेश्वर ।
नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ॥ ३१ ॥
ब्रह्मांडात तेहतीस कोठी देव आहेत. अझ्याऐशी हजार ऋषीश्वर आहेत. नऊ कोठी कात्यायनी आहेत. हे सर्व पिंडात कोठे आहे ? (३१)

च्यामुंडा च्हपन्न कोटी । कित्येक जीव कोट्यानुकोटी ।
चौयासी लक्ष योनींची दाटी । पिंडीं कोठें ॥ ३२ ॥
ब्रह्मांडीं पदार्थ निर्माण जाले । पृथकाकारें वेगळाले ।
तेहि तितुके निरोपिले । पाहिजेत पिंडीं ॥ ३३ ॥
ब्रह्मांडात छप्पन्न कोटी चामुंडा आहेत. कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत. एकूण चौऱ्याऐंशी लक्ष योनींची दाटी झालेली आहे. हे पिंडात कोठे आहे ? अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झाले आहेत तितके पिंडत दाखविता येणारच नाहीत. (३२ – ३३)

जितुक्या औषधी तितुकीं फळे । नाना प्रकारीं रसाळें ।
नाना बीजें धान्यें सकळें । पिंडीं निरोपावीं ॥ ३४ ॥
असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे नाना बीजे, सर्व प्रकारची धान्ये पिंडात दाखवून देता येतील का ? (३४)

हें सांगतां पुरवेना । तरी उगेंचि बोलावेना ।
बोलिलें न येतां अनुमाना । लाजिरवाणें ॥ ३५ ॥
असे कितीही सांगितले तरी पुरे पडणार नाही. उगीचच बोलण्यात काही अर्थ नाही. जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही, तर ते लाजिरवाणे ठरेल. (३५)

तरी हें निरोपिलें नवचे । फुकट बोलतां काय वेचे ।
याकारणें अनुमानाचें । कार्य नाहीं ॥ ३६ ॥
तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही. फुकटबोलण्यात काय खर्च होते म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. (३६)

पांच भूतें ते ब्रह्मांडीं । आणि पांचचि वर्तती पिंडीं ।
याची पाहावी रोकडी । प्रचीत आतां ॥ ३७ ॥
ब्रह्मांडात पाचच महाभूते आहेत, तशीच ती पिंडतही पाचच क्रियाशील आहेत. याचा प्रत्यक्ष शेकडा अनुभव कोणीही घ्यावा. (३७)

पांचा भूतांचे ब्रह्मांड । आणी पंचभूतिक हें पिंड ।
यावेगळें तें उदंड । अनुमानज्ञान ॥ ३८ ॥
ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पिंडही पंचभौतिकच आहे. हाच ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ याचा खरा अर्थ आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. (३८)

जितुकें अनुमानाचें बोलणें । तितुकें वमनप्राये त्यागणें ।
निश्चयात्मक तेंचि बोलणें । प्रत्ययाचें ॥ ३९ ॥
अनुमानाचे जे काही बोलणे असेलते वांतीप्रमाणे त्यागावे. जेझ्ययाचे अनुभवाचेबोल्यो असतेतेचनिश्चयाल्पकअसते. (३९)

जेंचि पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । प्रचित नाहीं कीं रोकडी ।
पंचभूतांची तांतडी । दोहीकडे ॥ ४० ॥
जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रतीती आता आली ना ? दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी, वर्तणूक आहे. (४०)

म्हणोनि देहींचें थानमान । हा तों अवघाचि अनुमान ।
आतां येक समाधान । मुख्य तें कैसें ॥ ४१ ॥
म्हणून पिंड व ब्रह्मांडया दोन्हीतील देहांची स्थाने प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजेच काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे. आता मुख्य खरे समाधान कसे असते ते पाहू या. (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अनुमाननिर्शननाम समास पांचवा
इति श्रीदासवोधे गुरूशिष्यसंवादे ‘अनुमाननिर्शननाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : गुणरूपनिरूपण

॥ श्रीराम ॥

आकाश जैसें निराकार । तैसा ब्रह्माचा विचार ।
तेथें वायोचा विकार । तैसी मूळमाया ॥ १ ॥
आकाश जसे निराकार आहे तसेच ब्रह्म निराकार आहे. आकाशात वायूचा विकारउत्यन्न होतो, तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्कृरणरूपाने मूळमाया उत्पन्न होते. (१)

हें दासबोधीं असे बोलिलें । ज्ञानदशकीं प्रांजळ केलें ।
मूळमायेंत दाखविलें । पंचभूतिक ॥ २ ॥
दासबोधाच्या आठव्या ज्ञानदशक नावाच्या दशकात मूळ मायेत पंचमहाभूते कशी सूक्ष्मरूपाने असतात हे स्पष्टपणे वर्णन केले आहे. (२)

तेथें जाणीव तो सत्वगुण । मध्य तो रजोगुण ।
नेणीव तमोगुण । जाणिजे श्रोतीं ॥ ३ ॥
तेथेजाणीव हा सत्वगुण, जाणीवनेणीवमिश्रित तोरजोगुण आणि नेणीव तो तमोगुण हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. (३)

म्हणाल तेथें कैंची जाणीव । तरी ऐका याचा अभिप्राव ।
पिंडीं माहाकारण देहीं सर्व । साक्षिणी अवस्था ॥ ४ ॥
तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असे म्हणाल तर त्याचा अभिप्राय ऐका. पिंडाचा चौथा महाकारण देह म्हणजेच सर्वसाक्षिणी तूर्यावस्था होय. (४)

तैसी मूळप्रकृती ब्रह्मांडींचें । देह माहाकारण साचें ।
म्हणोन तेथेंजाणीवेचें । अधिष्ठान आलें ॥ ५ ॥
तशीच ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ प्रकृती ही महाकारण देहच खरोखर असल्याने तेथेच जाणीवेचे अधिष्ठान असते. (५)

असो मूळमायेभीतरीं । गुप्त त्रिगुण वास करी ।
पष्ट होती संधी चतुरीं । जाणावी गुणक्षोभिणी ॥ ६ ॥
असो या मूळ्यायेतच गुप्तपणे त्रिगुण वास करतात. योग्य संधी मिळताच ते स्पष्ट होतात, तीच गुणक्षोभिणी तूर्यावस्था हे शहाण्या लोकांनी जाणून घ्यावे. (६)

जैस तृणाचा पोटराकळा । पुढें उकलोन होये मोकळा ।
तैसी मूळमाया अवलीळा । गुण प्रसवली ॥ ७ ॥
जसे गवताचे कणीस पुढे उकलून मोकळे होते, तशीच मूव्याया ही अनायासे गुणांना जन्म देती झाली. (७)

मूळमाया वायोस्वरूप । ऐक गुणक्षोभिणीचें रूप ।
गुणविकार होतांचि अल्प । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥
मूळ माया ही वायुस्वरूप असते. आता गुणक्षोभिणी मायेचे रूप ऐका. मूळ्यायेच्या ठिकाणी सूक्ष्मरूपाने गुणरूपी विकारड्यन्न झाला की, तिलाच गुणक्षोभिणी म्हणतात. (८)

पुढें जाणीव मध्यस्त नेणीव । मिश्रित चालिला स्वभाव ।
तेथें मातृकास ठाव । शब्द जाला ॥ ९ ॥
गुणक्षोभिणीपासून जाणीव म्हणजेच सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीवनेणीवमिश्रित रजोगुण आणि नेणीव म्हणजे तमोगुण यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. तेथे गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम अकारमय साडेतीन मात्रांचा शब्दद्धनी उत्पन्न झाला. (९)

तो शब्दगुण आकाशींचा । ऐसा अभिप्राव येथीचा ।
शब्देंचि वेदशास्त्रांचा । आकार जाला ॥ १० ॥
शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झाले व पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूते झाली. शब्दाच्या आधारेच वेदादी शास्त्रे आकाराला आली. (१०)

पंचभूतें त्रिगुणाकार । अवघा वायोचा विकार ।
जाणीवनेणीवेचा विचार । वायोचि करितां ॥ ११ ॥
पंचभूते आणि त्रिगुण म्हणजेच अष्टधा प्रकृती होय. मूळ मायेतही सर्व सूक्ष्मरूपाने असतात. जाणीव व नेणीव यांचा विचारही मूळ्यायेमुळेच उत्पन्न होतो. (११)

वायो नस्तां कैंची जाणीव । जाणीव नस्तां कैंची नेणीव ।
जाणीवनेणीवेस ठाव । वायोगुणें ॥ १२ ॥
परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते व नेणीव म्हणजे अज्ञानहीनसते. मूळमाया जरनसती तरजाणीव कुड्यी आणि जाणीव नसती तर नेणीवही कुठली ? म्हणून ज्ञानअज्ञानास कारण मूळ्याया म्हणजे वायूच आहे. (१२)

जेथें मुळीच नाही चळण । तेथें कैंचें जाणीवलक्षण ।
म्हणोनि वायोचा गुण । नेमस्त जाणावा ॥ १३ ॥
जेथे जराही चलनवलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार ? म्हणून चलनवलन हा वायूचा गुण आहे, हे नीट जाणून घ्यावे. (१३)

येकापासून येक जालें । हें येक उगेंचि दिसोन आलें ।
स्वरूप मुळीच भासलें । त्रिगुणभूतांचें ॥ १४ ॥
एकापासून एक भूत झाले असे उगीच दिसून येते. पण मूळ्यायेतच हे त्रिगुणांचे आणि पंचमहाभूतांचे म्हणजे अष्टा प्रकृतीचे स्वरूप आहे. थोडक्यात म्हणजे मूळ्याया म्हणजेच अष्टा प्रकृती होय. (१४)

ऐसा हा मुळींचा कर्दमु । पुढें पष्टतेचा अनुक्रमु ।
सांगतां येकापासून येक उगमु । हें हि खरें ॥ १५ ॥
मूळमायेतच हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते व पुढे ते स्पष्ट व्यक्त होत जाते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले जाते तेही खरेच आहे. (१५)

वायोच कर्दम बोलिला । तयापासून अग्नि जाला ।
तोहि पाहातां देखिला । कर्दमुचि ॥ १६ ॥
प्रथम वायूचे मिश्रण असते. त्यापासून अग्नी झाला. तोही वास्तविक पंचमहाभूतांचे मिश्रणच असतो. (१६)

अग्निपासून जालें आप । तेंहि कर्दमस्वरूप ।
आपापासून पृथ्वीचें रूप । तेंहि कर्दमरूपी ॥ १७ ॥
नंतर अग्रीपासून जल झाले. तेही मिश्रित स्वरूपाचे असते. नंतर आपापासून पृथ्वी हे भूत झाले. तेही मिश्रित स्वरूपाचेच असते. एकात इतर भूतांचे अंश असल्याने ही सर्व मिश्रणरूपच होत. (१७)

येथें आशंका उठिली । भूतांस जाणीव कोठें देखिली ।
तरी भूतांत जाणीव हे ऐकिली । नाहीं वार्ता ॥ १८ ॥
येथे अशी शंका उत्पन्न झाली की भूते जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल ? भूतात जाणीव असते असे तर कुठे ऐकूही येत नाही. (१८)

जाणीव म्हणिजे जाणतें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
वायोआंगीं सकळ गुण । मागां निरोपिलें ॥ १९ ॥
जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल. वायूचे हेच लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच मूळ्यायेमध्येच सर्व गुण असतात हे मागेच सांगितले आहे. (१९)

म्हणोन जाणीवनेणीवमिश्रीत । अवघें चालिलें पंचभूत ।
म्हणोनियां भूतांत । जाणीव असे ॥ २० ॥
पंचमहाभूतांचा विस्तार जाणीवनेणीवमिश्रित चाळ्ये असतो. म्हणजेच पंचमहाभूतात जाणीव असते. (२०)

कोठें दिसे कोठें न दिसे । परी तें भूतीं व्यापून असे ।
तिक्षण बुद्धी करितां भासे । स्थूळ सुक्ष्म ॥ २१ ॥
कुठे ती स्पष्टपणे दिसून येते, तर कुठे ती दिसत नाही. पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणिवेचे सूक्ष्म किंवा स्थूल रूप कळून येते. (२१)

पंचभूतें आकारली । भूतीं भूतें कालवलीं ।
तरी पाहातं भासलीं । येक स्थूळ येक सूक्ष्म ॥ २२ ॥
पंचभूते आकाराला आली, तेव्हासुद्धा ती एकमेकात काक्यक्येईच असतात, पण वरवर पहाता ती वेगळी भासतात. काही स्थलरूपाने असतात तर काही सूक्ष्मरूपाने. (२२)

निरोधवायो न भासे । तैसी जणीव न दिसे ।
न दिसे परी ते असे । भूतरूपें ॥ २३ ॥
जेव्हा वास वाहात नाही, स्तब्ध असतो तेव्हा तो आहे असे वाटत नाही. तसेच जाणीवेचे आहे. ती असते, पण दिसत नाही. पण ती भूतरूपाने असतेच (२३)

काष्ठीं अग्नी दिसेना । निरोधवायो भासेना ।
जणीव तैसी लक्षेना । येकायेकीं ॥ २४ ॥
काष्ठात अग्नी असतो, तो दिसत नाही. वायूचा निरोध होतो, तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीवही एकाएकी ज्यात येत नाही. (२४)

भूतें वेगळालीं दिसती । पाहातां येकचि भासती ।
बहुत धूर्तपणें प्रचिती । वोळखावी ॥ २५ ॥
पंचमहाभूते दिसताना वेगवेगळी दिसतात, पण वास्तविक ती एकरूपच असतात. अत्यंत चतुरपणे याची प्रचीती घ्यावी म्हणजे त्यांची ओळख पटते. (२५)

ब्रह्मापासुन मूळमाया । मूळमायेपासून गुणमाया ।
गुणमायेपासून तया । गुणास जन्म ॥ २६ ॥
ब्रह्मापासून मूळ्याया उत्पन्न झाली. मूळमायेपासून गुणमाया झाली आणि तिच्यापासून गुणांचा जन्म झाल. (२६)

गुणापासूनियां भूतें पावली । पष्ट दशेतें ।
ऐसीयांचीं रूपें समस्तें । निरोपिलीं ॥ २७ ॥
गुणांपासून मूळ्यायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली. या सर्वांची रूपे पूर्वी स्पष्ट करून सांगितली आहेत. (२७)

आकाश गुणापासून जालें । हें कदापी नाही घडलें ।
शब्दगुणास कल्पिलें । आकाश वायां ॥ २८ ॥
यावर श्रोत्याने शंका काढली की, आकाश हे गुणापासून झाले हे कधीच घडत नाही. शब्दगुणात्य आधार हवा म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केली आहे. (२८)

येक सांगतां येकचि भावी । उगीच करी गथागोवी ।
तया वेड्याची उगवी । कोणें करावी ॥ २९ ॥
यावर वक्ता म्हणू लागला की, एक सांगायला गेले की तू दुसरीच कल्पना करतोस. उगीचच गोंधळ निर्माण करतोस. अशा वेड्याची समजूत कोणी कशी घालावी ? (२९)

सिकविल्यां हि कळेना । उमजविल्यां हि उमजेना ।
दृष्टांतेंहि तर्केना । मंदरूप ॥ ३० ॥
शिकवले तरी कळत नाही. समजावले तरी समजत नाही. दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी मंद बुद्धीमुळे त्यावरूनही तर्काने जाणता येत नाही. (३०)

भूतांहून भूत थोर । हा हि दाविला विचार ।
परी भूतांवडिल स्वतंत्र । कोण आहे ॥ ३१ ॥
पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा दुसरे थोर आहे, हाही विचार स्पष्ट करून सांगितला. मग भूतांमध्ये स्वतंत्र कोण आहे ? (३१)

जेथें मूळमाया पंचभूतिक । तेथें काये राहिला विवेक ।
मूळमायेपरतें येक । निर्गुणब्रह्म ॥ ३२ ॥
जेथे मूळ मायाही पंचभौतिक आहे, तर आता आणखी काय विचार करणार ? मूळ मायेपरते एक निर्गुणब्रह्मच फक्त असते. (३२)

ब्रह्मीं मूळमाया जाली । तिची लीळा परीक्षिली ।
तंव ने निखळ वोतली । भूतेंत्रिगुणांची ॥ ३३ ॥
ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया झाली. तिने निर्माण केलेल्या या विश्वोत्यत्तिरूप खेळाचे परीक्षण केले की कळून येते की, मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची जणू मूसच आहे. (३३)

भूतें विकारवंत चत्वार । आकाश पाहातां निर्विकार ।
आकाश भूत हा विचार । उपाधीकरितां ॥ ३४ ॥
चार भूते विकारवंत भासतात, पण आकाशाकडेपाहता ते निर्विकार भासते. पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे. म्हणून त्याची गणना पंचमहाभूतांमध्ये केली जाते. (३४)

पिंडीं व्यापक म्हणोन जीव । ब्रह्मांडीं व्यापक म्हणोन शिव ।
तैसाच हाहि अभिप्राव । आकाशाचा ॥ ३५ ॥
पिंडाला व्यापून असणारी जाणीव, तिला जीव म्हणतात. ब्रह्मांडला व्यापून असणाऱ्या जाणिवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे. (३५)

उपाधीमचें सापडलें । सूक्ष्म पाहातां भासलें ।
इतुक्यासाठीं आकाश जालें । भूतरूप ॥ ३६ ॥
ते शून्यचाच्या उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासले म्हणून आकाश हे भूतरूप झाले. (३६)

आकाश अवकाश तो भकास । परब्रह्म तें निराभास ।
उपाधीं नस्ता जें आकाश । तेंचि ब्रह्म ॥ ३७ ॥
आकाश हे अवकाशरूप असल्याने ते शून्य आहे. तसे ते भासते. परब्रह्म हे निराभास आहे. शून्यत्वरहित जे आकाश तेच ब्रह्म होय. (३७)

जाणीव नेणीव मध्यमान । हेंचि गुणाचें प्रमाण ।
येथें निरोपिलें त्रिगुण । रूपेंसहित ॥ ३८ ॥
सत्त्व, तम आणि रज या गुणांचे प्रमाण म्हणजे जाणीव, नेणीव व जाणीवनेणीवमिश्रित असे आहे. याप्रमाणे येथे त्रिगुणांचे त्यांच्या रूपासहित वर्णन केले आहे. (३८)

प्रकृती पावली विस्तारातें । पुढे येकाचें येकचि होतें ।
विकारवंतचि तयातें । नेम कैंचा ॥ ३९ ॥
पुढे अष्टधा प्रकृतीच विस्तार पावली व एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत असल्यामुळे तिच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या, याबद्दल आश्चर्य करायला नको. (३९)

काळें पांढरें मेळवितां । पारवें होतें तत्वता ।
काळें पिवळें मेळवितां । हिरवें होये ॥ ४० ॥
उदाहरणार्थ, काळ्या रंगात पांढरा रंग मिसळ्या की पारवा रंग निर्माण होतो. निळ्या रंगात पिवळा या मिसळ्या की हिरवा रंग तयार होतो. (४०)

ऐसें रंग नानापरी । मेळवितां पालट धरी ।
तैसें दृश्य हें विकारी । विकारवंत ॥ ४१ ॥
याप्रकारे नाना रंगांचे मिश्रण केले की नवनवीन लं तयार होतात. पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. त्याप्रमाणे सर्व दृश्य वृष्टी ही विकारवंत आहे. (४१)

येका जीवनें नाना रंग । उमटों लागती तरंग ।
पालटाचा लागवेग । किती म्हणोन पाहावा ॥ ४२ ॥
पंचमहाभूतांपैकी एका पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात ते पाहिले की आश्चर्य वाटू लागते. मुळात पाणी एकच असून त्यावर अनेक तरंग उठ्यात आणि पाहता पाहता इतका बदल घडून येत असतो की सांगणेही मुष्किल. (४२)

येका उदकाचे विकार । पाहातां दिसती अपार ।
पांचा भूतांचे विस्तार । चौयासी लक्ष योनी ॥ ४३ ॥
उदक हे पंचभूतांपैकी एक. त्याचे विकार जर अपार आहेत, तर मग सर्व पंचमहाभूतांचा विस्तार किती सांगावा ? चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी हा पंचभूतांचाच विस्तार आहे. (४३)

नाना देहाचें बीज उदक । उदकापसून सकळ लोक ।
किडा मुंगी स्वापदादिक । उदकेंचि होयें ॥ ४४ ॥
अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासूनच सर्व लोक निर्माण झाले आहेत. किडा, मुंगी, श्वापदादिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते, ती उदकामुळेच उत्पन्न होते. (४४)

शुक्लीत शोणीत म्हणिजे नीर । त्या नीराचें हें शरीर ।
नखें दंत अस्तिमात्र । उदकाच्या होती ॥ ४५ ॥
रेत, रक्त म्हणजेही पाणीच आहे. त्या पाण्याचेच हे शरीर बनलेले आहे. शरीरातील नखे, दात, अस्थी वगैरेही उदकापासूनच होतात. (४५)

मुळ्यांचे बारीक पागोरे । तेणें पंथें उदक भरे ।
त्या उदकेंचि विस्तारे । वृक्षमात्र ॥ ४६ ॥
झाडाच्या मुळचे जे बारीक तंतू असतात, त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवांत भरले जाते आणि त्या उदकाच्यामुळेत्या वृक्षाचा इतका विस्तारहोत असतो. (४६)

अंबवृक्ष मोहरा आले । अवघे उदकाकरितां जाले ।
फळीं फुलीं लगडले । सावकास ॥ ४७ ॥
आम्रवृक्षांना मोहोर येतो. पुढे यथावकाश ते फव्यफुलांनी त्याडून जातात, बहराला येतात, ते सर्वही उदकामुळेच घडते. (४७)

खोड फोडुन अंबे पाहातां । तेथें दिसेना सर्वथा ।
खांद्या फोडुन फळें पाहातां । वोलीं सालें ॥ ४८ ॥
आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून जर त्याचे खोड फोडून त्यात आबे पाहू लागले तर तेथे आंबे आढळत नाहीत. तसेच फांद्या तोडून फळे पाहू गेल्यासही ओली सालेच हाती येतात. (४८)

मुळापासून सेवटवरी । फळ नाहीं तदनंतरीं ।
जळरूप फळ चतुरीं । विवेकें जाणावें ॥ ४९ ॥
मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिले असता फळ दिसून येत नाही, पण झाडाला येणारे फळ हे जलरूप असते, हेविवेकाच्या योगे चतुरपुरुषाने जाणून घ्यावे. (४९)

तेंचि जळ सेंड्या चढे । तेव्हां वृक्षमात्र लगडे ।
येकाचें येकचि घडे । येणें प्रकारें ॥ ५० ॥
तेच जल शेंड्यापर्यंत पोहोचते तेव्हां वृक्ष फळांनी लगडून येतो. याप्रमाणे एकापासून एक या प्रकारे निर्माण होते. (५०)

पत्रें पुष्पें फळें भेद । किती करावा अनुवाद ।
सूक्ष्म दृष्टीनें विशद । होत आहे ॥ ५१ ॥
एकाच पाण्यापासून पाने, फुले, फळे इत्यादी बदल घडून येतात. किती म्हणून वर्णन करावे ! सूक्ष्म दृष्टीने पाहिले की सर्व स्पष्टपणे कळून येते. (५१)

भूतांचे विकार सांगों किती । क्षणक्षणा पालटती ।
येकाचे येकचि होती ॥ नाना वर्ण ॥ ५२ ॥
पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार ? त्यात क्षणोक्षणी बदल येत असतो. एकाहून एक असे अनेक रंग उत्पन्न होतात. (५२)

त्रिगुणभूतांची लटपट । पाहों जातां हे खटपट ।
बहुरूप बहु पालट । किती म्हणोन सांगावा ॥ ५३ ॥
त्रिगुण आणि पंचमहाभूताच्या मिश्रणाची ही सर्व करामत आहे. यासंबंधी विचार करता असंख्य रूपे व असंख्य बदल सारखे घडून येताना दिसतात. त्यांचे किती वर्णन करावे ? (५३)

ये प्रकृतीचा निरास । विवेकें वारावा सावकास ।
मग परमात्मा परेश । अनन्यभावें भजावा ॥ ५४ ॥
म्हणून या अष्टा प्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूस सासवे व मग अनन्यभावाने परमात्मा जो परेश त्यास भजावे. (५४)

इथि श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गुणरूपनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीवासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘गुणरूपनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : विकल्पनिरूपण
॥ श्रीराम ॥

आधी स्थूळ आहे येक । तरी मग अंतःकरण पंचक ।
जाणतेपणाचा विवेक । स्थूळाकरितां ॥ १ ॥
आधी स्थूल देह दिसतो. मग त्यात अंतःकरणपंचक आढव्ये. ज्ञानाचा विवेकहा क्यच्या आधारेच होतो. (१)

तैसेंचि ब्रह्मांडेंवीण कांहीं । मूळमायेसि जाणीव नाहीं ।
स्थूळाच्या आधारें सर्व हि । कार्य चाले ॥ २ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते. त्यावरून सर्व कार्य स्थूलाच्या आधारे चालते, असेच वाटते. (२)

तें स्थूळचि नस्तां निर्माण । कोठें राहेल अंतःकर्ण ।
ऐसा श्रोतीं केला प्रश्न । याचें उत्तर ऐका ॥ ३ ॥
हे स्थूल निर्माणच झाले नसते, तर अंतःकरण कोठे राहिले असते, असा प्रश्न श्रोत्याने केला आहे. याचे उत्तर आता ऐका. (३)

कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठिभागीं चालती घरें ।
जीव करिती लहानथोरें । शक्तीनुसार ॥ ४ ॥
रेशमाचे किडे आणि शरीररक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे असे अनेक जीव पाठीवर घरे निर्माण करतात व इतरही लहान- थोर आपापल्या शक्तीस अनुसरून घरे बांधतात. (४)

शंख सिंपी घुला कवडें । आधीं त्यांचें घर घडे ।
किंवा आधीं निर्माण किडे । हें विचारावें ॥ ५ ॥
शंख, शिंपी, खुला. कवडे यात जे किडे राहातात, ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते, याचा विचार करावा. (५)

आधी प्राणी ते होती । मग घरें निर्माण करिती ।
हे तों प्रत्यक्ष प्रचिती । सांगणें नलगे ॥ ६ ॥
आधी प्राणी होतात आणि मग ते घरे निर्माण करतात ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. ती सांगण्याची आवश्यकता नाही. (६)

तैसें आधी सूक्ष्म जाण । मग स्थूळ होतें निर्माण ।
येणें दृष्टांतें प्रश्न । फिटला श्रोतयांचा ॥ ७ ॥
त्याप्रमाणेच आधी सूक्ष्म रूपात जे असते, ते मग स्थूल रूपात प्रकट होते किंवा निर्माण होते. या दृष्टांताने श्रोत्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले. (७)

तव श्रोता पुसे आणीक । जी आठवलें कांहीं येक ।
जन्ममृत्युचा विवेक । मज निरोपावा ॥ ८ ॥
तेव्हा श्रोता आणखी काही विचारू लागला. जी, मला आणखी काही आठवले आहे. तरी जन्ममृत्यूचा विवेक मला समजावून सांगा. (८)

कोण ज्न्मास घालितें । आणी मागुता कोण जन्म घेतें ।
हें प्रत्यया कैसें येतें । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥
प्राण्याला जन्माला कोण घालते आणि मागून कोण जन्म घेते ? त्याचा अनुभव कशा प्रकारे येतो ? (९)

ब्रह्मा जन्मास घालितो । विष्णु प्रतिपाळ करितो ।
रुद्र अवघें संव्हारितो । ऐसें बोलती ॥ १० ॥
ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो आणि रुद्र सर्वांचा संहार करतो, असे सर्व म्हणतात. (१०)

तरीं हें प्रवृतीचें बोलणें । प्रत्ययास आणी उणें ।
प्रत्यय पाहातां श्लाघ्यवाणें । होणार नाहीं ॥ ११ ॥
पण हे जनरूढीचे बोलणे झाले. त्याप्रमाणे अनुभव येत नाही. प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. (११)

ब्रह्म्यास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रतिपाळिलें ।
रुद्रास कोणें संव्हारिलें । माहाप्रळईं ॥ १२ ॥
मग ब्रह्मदेवास कोणी जन्मास घातले, विष्णूचा प्रतिपाळ कुणी केला आणि रुद्राचा महाप्रलयकाळी संहार कोण करतो ? (१२)

म्हणौनि हा सृष्टीभाव । अवघा मायेचा स्वभाव ।
कर्ता म्हणों निर्गुण देव । तरी तो निर्विकारी ॥ १३ ॥
म्हणून हे सुष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे. शिवाय निर्गुण देव कर्ता असेही म्हणता येत नाही, कारण तो तर निर्विकारी आहे. (१३)

म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणचि विस्तारली ।
आणी विचारितां थारली । हें हि घडेना ॥ १४ ॥
बरे माया जन्मास घाक्ये असे म्हणावे, तर ती स्वतःच विस्तार पावली आहे आणि विचार करून पाहिले असता ती स्थिर आहे, असेही म्हणता येत नाही. (१४)

आतां जन्मतो तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आणी संचिताचें लक्षण । तेंहि निरोपावें ॥ १५ ॥
म्हणून आता जन्मतो तो कोण ? त्याला कसे ओळखावे ? तसेच संचिताचे लक्षण काय, तेही मला नीटपणे सांगावे. (१५)

पुण्याचें कैसें रूप । आणी पापाचें कैसें स्वरूप ।
याहि शब्दाच आक्षेप । कोण कर्ता ॥ १६ ॥
पुण्याचे रूप कसे आहे ? पापाचे स्वरूप कसे आहे ? तसेच हा शंका घेणारा मी कोण ? (१६)

हें कांहींच न ये अनुमाना । म्हणती जन्म घेते वासना ।
परी ते पाहातां दिसेना । ना धरितां न ये ॥ १७ ॥
यांपैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही. असे म्हणतात की, वासना जन्म घेते किंवा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. पण वासना तर दिसून येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. (१७)

वासना कामना आणी कल्पना । हेतु भावना मति नाना ।
ऐशा अनंत वृत्ती जाणा । अंतःकर्णपंचकाच्या ॥ १८ ॥
वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना आणि नाना प्रकारची बुद्धी या सर्व अंतःकरणपंचकाच्याच अनंत वृत्ती आहेत, हे जाणावे. (१८)

असो हें अवघें जाणीव यंत्र । जाणीव म्हणिजे स्मरणमात्र ।
त्या स्मरणास जन्मसूत्र । कैसें लागे ॥ १९ ॥
असो, हे सर्व जाणीवयंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसे लागेल ? (१९)

देहो निर्माण पांचा भूतांचा । वायो चाळक तयाचा ।
जाणणें हा मनाचा । मनोभाव ॥ २० ॥
देह तर पाचभौतिक असतो. वायूमुळे त्याचे चलनवलन घडते. या देहात जाणणे हे मनाचे काम आहे. (२०)

ऐसें हें सहजचि घडलें । तत्वांचें गुंथाडें जालें ।
कोणास कोणे जन्मविलें । कोण्या प्रकारें ॥ २१ ॥
या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्त्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले ? (२१)

तरी हें पाहातां दिसेना । म्हणोन जन्मचि असेना ।
उपजला प्राणी येना । मागुता जन्मा ॥ २२ ॥
शिवाय कोण कोणास जन्मास घालतो, ते पाहू गेले असता आढळून येत नाही. म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजल्लो प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. (२२)

कोणासीच जन्म नाहीं । तरी संतसंगें केलें काई ।
ऐसा अभिप्राव सर्वहि । श्रोतयांचा । २३ ॥
कोणालाच जर जन्म नाही, तर संत- संगतीने काय साधते ? असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. (२३)

पुर्वीं स्मरण ना विस्मरण । मधेंचि हें जालें स्मरण ।
अंतर्यामीं अंतःकर्ण । जाणती कळा ॥ २४ ॥
जन्माला येण्यापूर्वी स्मरणही नव्हते आणि विस्मरणही नव्हते. जन्माला आल्यावर हे स्मरण उत्पन्न झाले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण आहे. तेच जाणीवेचे रूप आहे. (२४)

सावध आहे तों स्मरण । विकळ होतां विस्मरण ।
विस्मरण पडतां मरण । पावती प्राणी ॥ २५ ॥
माणूस सावध असतो, तोपर्यंत स्मरण असते. विकल झाला की विस्मरण होते. जाणीव संपूर्ण लोपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी मरण पावतो (२५)

स्मरण विस्मरण राहिलें । मग देहास मरण आलें ।
पुधें जन्मास घातलें । कोणास कोणें ॥ २६ ॥
स्मरणही नाही व विस्मरणही नाही अशी स्थिती होते, तेव्हा देहात्मा मरण येते. पुढे मग कोण कोणाला जन्मास घालतो ? (२६)

म्हणोनी जन्मचि असेना । आणी यातना हि दिसेना ।
अवघी वेर्थचि कल्पना । बळावली ॥ २७ ॥
म्हणून एकदा मरण आले की पुन्हा जन्मही नाही आणि यमयातनाही दिसून येत नाहीत. या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पिल्या जातात. त्यांना काही अर्थच नाही. (२७)

म्हणौन जन्मचि नाहीं कोणासी । श्रोतयांची आशंका ऐसी ।
मरोन गेलें तें जन्मासी । मागुतें न ये ॥ २८ ॥
म्हणून कुणालाही पुनर्जन्मच नाही, अशी श्रोत्यांची शंका आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. (२८)

वाळलें काष्ठ हिरवळेना । पडिलें फळ तें पुन्हां लागेना ।
तैसें पडिलें शरीर येना । जन्मास मागुतें ॥ २९ ॥
वाळले लाकूड असते, त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. फळ एकदा झाडावरून गळून पडले की ते परत झाडावर लागत नाही. त्याप्रमाणे एकदा शरीर पडले की, ते परत जन्मास येत नाही. (२९)

मडकें अवचितें फुटलें । फुटलें तें फुटोनिच गेलें ।
तैसेंचि पुन्हां जन्मलें । नाहीं मनुष्य ॥ ३० ॥
एखादे मडके अवचित फुटले की ते फुटूनच जाते. त्याप्रमाणे एकदा मनुष्य मेला की तो फिरून जन्मास येत नाही. (३०)

येथें अज्ञान आणी सज्ञान । सारिखेच जालें समान ।
ऐसा बळावला अनुमान । श्रोतयांसी ॥ ३१ ॥
श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून असे अनुमान निघते की, ते अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखेच समजतात. (३१)

वक्ता म्हणे हो ऐका । अवघें पाषांड करूं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३२ ॥
त्यावर वक्ता म्हणतो की, अहो ऐका. उगाच नास्तिकपणा करू नका. माणसाने तर्क करावेत, पण विचारपूर्वक करावेत. (३२)

प्रेत्नेंवीण कार्य जालें । जेविल्यावीण पोट भरलें ।
ज्ञानेंवीण मुक्त जालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥
प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, जेवल्याशिवायच पोट भरले आहे आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे, असे कधी घडत नाही. (३३)

स्वयें आपण जेविला । त्यास वाटे लोक धाला ।
परंतु हें समस्तांला । घडले पाहिजे ॥ ३४ ॥
एखादा स्वत: जेवला तर त्याला वाटते की, लोकही तूस झाले. पण असे कधी घडत नाही. सगळे जेव्हा जेवतील, तेव्हाच ते तूस होतील. (३४)

पोहणें सिकला तो तरेल । पोहणें नेणें तो बुडेल ।
येथें हि अनुमान करील । ऐसा कवणु ॥ ३५ ॥
ज्याला पोहायला येते तोच तरतो. ज्याला पोहणे येत नसेल तो बुडतो. येथे काही कुणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. (३५)

तैसें जयास ज्ञान जालें । ते ते तितुकेच तरले ।
ज्याचें बंधनचि तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥
त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झाले असते, ते तेवढेच तरून जातात. ज्याचे बंधन तुटते, तोच फक्त मुक्त होतो. (३६)

मोकळा म्हणे नाहीं बंधन । आणी प्रत्यक्ष बंदीं पडिले जन ।
त्यांचें कैसें समाधान । तें तुम्ही पाहा ॥ ३७ ॥
जो मोकळा झालेला असतो, तो म्हणतो, कुणालाही बंधन नाही आणि इकडे तर अनेक लोक प्रत्यक्ष बद्ध असलेले दिसतात. तर याचा समन्वय कसा करायचा, ते तुम्हीच पाहा. (३७)

नेणे दुसयाची तळमळ । तें मनुष्य परदुःखसीतळ ।
तैसाच हाहि केवळ । अनुभव जाणावा ॥ ३८ ॥
जो दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाही, अशा माणसाला परूःख शीतलवाटते असे म्हटलेजाते. त्याप्रमाणेच मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात असलेल्याचे दुःख कळत नाही, असे या अनुभवावरून जाणावे. (३८)

जयास आत्मज्ञान जालें । तत्वें तत्व विवंचिलें ।
खुणेसी पावतांच बाणलें । समाधान ॥ ३९ ॥
ज्याला आत्मज्ञान झाले असते, त्याने तत्त्वांचा तत्त्वाने निरास केलेला असतो, अशा माणसाला स्वस्वरूपानुभव येऊन खूण पटते व पूर्ण समाधान बाणते (३९)

ज्ञानें चुके जन्ममरण । सगट बोलणें अप्रमाण ।
वेदशास्त्र आणी पुराण । मग कासयासी ॥ ४० ॥
ज्ञानानेच जन्ममरण चुकते. सरसकट सर्वांचे जन्ममरण चुकते हे बोलणे अप्रमाण आहे. तसे असते तर वेदशास्त्रे, पुराणे यांची काय आवश्यकता ? (४०)

वेदशास्त्रविचारबोली । माहानुभावांची मंडळी ।
भूमंडळीं लोक सकळी । हें मानीतना ॥ ४१ ॥
सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकते हे मत वेदशास्त्रातील विचार वचने व या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. (४१)

अवघें होतां अप्रमाण । मग आपलेंच काय प्रमाण ।
म्हणोन जेथें आत्मज्ञान । तोचि मुक्त ॥ ४२ ॥
सगळ्यांना जे अप्रमाण वाट्ये, ते फक्त आपण म्हणता म्हणून प्रमाण काय ? म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेले असेल तोच मुक्त होय. (४२)

अवघे च मुक्त पाहातां नर । हाहि ज्ञाचा उद्गार ।
ज्ञानेंविण तो उद्धार । हूणार नाहीं ॥ ४३ ॥
ज्ञानी माणसाला वाटते की, सर्वच माणसे मुक्त आहेत, पण ते त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावरचे उद्‌गार असतात. ते त्याच्या भूमिकेवरून योग्य असतात, पण ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही हेच खरे आहे. (४३)

आत्मज्ञान कळों आले । म्हणोन दृश्य मिथ्या जालें ।
परंतु वेढा लाविलें । सकळास येणें ॥ ४४ ॥
ज्याला आत्मज्ञान होते, त्याला हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे कळून येते. पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटून ठकल्लै असते. (४४)

आतां प्रश्न हा फिटला । ज्ञानी ज्ञानें मुक्त जाला ।
अज्ञान तो बांधला । आपले कल्पनेनें ॥ ४५ ॥
आता श्रोत्यांचा प्रश्न फिटला आहे. ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त होतो. अज्ञानी हा त्याच्या स्वतःच्या कल्पनेनेच बांधला जातो. (४५)

विज्ञानासारिखें अज्ञान । आणी मुक्तासारिखें बंधन ।
निश्चयासारिखा अनुमान । मानूंचि नये ॥ ४६ ॥
वृत्तिशून्य असे विज्ञान आणि नेणतेपणाचे अज्ञान, कर्तृत्वाहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळ्याने काही न करणारा बद्ध आणि स्वानुभवाने जन्ममृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्ममृत्यूच नाही असे केलेले अनुमान ही कधीही बरोबरीची मागूच नयेत. (४६)

बंधन म्हणिजे कांहींच नाहीं । परी वेढा लाविलें सर्व हि ।
यास उपावचि नाहीं । कळल्यावांचुनी ॥ ४७ ॥
बंधन म्हणजे काहीच नाही. पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपण बद्ध आहोत, असे वाटते. म्हणून सत्य काय हे जाणून घेण्याखेरीज यावर उपायच नाही. (४७)

कांहींच नाहीं आणी बाधी । हेंचि नवल पाहा आधीं ।
मिथ्या जाणिजेना बद्धि । म्हणोन बद्ध ॥ ४८ ॥
काहीच नाही आणि तरी बांधून ठेवते, हेच आधी केवढे मोठे आश्चर्य आहे ! बंधन मिथ्या आहेहेन जाणल्यामुळे अज्ञानी स्वतःस बद्ध मानतो. (४८)

भोळा भाव सिद्धी जाव । हा उधाराचा उपाव ।
रोकडा मोक्षाचा अभिप्राव । विवेकें जाणावा ॥ ४९ ॥
कुणी म्हणतात की, ‘भोळा भाव सिद्धीस जाव.’ पण हा सर्व उधारीचा उपाय आहे. दीर्घकाळाने सिद्धीस जाणारा आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा. (४९)

प्राणी व्हावया मोकळा । आधीं पाहिजे जाणीवकळा ।
सकळ जाणतां निराळा । सहजचि होये ॥ ५० ॥
प्राणी मोकळा होण्याकरिता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. सूक्ष्म बुद्धीने साससारविवेक केला की सर्व काही समजून येते व माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. (५०)

कांहींच नेणिजे तें अज्ञान । सकळ जाणिजे तें ज्ञान ।
जाणिव राहातां विज्ञान । स्वयेंचि आत्मा ॥ ५१ ॥
काहीच न कळणे म्हणजे अज्ञान होय आणि सर्व जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाच्या जाणिवेचाही ल्ल होतो तेच विज्ञान होय. त्यायोगे साधक स्वतः आत्याच बनतो. (५१)

अमृत सेऊन अमर जाला । तो म्हणे मृत्यु कैसा येतो जनाला ।
तैसा विवेकी म्हणे बद्धाला । जन्म तो कैसा ॥ ५२ ॥
जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो, तो म्हणतो की, लोकांना मृत्यू येतो तरी कसा ? याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की, जन्म हा असतो कसा २५२)

जाणता म्हणे जनातें । तुम्हांस भूत कैसे झडपितें ।
तुम्हास वीष कैसें चढतें । निर्विष म्हणे । ॥ ५३ ॥
ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतो की, तुम्हांला भूतबाधा होते तरी कशी ? ज्यास विषबाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्यास म्हणतो की तुम्हांला विष चढते तरी कसे ?(५३)

आधीं बद्धासारिकें व्हावें । मग हें नलगेचि पुसावें ।
विवेक दूरी ठेऊन पाहावें । लक्षण बद्धाचें ॥ ५४ ॥
आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आवश्यकता राहात नाही. (५४)

निजेल्यास चेईला तो । म्हणे हा कां रे वोसणातो ।
अनुभव पाहाणेंचि आहे तो । तरी मग निजोन पाहावा ॥ ५५ ॥
जो जागा झालेला आहेतो झोपलेल्या माणसाल्या म्हणतो की, अरे हा का बरळतो आहे ? तो का बरळतो आहे हे जाणून घ्यायचे तर स्वत: झोपी जाणे आवश्यक आहे. (५५)

ज्ञात्याची उगवली वृत्ती । बद्धाऐसी न पडेल गुंती ।
भुकेल्याची अनुभवप्राप्ती । धाल्यास नाहीं ॥ ५६ ॥
ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते. म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला असतो, त्यास भुकेलेल्या माणसाची अनुभवप्रासी होत नाही. (५६)

इतुकेन आशंका तुटली । ज्ञानें मोक्षप्राप्ती जाली ।
विवेक पाहातां बाणली । अंतरस्थिती ॥ ५७ ॥
या विवेचनाने श्रोत्याची आशंका नष्ट झाली. ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते. आत्मानात्मविवेकाने आत्मज्ञान अंतरात दृढ बाणते. अशा ज्ञान्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. (५७)

इथि श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विकल्पनिरसननाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘विकल्पनिर्शननाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : देहांतनिरूपण
॥ श्रीराम ॥

ज्ञाता सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धातें ।
बद्धाचें काये जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥
श्रोता म्हणतो की, ज्ञान प्रास झाल्याने ज्ञाता जन्ममरणातून सुटतो हे कळ्ये. परंतु बद्धाला परत जन्म कसा प्रास होतो ? देहाच्या अंतकाळी काय जन्मते ? (१)

बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें कांहींच नाहीं उरलें ।
जाणिवेचे विस्मरण जालें । मरणापूर्वी ॥ २ ॥
वरवर पाहिले असता असे वाटते की, बद्ध माणूस मरून गेला की, त्याचे काहीच उरत नाही. कारण मरणापूर्वी त्याची जाणीव संपूर्ण नष्ट झालेली असते. (२)

ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका ।
आतां दुश्चीत होऊं नका । म्हणे वक्ता ॥ ३ ॥
श्रोत्याने अशी जी शंका घेतली, तिचे उत्तर आता ऐका. वक्ता म्हणतो, आता चित्त दुश्चित्त मात्र होऊ देऊ नका. (३)

पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरूप वासनावृत्ती ।
वासनामिश्रीत प्राण जाती । देह सोडुनिया ॥ ४ ॥
देहाच्या अंतकाळी पाचही प्राण आपापले स्थान सोडतात, त्या वेळी प्राणरूप वासनावृत्तीही त्याच्याबरोबर बाहेर पडते. याप्रमाणे वासनामिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. (४)

वायोसरिसी वासना गेली । ते वायोरूपेंचि राहिली ।
पुन्हां जन्म घेऊन आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥
प्राण व वासना दोन्ही वायुरूपच असतात. ती वायुरूपेच राहातात व हेतुपरत्वे परत जन्मास येतात. (५)

कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हां मागुते जीव येती ।
ढकलून दिल्हें तेणें दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥
कित्येक लोक पूर्णपणे मरतात, पण काही कारणाने परत जिवंत होतात. त्यांना प्रेत समजून ढकलून दिले, तर त्यांचे हातपाय आदी अवयव दुखावले जातात. (६)

सर्पदृष्टी जालियां वरी । तीं दिवसां उठवी धन्वंतरी ।
तेव्हां ते माघारी । वासना येते कीं ॥ ७ ॥
सर्पाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो. पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला तीन दिवसांनी उठवतो तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. (७)

कित्येक सेवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती ।
येमलोकींहून आणिती । माघारे प्राणी ॥ ८ ॥
कित्येक शव होऊन पडतात, त्यांना दुसरे कित्येक उठवितात. यमलोकातून त्यांना परत आणलेले असते. (८)

कित्येक पुर्वीं श्रापिले । ते शापें देह पावले ।
उश्रापकाळीं पुन्हां आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥
पूर्वी कित्येकांना शाप मिळाल्याने पहिला देह जाऊन दुसरा देह प्राप्त होतो. त्यांना उःशाप मिळालेला असला की त्याची मुदत संपते, तेव्हा तो दुसरा देह टकून परत ते पूर्वदेहात येतात. (९)

कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक परकाया प्रवेशले ।
ऐसे आले आणी गेले । बहुत लोक ॥ १०
काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात. कुणी परकाया-प्रवेश करतात. असे कित्येक लोक जन्मतात आणि मरतात. (१०)

फुंकल्यासरिसा वायो गेला । तेथें वायोसून निर्माण जाला ।
म्हणोन वायोरूप वासनेला । ज्नम आहे ॥ ११ ॥
फुंकण्याने गती निर्माण होते, त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो. तेथे मन (वासनापूर्तीचे मुख्य साधन जे मन तेही वायुस्वरूपच असल्याने त्यास वायुसुत म्हटले आहे) निर्माण झाले म्हणून मग वासना जी वायुरूप असते ती जन्म घेते. (११)

मनाच्या वृत्ती नाना । त्यांत जन्म घेते वासना ।
वासना पाहातां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥
पाहायला गेले तर वासना दिसत नाही, पण ती असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात, त्यांत वासना जन्म घेते. (१२)

वासना जाणिजे जाणिवहेत । जाणीव मुळींचा मूळतंत ।
मूळमायेंत असे मिश्रित । कारणरूपें ॥ १३ ॥
जाणिवेमुळे होणारी इच्छा, आशा म्हणजे वासना होय. मूळ मायेमध्ये कारणरूपाने वायू जाणिवेसहित असतो. म्हणून जाणिवेचा धागा मूळमायेपर्यंत पोहोचतो. (१३)

कारणरूप आहे ब्रह्मांडीं । कार्यरूपें वर्ते पिंडीं ।
अनुमानितां तांतडीं । अनुमानेना ॥ १४ ॥
जाणीव ही ब्रह्माडात कारणरूपाने आणि देहात वासनामय कार्यरूपाने असते. घाईगर्दीने तिचे योग्य अनुमान करता येत नाही. (१४)

परंतु आहे सूक्ष्मरूप । जैसें वायोचे स्वरूप ।
सकळ देव वायोरूप । आणी भूतसृष्टि ॥ १५ ॥
वायूचे स्वरूप जसे सूक्ष्म असते, त्याप्रमाणे जाणीवही सूक्ष्मरूप असते. सर्व देव आणि भूतसृष्टी वायुरूपच आहे. (१५)

वायोमधें विकार नाना । वायो पाहातां तरी दिसेना ।
तैसी जाणीववासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥
वायूमध्ये नाना विकार असतात, पण वायू डोळ्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जाणीव व वासना याही अति सूक्ष्म असतात. (१६)

त्रिगुण आणी पंचभूतें । हे वायोमध्यें मिश्रिते ।
अनुमानेना म्हणोन त्यातें । मिथ्या म्हणों नये ॥ १७ ॥
त्रिगुण आणि पंचमहाभूते ही सर्व वायूमध्ये मिसळलेली आहेत. पण ती दिसत नाहीत म्हणून त्यांना मिथ्या म्हणू नये. (१७)

सहज वायो चाले । तरी सुगंध दुर्गंध कळों आले ।
उष्ण सीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥
वास स्वाभाविकरीत्या वाहत असतो, तरी सुगंध- दुर्गंधाची जाणीव होते, तसेच उष्ण पदार्थ शीतल होतात. तापलेले प्राणी निवतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. (१८)

वायोचेनि मेघ वोळती । वायोचेनि नक्षत्रें चालती ।
सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायो ॥ १९ ॥
वायूमुळे ढग हालचाल करतात व वृष्टी करतात. वायूमुळेच नक्षत्रे भ्रमण करतात. एवढेच नव्हे, तर सृष्टीतील सर्व घडामोडीला वायूच कारण असतो. (१९)

वायोरूपें देवतें भूतें । आंगीं भरती अकस्मातें ।
वीध केलियां प्रेतें । सावध होतीं ॥ २० ॥
देवता आणि भूते ही वायुरूपच असतात व अकस्मात अंगात प्रवेश करतात. काही विधिविधान केले की प्रेतेसुद्धा जिवंत होतात. (२०)

वारें निराळें न बोले । देहामधें भरोन डोले ।
आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २१ ॥
अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कुणाच्या तरी देहात संचार करून ते प्रगट होते व वासनापूर्तीचा प्रयत्न करते. याप्रकारे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्मास येतात. (२१)

राहाणें ब्रह्मणसमंध जाती । राहाणें ठेवणीं सांपडती ।
नाना गुंतले उगवती । प्रत्यक्ष राहाणें ॥ २२ ॥
राहाणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करवणे, असे प्रयोग करून ब्रह्मसमंधास हुसकून लावतात, पुरून ठेवलेले द्रव्य सापडवून देतात किंवा नाना संकठतून लोकांची सुटका करतात. (२२)

ऐसा वायोचा विकार । येवंचे कळेना विस्तार ।
सकळ कांहीं चराचर । वायोमुळें ॥ २३ ॥
याप्रमाणे वायूचा विकार व विस्तार कळतच नाही. सर्व चराचर सृष्टीचे अस्तित्व वायूमुळेच आहे. (२३)

वायो स्तब्धरूपें सृष्टीधर्ता । वायो चंचळरूपें सृष्टीकर्ता ।
न कळे तरी विचारीं प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥
वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो. चंचल होऊन तोच सृष्टी निर्माण करतो. हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा. म्हणजे कळेल. (२४)

मुळापासून सेवटवरी । वायोचि सकळ कांहीं करी ।
वायोवेगळें कर्तुत्व चतुरीं मज निरोपावें ॥ २५
मूळमायेपासून अगदी शेवटपर्यंत वायूच सर्व काही करीत असतो. वायुवेगळे इतर कोणाचे कर्तृत्व असेल, तर चतुर पुरुषांनी मला सांगावे. (२५)

जाणीवरूप मूळमाया । जाणीव जाते आपल्या ठाया ।
गुप्त प्रगट होऊनियां । विश्वीं वर्ते ॥ २६ ॥
मूळमाया ही जाणीवरूप आहे. जाणीव शेवटी स्वरूपी लीन होते. याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वात संचार करते. (२६)

कोठें गुप्त कोठें प्रगटे । जैसें जीवन उफाळे आटे ।
पुढें मागुता वोघ लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥
पाणी जसे कधी जमिनीत गुप्त असते, कधी उफाळून वरयेते, तरकधी आटते व परत जोराने प्रवाहरूपाने वाहू लगते. तशी जाणीवही कधी गुप्त असते, कधी प्रगट होते, तर कधी परत गुप्त होते. असे परिवर्तन सतत चालू असते. (२७)

तैसाच वायोमधें जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर ।
कोठें विकारें कोठें समीर । उगाच वाजे ॥ २८ ॥
तसाच वायूमधील जाणिवेचा प्रकार आहे. कधी ती प्रगट होते, कधी अदृश्य होते. याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असते. कोठे वार्‍याने वादळ उत्पन्न होते, तर कधी वारा आल्हाददायक झुळुकीसारखा मंद वाहत असतो. (२८)

वारीं आंगावरून जाती । तेणें हातपाये वाळती ।
वारां वाजतां करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥
वारे अंगावरून गेले की त्यामुळे हातपाय वाळून जातात, तर कधी उभी पिके वाऱ्याने करपून जातात. (२९)

नाना रोगांचीं नाना वारीं । पीडा करिती पृथ्वीवरी ।
वीज कडाडी अंबरीं । वायोमुळें ॥ ३० ॥
नाना रोगांची उत्पत्ती वाऱ्यामुळे होते व पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागते. आकाशात वाऱ्यामुळेच विजेचा कडकडाट होत असतो. (३०)

वायोकरितां रागोद्धार । कळे वोळखीचा निर्धार ।
दीप लागे मेघ पडे हा चमत्कार । रागोद्धारीं ॥ ३१ ॥
वायूमुळे नाना राग आळविता येतात आणि ते राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीपमल्हार राग आळविल्याने दीप लागतात, मेघमल्हार आळविला की पाऊस पडतो, असे चमत्कार घडतात. (३१)

वायो फुंकितां भुली पडती । वायो फुंकितां खांडकें करपती ।
वायोकरितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥
वायू फुंकल्याने भूल पडते. वायू फुंकल्याने अंगावरील गड्ये कोरडी पडतात. वायूमुळेच नाना प्रकारच्या मंत्रांचे प्रयोग केले जातात. (३२)

मंत्रें देव प्रगटती । मंत्रें भूतें अखरकिती ।
बाजीगरी वोडंबरी करिती । मंत्रसामर्थ्यें ॥ ३३ ॥
मंत्रांमुळे देव प्रगट होतात. मंत्रामुळे भूते आकर्षित होतात. मंत्रसामर्थ्यानेच जादूचे व मंत्रविद्येचे चमत्कार घडवून आणतात. (३३)

राक्षसांची मावरचना । ते हे देवांदिकां कळेना ।
विचित्र सामर्थ्यें नाना । स्तंबनमोहनादिकें ॥ ३४ ॥
राक्षसांच्या मायेची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन, मोहन आदी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. (३४)

धडचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें ।
नाना विकार सांगावे । किती म्हणोनी ॥ ३५ ॥
शहाणा असेल त्याला वेडे करायचे, वेडा असेल त्यास शहाणे करायचे, याप्रमाणे किती विकार आणि प्रकार वर्णन करावेत ? (३५)

मंत्रीं संग्राम देवाचा । मंत्रीं साभिमान ऋषीचा ।
महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥
देवांच्या संग्रामात निरनिराळ्या मंत्रांचाच उपयोग केला जातो. ऋषींचा मोठेपणाही त्यांच्या मंत्रसामर्थ्यावरच अवलंबून असतो. मंत्रसामर्थ्याचा महिमा कोण जाणू शकेल ?(३६)

मंत्रीं पक्षी आटोपिती । मूशकें स्वापदें बांधती ।
मंत्रीं माहसर्प खिळिती । आणी धनलाभ ॥ ३७ ॥
मंत्रांनी पक्ष्यांवरसत्ता गाजवता येते. उंदीरच इतर श्वापदे यांना बंधन घाल्या येते. मोठमोठ्या सर्पांना एका जागी खिळवून ठेवता येते आणि धनलाभही करून घेता येतो (३७)

आतां असो हा प्रश्न जाला । बद्धाचा जन्म प्रत्यया आला ।
मागील प्रश्न फिटला । श्रोतयाचा ॥ ३८ ॥
असो. आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा प्रास होतो, तो प्रश्न आता मिटला आहे. बद्धाला पुनर्जन्म असतो हे प्रत्ययाला आले आहे. (३८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहांतनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासयोथे गुरुशिष्यसंवादे ‘देहान्तनिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : संदेहवारण
॥ श्रीराम ॥

ब्रह्म वारितां वारेना । ब्रह्म सारितां सारेना ।
ब्रह्म कांहीं वोसरेना । येकीकडे ॥ १ ॥
श्रोते येथे आपली शंका बोलून दाखवीत आहेत. ते म्हणतात की, ब्रह्माचे निवारण करू म्हटले तरी ते करता येत नाही. त्याला बाजूला सारावे म्हटले तरी सारता येत नाही. त्यात कमी-जास्त करावे म्हटले तरी करता येत नाही. (१)

ब्रह्म भेदितां भेदेना । ब्रह्म छेदितां छेदेना ।
ब्रह्म परतें होयेना । केलें तरी ॥ २ ॥
ब्रह्मास भेदावे म्हटले तरी ते भेदले जात नाही. ब्रह्मास छेदावे म्हटले तर ते छेदले जात नाही. त्याला मागे ढकलावे असे वाटले तरी ते ढकलले जात नाही. (२)

ब्रह्म खंडेना अखंड । ब्रह्मीं नाहीं दुसरें बंड ।
तरी कैसें हें ब्रह्मांड । सिरकलें मधें ॥ ३ ॥
ब्रह्माचे तुकडे करावे म्हटले तरी ते केले जात नाहीत. जे ब्रह्म अखंड असल्याने त्यात त्याच्याशिवाय दुसरे काहीही असतच नाही. आणि तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काय शिरले ? (३)

पर्वत पाषाण सिळा सिखरें । नाना स्थळें स्थळांतरें ।
भूगोळरचना कोण्या प्रकारें । जालीं परब्रह्मीं ॥ ४ ॥
पर्वत, पाषाण, शिळ, शिखरे नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली ? (४)

भूगोळ आहे ब्रह्मामधें । ब्रह्म आहे भूगोळामधें ।
पाहातं येक येकामधें । प्रत्यक्ष दिसे ॥ ५ ॥
पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे, असे हे एकामध्ये एक आहे, हे तर प्रत्यक्ष दिसून येते. (५)

ब्रह्मीं भूगोळें पैस केला । आणी भूगोळहि ब्रह्में भेदिला ।
विचार पाहातां प्रत्यय आला । प्रत्यक्ष आतां ॥ ६ ॥
ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वील भेदूनही ब्रह्म आहेच, असा प्रत्यक्षप्रत्ययही विचाराच्या योगे आला. (६)

ब्रह्में ब्रह्मांड भेदिलें । हें तों पाहतां नीटचि जालें ।
परी ब्रह्मास ब्रह्मांडें भेदिलें । हें विपरीत दिसे ॥ ७ ॥
ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले, ही गोष्ट विचार करू पाहता ठीक वाटते. पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले, हे विपरीत वाटते. (७)

भेदिलें नाहीं म्हणावें । तरी ब्रह्मीं ब्रह्मांड स्वभावें ।
हें सकळांस अनुभवें । दिसत आहे ॥ ८ ॥
बरे, भेदले नाही म्हणावे, तरी ब्रह्माच्या ठिकाणीच स्वाभाविकरीत्या ब्रह्मांड आहे, हे तर सगळ्यांना अनुभवाने कळून येत आहे. (८)

तरी हें आतां कैसें जालें । विचारून पाहिजे बोलिलें ।
ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेपवचन ॥ ९ ॥
तरी आता हे कसे काय झाले, ते विचार करून आपण आम्हांला सांगा, असे श्रोत्याने आक्षेप घेऊन म्हटले. (९)

आतां याचें प्रत्युत्तर । सावध ऐका निरोत्तर ।
येथें पडिले किं विचार । संदेहाची ॥ १० ॥
आता या प्रश्नाचे प्रत्युत्तर सावध होऊन ऐका. म्हणजे तुम्ही निशकव्हाल पण येथे काही शंका निर्माण होतात. (१०)

ब्रह्मांड नाहीं म्हणो तरी दिसे । आणी दिसे म्हणो तरी नासे ।
आतां हें समजती कैसें । श्रोतेजन ॥ ११ ॥
ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ते डोळ्यांना दिसते आणि जे दिसते ते तरी नाश पावते. आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजून घ्यावे. (११)

तंव श्रोते जाले उद्दित । आहों म्हणती सावचित्त ।
प्रसंगें बोलों उचित । प्रत्योत्तर ॥ १२ ॥
हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले की, आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत आहोत. तेव्हा वक्ता म्हणाला की, या प्रश्नाचे उचित उत्तर मी देतो. (१२)

आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें ।
हें तों घडेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥
आकाशात दीप लावले तरी त्यामुळे त्या दीपांनी आकाशास बाजूस सारले असे तर घडूच शकत नाही, हे श्रोत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. (१३)

आप तेज अथवा पवन । सारूं न सकती गगन ।
गगन पाहातां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥
आप, तेज किंवा वायू ही भूतेही आकाशास बाजूला सारू शकत नाहीत. आकाश घनदाट सर्वत्र सारखेच असते. ते कसे चळेल ? (१४)

अथवा कठीण जाली मेदनी । तरी गगनें केली चाळणी ।
पृथ्वीचें सर्वांग भेदूनी राहिलें गगन ॥ १५ ॥
अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अच्णुरेणूत व्या्प्त आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने जणू काही पृथ्वीला भेदून तिची चाळणी करून, तिचे सर्वाग भेदून गगन तेथे राहिले आहे. (१५)

याची प्रचित ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे ।
आकाश जैसें तैसें असे । चळणार नाहीं ॥ १६ ॥
याची प्रचीती अशी आहे की, जे जडत्वास येते, ते ते सर्व नाश पावते. आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जसेच्या तसेच असते. ते चळणारच नाही. (१६)

वेगळेपण पाहावें । तयास आकाश म्हणावें ।
अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ॥ १७ ॥
आकाश वेगळेपणाने पाहता येते, म्हणून त्याला पंचभूतांपैकी एक भूत आहे असे म्हणावे लागते. ते जर अभिन्नपणे पाहता येईल, तर आकाशांत व ब्रह्मात फरक राहाणार नाही. त्याला ब्रह्मच म्हणावे लागेल. (१७)

तस्मात आकाश चळेना । भेद गगनाचा कळेना ।
भासलें ब्रह्म तयास जाणा । आकाश म्हणावें ॥ १८ ॥
म्हणून आकाश चळत नाही. आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही. तरीही पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश होय. (१८)

निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें ।
म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेसाठीं ॥ १९ ॥
ते निर्गुण ब्रह्मासारखेच भासते. पण त्याची कल्पना आपण करू शकतो. त्याचे अनुमान करता येते. म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे, याची काहीशी कल्पना आकाशावरून येऊ शकते. (१९)

कल्पनेसि भासे भास । तितुकें जाणावें आकाश ।
परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥
कल्पनेला जे जे भासते, ते आकाश जाणावे. परब्रह्म निसभास निर्विकल्प आहे. (२०)

पंचभूतांमधें वास । म्हणौन बोलिजे आकाश ।
भूतांतरीं जो ब्रह्मांश । तेंचि गगन ॥ २१ ॥
सर्व पंचभूतांमध्ये आकाशतत्त्व व्यापून आहे म्हणून त्याला आकाश म्हणतात. भूतांच्यामध्ये जो ब्रह्मांश ते गगन होय. (२१)

प्रत्यक्ष होतें जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें ।
म्हणओनियां गगनातें । भेदिलें नाहीं ॥ २२ ॥
गगनाच्या ठिकाणीच दीपादी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते, परंतु गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही. मात्र ते अचल ब्रह्म नव्हे. (२२)

पृथ्वी विरोन उरे जीवन । जीवन नस्तां उरे अग्न ।
अग्न विझतां उरे पवन । तोहि नसे ॥ २३ ॥
पृथ्वी पाण्यात विरून जाते तेव्हा फक्त पाणी उरते. ते पाणी नाहीसे झाले की अग्नी उरतो. अग्नी विझला की वायू उरतो व नंतर तोही नाश पावतो. (२३)

मिथ्या आलें आणी गेलें । तेणें खरें तें भंगलें ।
ऐसें हें प्रचितीस आलें । कोणेंपरी ॥ २४ ॥
जे येते आणि जाते ते मिथ्या असते. त्याने जे खरे आहे ते भंगले असे भासते. पण हा अनुभव का येतो ते पाहिले पाहिजे. (२४)

भ्रमें प्रत्यक्ष दिसतें । विचार पाहतां काय तेथें ।
भ्रममूळ या जगाअतें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥
श्रमाने तसे दिसते. विचार करून पाहिला की हे कळते. भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरे कसे म्हणावे ? (२५)

भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भेदिलें कोणें काई ।
भ्रमें भेदिलें म्हणतां ठाईं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥
भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही, हे कळून येते. मग तेथे कोणी कशास भेदले असे म्हणावे ? भ्रमाने भेदले असे म्हणावे तरी तो भ्रमही मिथ्याच होय. (२६)

भ्रमाचें रूप मिथ्या जालें । मग सुखें म्हणावें भेदिलें ।
मूळीं लटिकें त्यानें केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥
भ्रमाचे रूप मिथ्या झाले, तेथे मग खुशाल भेदिले असे म्हणावे. मुळातच जे खोटे आहे, त्याने जे केले म्हणावे तेही तसे खोटेच असते. (२७)

लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काय गेलें ।
केलें म्हणतांच नाथिलें । शाहाणे जाणती ॥ २८ ॥
खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेले ? शहाणे लोक जाणतात की, त्याने केले असे म्हटले जाते, तरी वास्तविक काहीच घडले नसते. (२८)

सागरामधें खसखस । तैसें परब्रह्मीं दृश्य ।
मतिसारिखा मतिप्रकाश । अंतरीं वाढे ॥ २९ ॥
परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसे समजावे. माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजेच ज्ञान अंतरात वाढते. (२९)

मती करितां विशाळ । कवळो लागे अंतराळ ।
पाहातां भासे ब्रह्मगोळ । कवीठ जैसें॥ ३० ॥
मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते. मग तिला हा ब्रह्मगोल कवठाएवढा दिसू लागतो. (३०)

वृत्ति त्याहून विशाळ । करितां ब्रह्मांड बद्रिफळ ।
ब्रह्माकार होतां केवळ । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
वृत्ती त्याहून विशाल केली की ब्रह्मांड बोसत्त्वढे भासू लगते आणि ती अचानक ब्रह्माकार झाली की मग काहीच उरत नाही. (३१)

आपण विवेकें विशाळला । मर्यादेवेगळा जाला ।
मग ब्रह्मगोळ देखिला । वटबीजन्यायें ॥ ३२ ॥
आपण विवेकाने विक्षाल झालो, तर स्थलकालाच्या मर्यादा गळून पडल्याने ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बी प्रमाणे बारीक दिसू लागते. (३२)

होतां त्याहून विस्तीर्ण । वटबीज कोटिप्रमाण ।
आपाण होतां परिपूर्ण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥
त्याहून आपण विशाल झालो की, ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटीपटीने आणखी बारीक दिसू लागते. आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरतच नाही. (३३)

आपण भ्रमें लाहानाळला । केवळ देहधारी जाला ।
तरी मग ब्रह्मांड त्याला । कवळेल कैसें ॥ ३४ ॥
आपण भ्रमाने स्वतःला लहान समजतो. फक्त देहबुद्धीचे होतो. मग आपल्याला ब्रह्मांड कसे कवळ्या येईल ? (३४)

वृत्ती ऐसी वाढवावी । पसरून नाहींच करावी ।
पूर्णब्रह्मास पुरववी । चहूंकडे ॥ ३५ ॥
वृत्ती अशी वाढवावी की ती विस्तार पावून नाहीशीच व्हावी. पूर्णब्रह्माला चहूकडून पुरून उरेल अशी करावी. (३५)

जंव येक सुवर्ण आणितां । तेणें ब्रह्मांड मढवितां ।
कैसे होईल तें तत्वतां । बरें पाहा ॥ ३६ ॥
आपण जर थोडे सोने आणले आणि त्याने ब्रह्मांडाला मढविण्याचा प्रयत्न केला, तर कसे होईल पहा बरे ! (३६)

वस्तु वृत्तिस कवळे । तेणें वृत्ति फाटोन वितुळे ।
निर्गुण आत्माच निवळे । जैसा तैसा ॥ ३७ ॥
वृत्तीला जसजसे स्वरूपाचे आकलन होत जाईल, तसतशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून, वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जसाच्या तसा उरेल. (३७)

येथें फिटली आशंका । श्रोते हो संदेह धरूं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३८ ॥
आता येथे शंका फिटली. श्रोते हो, उगीच संदेह धरू नका. अजून संदेह असेल तर नीट विचार करून पहा. (३८)

विवेकें तुटें अनुमान । विवेकें होये समाधान ।
विवेकें आत्मनिवेदन । मोक्ष लाभे ॥ ३९ ॥
विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल विवेकानेच समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल. (३९)

केली मोक्षाची उपेक्षा । विवेकें सारिलें पूर्वपक्षा ।
सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा । प्रमाण न लगे ॥ ४० ॥
मुक्तपणालाही जो विसरला आणि अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्वपक्षाला म्हणजे सार्‍या मायेलाच बाजूला सारल्यामुळे तिचा त्याग केल्यामुळे सिद्धांतस्वरूप जो आत्माराम तोच तो होतो. हा स्वानुभव असल्याने त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता रहात नाही (४०)

हे प्रचितीचीं उत्तरें । कळती सारासारविचारें ।
मननध्यासें साक्षात्कारें । पावन होईजे ॥ ४१ ॥
हे सर्व प्रचीतीचे बोलणे आहे. सारासारविवेकाच्या योगाने यातील रहस्य कळेल. त्याचे मनन व निदिध्यासन केल्याने आत्मसाक्षात्कार होतो व त्याप्रमाणे तुम्ही पावन व्हाल (व्हावे) (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
संदेहवारणनाम समास नववा ॥
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘संदेहवारणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : स्थितिनिरूपण
॥ श्रीराम ॥

देउळामधें जगन्नायेक । आणी देवळावरी बैसला काक ।
परी तो देवाहुन अधिक । म्हणों नये कीं ॥ १ ॥
समजा, एक देऊळ आहे. त्यात देव आहे आणि त्या देवळाच्या शिखरावर कावळा जाऊन बसला तर तो देवापेक्षा उच्चस्थानी बसला, म्हणून त्याला देवाहून श्रेष्ठ म्हणू नये. (१)

सभा बैसली राजद्वारीं । आणी मर्कट गेलें स्तंभावरी ।
परी तें सभेहून श्रेष्ठ चतुरीं । कैसे मानावें ॥ २ ॥
राजद्वारी सभा भरलेली असताना एखादे माकड येऊन तेथील खांबावर बसले, तर ते त्या सभेहून श्रेष्ठ असे शहाण्या लोकांनी कसे मानावे ? (२)

ब्रह्मण स्नान करून गेले । आणी बक तैसेचि बैसले ।
परी ते ब्रह्मणपरीस भले । कैसे मानावे ॥ ३ ॥
एखाद्या तळ्यातील पाण्यात स्‍नान करून ब्राह्मण तेधून निघून गेले आणि बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसले, तरी त्या बगळ्यांना त्या ब्राह्मणाहून चांगले कसे मानावे ? (३)

ब्रह्मणामधें कोणी नेमस्त । कोणी जाले अव्यावेस्त ।
आणी स्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥
ब्राह्मणांमध्ये कोणी नियमाने वागणारे असतात, तर कुणी अव्यवस्थित वागणारे असतात. आणि एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थासारखा बसला तरी त्याला कुणी ब्राह्मणाहून उत्तम मानत नाहीत. (४)

ब्राह्मण लक्षमुद्रा नेणें । मार्जर लक्षविषईं शाहाणें ।
परी ब्रह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥ ५ ॥
मांजराला लक्ष्ममुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहजसाध्य असते ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. (५)

ब्रह्मण पाहे भेदाभेद । मक्षिका सर्वांस अभेद ।
परी तीस जाला ज्ञानबोध । हें तों न घडे कीं ॥ ६ ॥
ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. माशी सर्व बाबतीत भेद पाहातच नाही म्हणून काही तिला ज्ञानबोध झाला आहे, असे नाही म्हणत (६)

उंच वस्त्रें नीच ल्याला । आणी समर्थ उघडाच बैसला ।
परी तो आहे परिक्षिला । परीक्षवंतीं ॥ ७ ॥
एखाद्या नीच माणसाने उंची वस्त्रे परिधान केली आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसला, तरी यांतील श्रेष्ठ-कनिष्ठाची पारख परीक्षावंत करतात (७)

बाह्याकार केला अधिक । परी तो अवघा लोकिक ।
येथें पाहिजे मुख्य येक । अंतरनिष्ठा ॥ ८ ॥
बाहेरून खूप थाटमाट केला तर तो लौकिकात खपून जातो, पण परमार्थात मुख्य अंतरनिष्ठा पाहिजे. (८)

लोकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाला ।
मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥
एखाद्याने चांगला लौकिक संपादन केला, पण तो अंतरात जर (परमार्थाविषयी) सावध झाला नाही, तर मुख्य देवाला म्हणजे आत्मारामास अंतरतो व आत्मघातकी ठरतो (९)

देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पित्रलोक ।
भूतांस भजतां भूतलोक । पाविजेतो ॥ १० ॥
जे देवाचे भजन करतात ते (मरणोत्तर) देवलोकास प्राप्त होतात. जे पितरांना भजतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते आणि जे भूतांना भजतात ते भूतलोकास जातात. (१०)

जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकासी जावें ।
निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥
जे लोक ज्याचे भजन करतात, ते ते त्या त्या लोकास जातात. जे निर्गुणास भजतात, ते स्वतः निर्गुणच होतात. (११)

निर्गुणाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य ।
अनन्य होतां होईजे धन्य । निश्चयेंसीं ॥ १२ ॥
निर्गुणाचे भजन कसे करावे ? तर निर्गुणाशी अनन्य व्हावे. असे अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. (१२)

सकळ केलियाचें सार्थक । देव वोळखावा येक ।
आपण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥
खरा देव कोण हे ओळखले म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्यांचे सार्थक होते. आपले खरे स्वरूप काय आहे, हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे. (१३)

देव पाहातां निराकार । आपला तो माईक विचार ।
सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥ १४ ॥
देव पाहिला तर तो निर्गुण, निराकार आहे. आपण ज्याला ‘मी’ म्हणतो, तो देह तर मायिक आहे. म्हणून ‘आत्मा तोच मी’ हा निर्धार अंगी बाणतो. (१४)

आतां अनुमान तो काई । वस्तु आहे वस्तुचा ठाईं ।
देहभाव कांहींच नाहीं । धांडोळितां ॥ १५ ॥
म्हणून आता अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. आत्मवस्तु जेथल्या तेथेच असते आणि देहबुद्धीचा शोध घेऊ लागल्यावर ती शिल्लकच राहत नाही ! १५)

सिद्धास आणी साधन । हा तों अवघाच अनुमान ।
मुक्तास आणी बंधन । आडळेना ॥ १६ ॥
जो सिद्ध झालेला असतो, त्याच्या ठिकाणी साधनाची कल्पना करणे किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनाची कल्पना करणे योग्य नाही. (१६)

साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें ।
आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७ ॥
साधन करून जे काही साधावयाचे ते साध्य तो स्वाभाविकपणेझाल असल्याने आता साधनाच्या नावेशून्याकार होतो. म्हणजे त्याला साधनाची आवश्यकता उरत नाही. (१७)

कुल्लाळ पावला राजपदवी । आतां रासभें कासया राखावी ।
कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥
कुंभाराला राज्यपद प्रास झाल्यावर त्याने आता गाढवे कशास्त्र राखावी ? आता त्याल कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव कशाला हवी ? (१८)

तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनांचा उपाव ।
साध्य जालियां कैंचा ठाव । साधनांसी ॥ १९ ॥
त्याप्रमाणे प्रत्येक साधन हे वृत्तिमयच असल्याने शेवटी वृत्ती वाढविण्यासच कारण होते. पण एकदा साध्याशी एकरूप झाल्यावर साधनाला वावच उरत नाही. (१९)

साधनें काये साधावें । नेमें काये फळ घ्यावें ।
आपण वस्तु भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥
आत्मवस्तु आपण स्वतःच असताना साधनाने काय साधायचे किंवा नेमधर्माने काय फळ साध्य करून घ्यायचे आणि उगीच भरकययचे कशाला ? (२०)

देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा ।
परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥
तू जर स्वतःला देह मानत असशील, तर देह तर पंचमहाभूतांचा आहे. जीव जरमानत असशीलतरतोपरब्रह्माचा अंश आहे. आणि परमात्मा जरसमजत असशीलतरत्याच्याशी एकरूप कसे होता येईल, त्याचा शोध घे. (२१)

उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेतां कांहींच नसे ।
तत्वें तत्व निरसे । पुढें निखळ आत्मा ॥ २२ ॥
उगीच देहबुद्धीने पाहू लागले की ‘मी देह’ असे वाटते, पण शोध घेऊ लागल्यावर देह पंचभौतिक हे कळल्याने ‘मी’ वहात नाही. नंतर तत्त्वाने तत्त्वांचा निरास झाला की, निखळ आत्या तेवढा उरतो (२२)

आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें ।
माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥
आत्या आत्मपणाने असतो, जीव जीवपणाने असतो आणि माया मायापणाने म्हणजे मिथ्यात्वाने विस्तार पावलेली असते. (२३)

ऐसें अवघेंचि आहे । आणी आपण हि कोणीयेक आहे ।
हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥
हे सगळे असते आणि त्यांना पाहणारा आपण कुणी एक द्रष्टाही असतो. विवेकाने या सगळ्याचा जो कुणी शोध घेतो, तोच ज्ञानी होय. (२४)

शोधूं जाणें सकळांसी। परी पाहों नेणे आपणासी ।
ऐक ज्ञानी येकदेसी । वृत्तिरूपें ॥ २५ ॥
जो या सगळ्यांचा शोध घेतो, पण आपले स्वरूप जाणत नाही, असा ज्ञानी मीपणाच्या वृत्तीने एकदेशी असतो. (२५)

तें वृत्तिरूप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें ।
प्रकृतिनिरासें अवघेंचि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥
त्या वृत्तिरूपाला साक्षीत्वाने पाहिले की, वृत्तीच शिल्लक राहात नाही. प्रकृतीचा निरास झाला की सर्व नाशिवंत नाहीसे होते. (२६)

उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण ।
ऐसी हे परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥
आणि केवळनिर्गुण ब्रह्म तेवढेउरते आणि त्याचे अनुसंधान केल्याने आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. अशी ही परमार्थाची खूण अगाध आहे. (२७)

फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक ।
फ्ळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे ॥ २८ ॥
आपण कुणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळे अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळाचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच स्वतः होतो. (२८)

रंक होता राजा जाला । वरें पाहातां प्रत्यय आला ।
रंकपणाचा गल्बला । रंकीं करावा ॥ २९ ॥
एखादा दीन भिकारी राजा झाला. नीटपणे शोध घेतल्यावर आपण खरेच राजा झालो आहोत, असा प्रत्ययही त्याला आला. मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकताच त्यात्य रहात नाही. जो कुणी रंक असेल त्याने ती करावी. (२९)

वेद शास्त्रें पुराणें । नाना साधनें निरूपणें ।
सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥
सिद्ध, साधू वेद, शास्त्रे, पुराणे, नाना साधने, नाना निरूपणे ज्यासाठी नाना सायास करतात, (३०)

तें ब्रह्मरूप आपणचि आंगें । सारासारविचारप्रसंगें ।
करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
ते ब्रह्मरूप आपण स्वतःच आहोत, असे सारासारविचाराच्या योगे जाणून घ्यावे, म्हणजे करणे, न करणे काहीच उरत नाही. (३१)

रंक राजआज्ञासि भ्यालें । तेंचि पुढें राजा जालें ।
मग तें भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥
भिकारी पूर्वी राजाज्ञेला भीत होता. पुढे तोच राजा झाला, त्या वेळी रंकपणाही नष्ट झाला आणि त्याबरोबर पूर्वी राजाज्ञेचे भय वाटत होते, तेही नष्ट झाले. (३२)

वेदें वेदाज्ञेनें चालावें सच्च्हास्त्रें शास्त्र अभ्यासावें ।
तीर्थें तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥
ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप, शास्त्ररूप, तीर्थरूप बनतो. वेदाने वेदाज्ञेचे पालन कसे करावे ? सत्-शास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा ? आणि तीर्थाने कुठल्या तीर्थास जावे (३३)

अमृतें सेवावें अमृत । अनंतें पाहावा अनंत ।
भगवंतें लक्षावा भगवंत । कोणा प्रकारें ॥ ३४ ॥
अमृताने अमृत कसे सेवावे, अनंताने अनंत कसा पाहावा, किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावे ? (३४)

संत असंत त्यागावे । निर्गुणें निर्गुणासी भंगावें ।
स्वरूपें स्वरूपीं रंगावें । कोण्या प्रकारें ॥ ३५ ॥
सदा सर्वत्र स्थित, व्यापक आहे त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा बरे ? निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे ? स्वरूपाने स्वरूपात कोण्या प्रकारे रंगावे ? (३५)

अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन ।
निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥
अंजनाने अंजन कसे ल्यावे ? धनाने धन कसे प्रास करावे ? निरंजनाने निरंजनास कसे अनुभवावे ? (३६)

साध्य करावें साधनासी । ध्येयें धरावें ध्यानासी ।
उन्मनें आवरावें मनासी । कोण्या प्रकारें ॥ ३७ ॥
जे साध्य आहेत्याने साधन कसे करावे ? जे ध्येय आहे त्याने ध्यान कसे धरावे ? आणि उन्मनाने मनाला कसे आवरावे. (वरील सर्व गोष्टींचे प्रयोजनच उरत नाही हा भावार्थ आहे.) (३७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्थितिनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्थितिनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त. दशक नववा समाप्त

॥ दशक नववा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *