संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य एकूण २६ अभंग – रामजन्म अभंग १ ते १७
१.
कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥
धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥
ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । कैकई सदनासी जाता झाला ॥३॥
मंचकीं बैसली होती ते पापिणी । देखतां नाययीं पहूडली ॥४॥
सुंदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरि गर्मिणी नामा ह्मणे ॥५॥
२.
राजा ह्मणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसीं सांग आतां ॥१॥
येरी ह्मणे ऐसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्य-पट ॥२॥
ज्येष्ठासी धाडावें दुरी दिगंतरा । नये समाचार त्याचा आह्मां ॥३॥
जनांत हें निंद्य वेदबाह्य कर्म । करितां अधर्म पाप बहू ॥४॥
माझिये मस्तकीं ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश नाहीं नाहीं ॥५॥
निंदितील जन मज वाटे सुख । ऐकतांची दु:ख राया झालें ॥६॥
वृश्चिकाचे पेंवीं तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखीं ॥७॥
ऐशी व्यथा होय नामा ह्मणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथूनियां ॥८॥
३.
येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥
न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥
घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगीं लेपन तीर्थोदकें ॥३॥
गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥
कैकयीचें दु:ख विसरला राव । पाहोनियां भाव सुमित्रेचा ॥५॥
होती जे डोहळे तुझिये मानसीं । सांग मजपाशीं पतिव्रते ॥६॥
प्राणनाथा ऐसें वाटतसें जीवा । वडिलांची सेवा अहर्निशीं ॥७॥
आवडे हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८॥
ऐकतांचि ऐसें कांते़चें वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥
घेऊनियां हातीं रत्नाचें भूषण । टाकी ओंवाळून नामा म्हणे ॥१०॥
४.
दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१॥
पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज निचे ॥२॥
तुझिये मानसीं होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपाशीं ॥३॥
उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथें कैंची उरी देहभावा ॥४॥
सदा समाधिस्थ रामरूप झाली । कौसल्या माउली नामा म्हणे ॥५॥
५.
न बोलेची कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्चयेंसी ॥१॥
माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । ह्मणोनियां विघ्न ओढवलें ॥२॥
निवारी हें दु:ख वैकुंठनायका । रक्षीं या बाळका सुदर्शनें ॥३॥
तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेंचि आतां ॥४॥
नामाचा उच्चार ऐकतांचि कानीं । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥
राजा म्हणे कांहो ऐसी हे अवस्था । कांहो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥
विश्वाचा मी आत्मा स्वयें असें राम । मजमाजी भ्रम कैंचा असे ॥७॥
अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणे ॥८॥
६.
रावणें हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुज-लागीं ॥१॥
आणीरें धनुष्य मारीन रावणा । लंका बिभिषणा देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव्व जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवारे सागरा । पायवाट करा जाव-यासी ॥४॥
लंके पुढें मोठें माजवीन रण । तोडीन बंधन सुरवरांचें ॥५॥
विश्वामित्र याग नेईंन मी सिद्धी । मारीन कुबुद्धि दोघांजणां ॥६॥
खर दूषणांचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळें ॥७॥
ध्याती मज त्याची बहुत आवडी । न विसंबें घडी त्याची एक ॥८॥
बोलिला वाल्मिक तैसोंचि करीन । वर्तोनि दावीन नामा ह्मणे ॥९॥
७.
परबह्म पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपा-चिया ॥१॥
करीति बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लव-करी ॥२॥
येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्ट-भाव ॥३॥
राजा ह्मणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठा झडपिलें महाभूतें ॥४॥
श्रावणवधाचें अघ नाहीं जळालें । दुजें हें निर्मिलें प्रारबधासी ॥५॥
ऐकतांचि हांसे सावध होऊनि । बोलतसे झणीं नामा ह्मणे ॥६॥
८.
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥
परेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येचे उदरीं तोचि असे ॥२॥
बोलियेले जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊं दे मनीं शंका कांहीं ॥३॥
माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मीं कांता लक्षुमीच्या ॥४॥
धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठ-नायक पाहातील ॥५॥
धन्य पशूपक्षी श्वापदें तरुवर । राजा रघु-वीर पाहातील ॥६॥
त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नाम-याच्या बापा पाहाशील ॥७॥
९.
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥
शुक्ल-पक्षीं ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥
माध्यान्हीसी दीनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणी ॥४॥
सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥
नाहीं कौ-सत्येस्री भान । गर्भीं आले नारायण ॥६॥
अयोनीं संभव । प्रगटला हा राघव ॥७॥
नामा ह्मणे डोळं । पाहीन भुवनत्रयपाळा ॥८॥
१०.
सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी ॥१॥
विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भृकुटीं । टिळक लल्लाटीं केशराचा ॥२॥
कमळाकार नेत्र आकर्ण शोभती । कुंडलें झळकती कर्णीं ज्याच्या ॥३॥
सरळ नासिक लावण्य मुखचंद्र । हनुवटी सुंदर राघवाची ॥४॥
कंठाचा आकार कंबुग्रीवा ऐसा । ह्लदयावरी ठसा द्वजिपद ॥५॥
सुकुमार सुरेख जयाचें उदर । ब्रह्मांडें अपार वसती जेथें ॥६॥
नाभीकमळींचा ब्रह्मा नेणे अंत । कडदोरा शोभत कटीं ज्याच्या ॥७॥
दंडीं पेटया करीं जडित मुद्रिका । पिंवळा नेटका पीतांबर ॥८॥
केशराची उटी सरळ बाहूदंड । चिमणा कोदंड हातीं ज्याच्या ॥९॥
गर्जती नेपुरें कोमळ चरणीं । वज्रांकुश चिन्हीं विराजीत ॥१०॥
कौस्तुभ मुक्तमाळा रुळे वैजयंती । भ्रमर भुलती नामा म्हणे ॥११॥
११.
सांगतातील दाया । तुम्हां पुत्र झाला राया ॥१॥
ऐक-तांचि ऐसें कानीं । हर्ष न समाये मनीं ॥२॥
उठा उठा हो त्वरेंसी । पाचारावें वसिष्ठासी ॥३॥
ब्राह्मणासी पाचारा । सांगा सर्व नारी-भरा ॥४॥
फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥
उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥
झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥
नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥
१२.
अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीं । ध्यातसे त्रिपुरारी अह-र्निशीं ॥१॥
पाहातसे मुख दशरथ त्याचें । भाग्य मी तयाचें काय वर्णूं ॥२॥
गंध पुष्प वस्त्रें अर्पोनियां द्बिजां । समभावें पूजा सक-ळांसी ॥३॥
साखरेच्या गोण्या घाला हत्तीवरी । धाडीं घरोघरीं नामा ह्मणे ॥४॥
१३.
करितसे स्नान अजाचा बाळक । वस्त्रें अमोलिक परि-धान ॥१॥
लावोनियां भाळीं कस्तुरी केशर । करी नमस्कार वसिष्ठासी ॥२॥
पुण्याहवचनीं बैसे दशरथ । त्रिभुवनीं समर्थ तूंचि एक ॥३॥
वेदमंत्र घोष करिती ऋषेश्वर । पुष्पें सुरवर वरु-षती ॥४॥
आणिती बाहेर अयोध्येचे जन । करिती गायन गायक जे ॥५॥
नाचती अप्सरा वाजती नगारें । वाजंत्री तुतारे भोंवारे ही ॥६॥
गुलालाची धूम रंग वस्त्रावरी । बंदीजन द्वारीं गर्जताती ॥७॥
नामा ह्मणे इंद्रें पाहोनियां सभा । नाहीं ऐसी शोभा चित्तीं ह्मणे ॥८॥
१४.
बाई कशाच्या नवबता । पुत्र झाला दशरथा ॥१॥
चला चला तेथें जाऊं । कौसल्येचें बाळ पाहूं ॥२॥
नवसें बहुत । तिशीं पावला भगवंत ॥३॥
घ्याग घ्याग त्वरें वाण । झगा फडकी पेहरण ॥४॥
करूनि शृंगारा । येती राजयाच्या घरा ॥५॥
पाहतां सुकुमार सांवळा । लवूं विसरला डोळा ॥६॥
सार्थक जन्माचें । नामा ह्मणे झालें त्यांचे ॥७॥
१५.
भांडारी येऊनि करिती प्रार्थना । द्विजांसी दक्षणा काय द्यावी ॥१॥
जया लागे जितुकें तितुकें त्यानें घ्यावें । तुह्मीं न रहावें उभें तेथें ॥२॥
धांवताती तेव्हां बिप्र सकळिक । एकाबरीं एक पड-ताती ॥३॥
करूं नका घाई सर्वांसी पुरेल । न राहे दुर्बळ यांत कोणी ॥४॥
नामा म्हणे ऐसें धन वाटी राजा । सुखी केल्या प्रजा सकळीक ॥५॥
१६.
ब्राह्मणांची इच्छा पूर्ण झाली जेव्हां । आशिर्वाद तेव्हां वइताती ॥१॥
कल्पकोष्टी यासी नाही नाहीएं भय । सकळांचें ध्येय हेंचि असे ॥२॥
तपाचिया राशी जाहल्या बहुत । ह्मणोनियां सुत झाला तुज ॥३॥
तथास्तु ह्मणोनि जोडीत अंजुळ । पायांवरी भाळ नामा म्हणे ॥४॥
१७.
बाई कौसल्येचा पुत्र । दिसे सर्वांही विचित्र ॥१॥
ऐसें वाटे माझ्या चित्तीं । प्रगटली विष्णुमूर्तीं ॥२॥
झणीं होईळ या दृष्ट । मोडताती कानीं बोट ॥३॥
तिच्या भाग्यें असो सुखी । याचा म्हणे सर्वांमुखीं ॥४॥
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य – रामजन्म अभंग १ ते १७ समाप्त
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य – रामचरित्र अभंग १ ते ८
१.
धन्य ते संसारीं पवित्र ते वाणी । अखंड उच्चारणी रामनाम ॥१॥
तयांचीच एक सरली येरझार । उतरले पार भव-नदी ॥२॥
वधोनी ताटीका सुबाहुही देख । सिद्धि नेला मख कौ-शिकाचा ॥३॥
पहावया यावे स्वयंवर सीतेचें । आलें जनकाचें पत्र तेथें ॥४॥
मारगीं चालतां ब्रम्हीयाची बाळा । उद्धरली शिळा पदरजें ॥५॥
मोडील धनुष्य तया हें देईन । केला होता पण ज-नकानें ॥६॥
रावणादि राजे आले थोर थोर । त्यांचा उत-रला नूर पाहतांची ॥७॥
अहर्निशीं जया ध्यानीं ध्याय भोळा । तो उठला सांवला बाप माझा ॥८॥
सुरां असुरां असाध्य ऐसें तें प्र-चड । तें तीं ठायां कोदंड मोडियलें ॥९॥
पाहोनी ऐसें नामा म्हणे बळ । सीता घाली माळ रघुवीरा ॥१०॥
२.
संत समागमें चाले दळभारू । आशा तृष्णा देश-धडी अहकारू ॥१॥
दुम दुम दुम दुम भेरी वाजे । आले अयो-ध्येसी श्रीरघुनाथ राजे ॥२॥
भक्तभद्रजाती दोन्ही बाहीं चालत । विष्णुदास नामा कीर्ति वाखाणित ॥३॥
३.
पैल आला रामराणा । लंका दिधली बिभिष्रणा ॥१॥
नळनीळ जांबुबंत । मध्यें चाले रघुनाथ ॥२॥
मागें वानराचे थाट । पुढें गर्जताती भाट ॥३॥
केला अयोध्या प्रवेश । म्हणे नामा विष्णुदास ॥४॥
४.
राम पिता सीता माता । लक्ष्मण सोयरा चुलता ॥१॥
तयांसी भेटों जाऊं आतां । चित्रकूटींच्या पर्वता ॥२॥
नाना म्हणे माझें गोत । चित्रकूटीं असे नांदत ॥३॥
५.
काळे गोरे धनुर्वाडे । ते चालताती रामापुढें ॥१॥
राम निळिये गुढारी । कनक दंड चवरे वरी ॥२॥
चला चित्रकूटीं जाऊं । राम दशरथाचा पाहूं ॥३॥
अयोध्ये केला अवतारु । राम नामया दातारु ॥४॥
६.
गोरे सांवळे घनवटे । एक चालती एकापुढें ॥१॥
राम निळीय पुढारी । कनकदंड चौरेवरी ॥२॥
राम लक्ष्मण विजयी झाले । आनंदें अयोध्ये आले ॥३॥
चंद्रगिरीचे तळवटीं । राम सीतेसी झाली भेटी ॥४॥
चंद्रगिरीं चला जाऊं । राम दाशरथी पाहूं ॥५॥
चंद्रगिरीं केला वास । म्हणे नामा । विष्णुदास ॥६॥
७.
ह्मणसी बिभिषण शाहणा । परि तो महा मूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला । भेटून रामचि नाहीं झाला ॥२॥
राम दृष्टी देखतांची । पदवी न घेववेचि त्याची ॥३॥
कोण हित केलें तेणें । राम न कळी चिंतनें ॥४॥
जरी तो झाला लंकापती । नाश पावेल कल्पांतीं ॥५॥
नामया स्वामी तें जाणोन । अवघा रामचि होईन ॥६॥
८.
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा ॥१॥
पावलों विश्रांति धालें माझें मन । न लगे आतां ध्यान शिकावया ॥२॥
ज्या साठीं हिंडणें जटामौन नग्न । ध.रिलें तेणें ठाणें ह्लदयीं माझ्या ॥३॥
योग याग तप करावें साधन । तोहि जाण ओंठीं सदा वसे ॥४॥
तीर्थयात्रा देव ज्यासाठीं करावे । तें ब्रह्म बरवें नांदे देहीं ॥५॥
ब्रह्मचर्यादिक आश्रम साधावे । केली तया देवें देहीं वस्ती ॥६॥
वेदशास्त्र पुराण ज्यासाठीं पठण । तो नांदे परिपूर्ण ह्लदयीं माझ्या ॥७॥
ऐसा तो सज्जन जिवलग सांगाती । दिधली मज विश्रांति नामसंगें ॥८॥
तैसें नव्हे ज्ञान फुटक्या हां-डोरयाचें । धरूनियां साचे खोखा वाजे ॥९॥
स्वधर्मीं विचार वेंचाचे अन्वयें । लाधले हे पाय गुरुकृपें ॥१०॥
अभंग भंगेना फोडितां फुटेना । गुरुकृपें जाणा प्राप्त जालें ॥११॥
चावळी वटवूट बोलणें बासर । हे तंव अवघे चार मर्कटाचे ॥१२॥
परनिंदा परद्रौहो करणें या संतांचा । जाळावी ते वाचा ज्ञान त्याचें ॥१३॥
न लगे सोंग ध-रणें देह ताप करणें । ऐसें निजध्यान हातां आलें ॥१४॥
नाम घेतां रूप ह्लदयीं बिंबलें । सर्वत्र देखिलें तेंचि डोळां ॥१५॥
नाम-मंत्र बीज नाहीं जंववरि । केशव तंववरि प्राप्त नाहीं ॥१६॥
नामाचे धारक ते केशवरूप । वैकुंठींचें सुख रुळे पायीं ॥१७॥
नामें-विण ज्ञान नपूंसक ऐसें । नातळती कैसे साधुसंत ॥१८॥
नाम तेंचि रूप रूप तेंचि नाम । नाम रूपाभिन्न नाहीं नाहीं ॥१९॥
आकारला देव नामरूपा आलें । म्हणोनि स्थापिलें नामदेवें ॥२०॥
नामापरता मंत्र नाहीं वो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥२१॥
नामा ह्मणे ज्ञान केशव केवळ । जाणती प्रेमळ भले भले ॥२२॥
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य – रामचरित्र अभंग १ ते ८ समाप्त
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य – सीताशुद्धि अभंग १
१.
हनुमंत गेला सीताशुद्धिलागीं । लंका मध्यभागीं ये-ऊनियां ॥१॥
माता जानकीच्या करीत शुद्धीसी । हिंडे गृहदेशीं राक्षसांच्या ॥२॥
न देखे तो सती सीतादेवीमाया । अकस्मात तया वनामाजी ॥३॥
शिंसीवावृक्षाचे असे तळवटीं । समीप निकटीं राक्ष-सींचे ॥४॥
न चले उपाय कांहीं तो बोलाया । स्मरे रामराया तये काळीं ॥५॥
श्रीरामें मुद्रिका दिली होती संगें । तयासी अव्यंग सो-डावया ॥६॥
वृक्षाचिया माथां बैसोनियां बळी । देत करकमळीं सोडू-नियां ॥७॥
जानकी अवलोकी श्रीरामाची मुद्र । कोठोनी कपींद्रा आणलीसे ॥८॥
सुखी रामराणा कवणिये वना । माझिया तूं प्राणा बोलें वेगीं ॥९॥
ऐकोनी कपींद्र चरणासी वंदी । ह्मणे रामचंद्र सुखी असे ॥१०॥
सहितसौभित्र वनामाजी आहे । शुद्धीलागीं पाहे पाठविलें ॥११॥
तुझेनि वियोगें रामराजा दु:खी । यालागीं तुज देखीं पाठविलें ॥१२॥
ऐकतांची वाणी करीत आक्रोशा । ह्मणे राम कैसा सोडि-बोलतसे ॥१४॥
समीप जे होते रक्षपाळ बळी । ऐकोनी आरोळी दूर झाले ॥१५॥
तये संधीमध्यें हनुमंत खालौता । येवोनियां माता वंदितसे ॥१६॥
क्षुधाक्रांत भारी ह्मणे काय खाऊं । सांगसी उपाऊ तरी येथें ॥१७॥
वनामाजी मेवा घेऊनियां कांहीं । क्षुधेसी ते पाही शांतवावी ॥१८॥
म्हणे सीता दूता रक्षपाळ होती । नि-रोध करिती तुजलागीं ॥१९॥
ह्मणोनियां पाहीं भूमीगत कांहीं । घेऊनि स्वदेहीं विश्रांतीसी ॥२०॥
पडलें तें घेईं ऐसी आज्ञा पाही । वंदोनियं पायीं संतोषला ॥२१॥
करोनी उड्डाण वृक्षमाथां बैसे । उपडोनी झाडास हालवीत ॥२२॥
खालीं पाडी फळें तयांचें भोजन । करूनियां वन विध्वंसिलें ॥२३॥
रक्षपाळ सारे मिळोनी कपींद्रा । धरावया सारा यत्न केला ॥२४॥
न चढे हातासी बहुबळ त्यासी । राक्षसां विध्वंसी हातपायीं ॥२५॥
वृक्षाचेनि घायें मारिले उपायें । ऐसी बळ सोय दाखवीत ॥२६॥
जंबूमाळी बार्गीं तया अधिकार । धांवोनी सत्वर रायापाशीं ॥२७॥
मात ते घेउनि आला तो धांवूनि । कपीराज वनीं आला एक ॥२८॥
त्यानें सर्व वन पाडिलें उपडोन । कोणाचा तो कोण कळेना हो ॥२९॥
राजा करी आज्ञा धरा बांधा त्याला । मारा वानराला वेगीं जारे ॥३०॥
ऐक-तांचि वाणी भूपामुखींची हो । उआठेले लवलाहो राक्षसगण ॥३१॥
जावोनी वेढिला कपीराज राणा । धनुष्यासी बाणां लावूनियां ॥३२॥
मारितं बाणासी न लागे कपिसी । तेव्हां युक्ति कैसी आरंभिली ॥३३॥
करूनि फांसासी धरूं ह्मणती त्यासी । नये तो फांसासी आटोपितां ॥३४॥
धरिती जरी बाहीं निघोनियां जातां । न चढे तो हातां कवणाच्या ॥३५॥
थोर जरी फांसा होत तो लहान । जाय तो निघोन फाशांतुनी ॥३६॥
लहान जरी केला तरी होतो थोर । फांशाचा विचार व्यर्थ करीती ॥३७॥
ऐशापरी झाले श्रमातुर भारी । कपि तो विचारी कार्य पुढें ॥३८॥
ह्मणोनी फांशांत पडे तो तेधवां । धरोनी वानरा नेती दूत ॥३९॥
सन्मुख रावणें देखुनि कपीसी । करी कौतुकासी अपूर्व हो ॥४०॥
कधीं नाहीं ऐसें स्वरूप देखिलें । येणें फार केलें नाशालागीं ॥४१॥
पुसत तूं कोण कवण कार्यालागीं । पातलासी वेगीं याच ठायीं ॥४२॥
वानर म्हणे आलों मूर्खा रावणारे । रामदूत खरे सीताशुद्धि ॥४३॥
ऐकोनि रावण म्हणे यासी जाळा । शेंपूट गुंडाळा अग्नि लावा ॥४४॥
कपीसी पुसिलें म-रण कोणे ठायीं येरू पुच्छ दावी म्हणोनियां ॥४५॥
समग्र लंकेचीं आणोनियां वस्रें । कपीपुच्छ पुरें न होयची ॥४६॥
तेव्हां राजधीनी आणोनी वेष्टितां । परी तो पुरतां न होयची ॥४७॥
तेव्हां तेल घाला म्हणे तो रावण । दूत ते धांवोन टाकिताती ॥४८॥
लावूनि अग्निसीं केला मोठा ज्वाळ । वानर तत्काळ उडाला हो ॥४९॥
लंकेची ते केली सारी तेणें होळी । सहित मंडळी राजघरें ॥५०॥
भुकुक्कार केला वानर उडाला । लंकेमाजी झाला प्रळय हो ॥५१॥
अग्नीचा उबाळा धुरानें दाटला । देखे कपि त्याला सुखरूप ॥५२॥
मुखासी लागला पाहतांची डोळां । म्हणोनी तो झाला शामवर्ण ॥५३॥
येवोनि लवलाहीं श्रीरा- मातें पाही । नमूनि सर्वही सांगितलें ॥५४॥
तेव्हां नामा म्हणे होतों मी जवळा । चरणकमळां ध्यात तेथें ॥५५॥
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य – सीताशुद्धि अभंग १ समाप्त
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य एकूण २६ अभंग समाप्त
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral