देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे- संत निळोबाराय अभंग – ११६९

देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे- संत निळोबाराय अभंग – ११६९


देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे ।
ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥
याल तरि नेईन वैकुंठलोकां ।
ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥
रिध्दिसिध्दी देईन तुम्हां ।
ते म्हणती आम्हां विटाळ तो ॥३॥
विचारी देव करावें कैसें ।
कैवल्याही ऐसें नेघों म्हणती ॥४॥
आतां आवडेल तरी तें मागा ।
देईन सांगा जीवींचें तें ॥५॥
निळा म्हणे ह्रदयीं ध्यान ।
दयाहो जीवन नाम तुमचें ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे – संत निळोबाराय अभंग – ११६९