Categories: इतर

इंद्रायणी काठचा अनुभव

इंद्रायणी काठचा अनुभव

तुकाराम गाथा हे मोबाईल अँप बनवल्यानंतर खूपदा मनामध्ये विचार येत होता कि देहू आणि आळंदी ला भेट देऊन यावे. तसा योग आला. दोन्ही तीर्थस्थानी जाण्यास उशीर झाला होता. देहू मधून दर्शन करून आळंदी कडे निघालो. आळंदी कडे जात असताना इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गाणं सतत मना मध्ये गुणगुणत होतो.लहानपणीपासून वडील भजन करत असताना हे गाणे सतत कानावर पडत होते. इंद्रायणीचा काठ लहानपणा नंतर पाहण्याचा योग येणार होता.

मनामध्ये उत्सुकता होतीच. जशी जशी आळंदी जवळ येत होती उत्सुकता वाढत होती देवाची आळंदी पाहायची होती. वेळ रात्रीच्या 10ची झाली होती. आळंदीच्या पुलावरून आळंदी मध्ये प्रवेश करताच मंदिराच्या आवारात मधील विद्युत रोषणाईने डोळे दिपून गेले होते. ज्ञानदेवाची समाधी कडे जायची उत्सुकता अजूनच वाढत होती. इंद्रायणी काठी ची देवाची आळंदी पहायची होती.

गाण्यांमध्ये असलेले इंद्रायणी सुंदर वर्णन आणि प्रत्यक्षात असलेली इंद्रायणी नदी यामध्ये खूप फरक जाणवत होता. समाधीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इंद्रायणीच्या काठी थोडा फिरावं वाटलं. इंद्रायणीचा घाट ज्या पद्धतीने बांधला होता आणि विद्युत रोषणाई होती त्याने संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता. परंतु इंद्रायणी नदीची परिस्थिती असाह्य करणारी होती. पाण्याचा येणारा घाण वास, घाटाच्या कोपऱ्या वरती थुंकून केलेली घाण पाहावत नव्हती. इंद्रायणी काठी देवाची आळंदी यामध्ये असलेले इंद्रायणीचे वर्णन आणि आज प्रत्यक्षात असलेली इंद्रायणी यामध्ये खूप फरक होता.

ही परिस्थिती का उद्भवली याचा अभ्यास होणे गरजेचे आहे फक्त अभ्यास करून थांबणे नाही तर याच्या वरती कठोर पावले उचलून योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या आणि तीर्थस्थळांना भेट देणार्‍या लोकांची संख्या हि वाढतच आहे बरे संस्थान या गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत. काळानुसार स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत. परंतु नदीपात्रामध्ये मोठ्या कंपनीचे सांडपाणी सोडले जाते शहरातील घाण पाणी सोडल जातं ह्या अतिशय चुकीचा आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे प्रशासनाने यावर ती ठोस पावले उचलली पाहिजेत. इंद्रायणी नदीचा फक्त दूषित आहे असं नाही तर गंगा नदी देखील या या प्रकारातून सुटलेली नाही.

महाराष्ट्र मधील सतत ऐरणीवर असलेला पाणी प्रश्न भयानक आहेच त्यातल्या त्यात तीर्थक्षेत्र काठी असलेल्या नद्यांचा झालेला नाश हा अजून दुःख देणार आहे. फक्त पाणी वाचवा च नव्हे तर नद्या वाचवा यावर काम होणे गरजेचे आहे.

तसेच भाविकांनी देखील तीर्थक्षेत्रावर ते गेल्यानंतर स्वच्छता राखणे गरजेचे आहे हे काम नव्हे तर कर्तव्य समजून करणे गरजेचे आहे अशाप्रकारे आपण आपले तीर्थक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो.

लहानपणी पासून ऐकत असलेले इंद्रायणीचं वर्णन आणि प्रत्यक्षातील इंद्रायणी यातील विसंगती दुःख देणार होती उद्याच्या पिढीसाठी आपण हे वर्णन असं ठेवणार आहोत. इंद्रायणी अजून खराब करणार आहोत हे आपल्याला ठरवणे गरजेचे आहे.

तुकाराम गाथा

प्रा.किरण साधना अरुण सुपेकर
Santsahitya.in

View Comments