सांगा कैसी आहे – संत परिसा भागवत अभंग – २

सांगा कैसी आहे – संत परिसा भागवत अभंग – २

सांगा कैसी आहे लंकेची रचना।
कोण-कोणत्या स्थानी राहताती।
बाबा तेचि सांगा मजलागी खूण।
बोलत प्रमाण नामा त्यासी।
दोघांचा संवाद होता महाद्वारी।
विस्मय अंतरी करिती संत।
परसोबा सांगत रुक्मिणी।
हातावरी दाविली नगरी बिभिषणाची।
पाहूनिया लंका आनंदला मनी।
पाहतो तो नामा उभा कीर्तनासी।
गुणगान असे देवाजिचे।”

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगा कैसी आहे – संत परिसा भागवत अभंग – २