निजध्यास लागला मनीं – संत निळोबाराय अभंग – ८०२

निजध्यास लागला मनीं – संत निळोबाराय अभंग – ८०२

निजध्यास लागला मनीं ।
हाचि चिंतनीं दिवसरात्रीं ॥१॥
न सुटेचि करुं कैसें ।
लाविलें पिसें गोवळें ॥२॥
येऊनि जाऊनि पुढेंचि उभा ।
लाविलें भांवा मन माझें ॥३॥
निळा म्हणे नवचें दुरि ।
भरला शरीरीं न सुटेचि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निजध्यास लागला मनीं – संत निळोबाराय अभंग – ८०२