श्रवणीं कीर्तीं ऐकेन – संत भानुदास अभंग करूणा – ७६

श्रवणीं कीर्तीं ऐकेन – संत भानुदास अभंग करूणा – ७६

श्रवणीं कीर्तीं ऐकेन मुखें नाम गाईन ।

डोळेभर पाहीन श्रीमुख देवा ॥१॥
चरणें करीन प्रदक्षिणा नमन चरणा ।
घालीन लोटांगणा संतद्वारीं ॥२॥
एकादशीं व्रत जागर निराहारी ।
द्वादशीं क्षीरापती निर्धारी सेवीन मी ॥३॥
भानुदास म्हणे हाचि माझा प्रेम ।
दुजा कांही श्रम न करी आन ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

श्रवणीं कीर्तीं ऐकेन – संत भानुदास अभंग करूणा – ७६