Categories: इतर

न कळती तुझिया – संत निळोबाराय अभंग – ५०८

न कळती तुझिया – संत निळोबाराय अभंग – ५०८


न कळती तुझिया मावा ।
दैत्यां देवां आणि मानवां ॥१॥
कैसें तुझे रुप नाम ।
कोण कूळयाति धर्म ॥२॥
जागृत आहेसीं कीं निजलेला ।
उपवासीची कीं धाला ॥३॥
निळा म्हणे जित कीं मेला ।
न वजसी कोणी देखिला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न कळती तुझिया – संत निळोबाराय अभंग – ५०८