बरवें झालें बरवें झालें – संत निळोबाराय अभंग – ८१३
बरवें झालें बरवें झालें ।
आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥
सद्गुरुनीं कृपा केली ।
वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥
आनंदीं आनंद ।
पाहे तिकडे हा गोविंद ॥३॥
निळा म्हणे मी निष्काम ।
परिपूर्ण आत्माराम ॥४॥
बरवें झालें बरवें झालें ।
आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥
सद्गुरुनीं कृपा केली ।
वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥
आनंदीं आनंद ।
पाहे तिकडे हा गोविंद ॥३॥
निळा म्हणे मी निष्काम ।
परिपूर्ण आत्माराम ॥४॥