म्हणविते शरणांगत ।
कोणाचे भक्त देवावीण ॥१॥
कोणापाशीं हा परिहार ।
देते संसार यातनेचा ॥२॥
कोण देवाविण येते ।
भक्तांसी सोडविते भयांतुनी ॥३॥
निळा म्हणे देव आणि भक्त ।
येरेयेरा होत साह्य सदा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.