भगवत् भक्त संत कुर्मदास

भगवत् भक्त संत कुर्मदास – Bhagavat Bhakta sant Kurmadas

भगवत् भक्त संत कुर्मदास 

आई ये, आई किर्तनाची वेळ झाली चल लवकर, किर्तन किर्तन रोज किर्तन. गुडघ्यापासून पाय नाहीं तुला, कोपऱ्यापासून हात नाहीं तुला. कोण नेहील रोज तुला किर्तनाला? वर लहान नाही  २२ वर्षांचा मोठा आहेस, नाही उचलत आई खरं आहे तुझं म्हणन, मी २२ वर्षाचा घोडा झालो, पण तुझ्या काही उपयोगाला आलो नाही. माझ्या पित्तानं झरून झरून प्राण सोडला मी जिवंत आहे.

आई मी बिन हाताचा, बीन पायाचा. माझा कायगं दोष?, आई आई आजच्या दिवस किर्तनाला मला घेऊन चल. आजच्या दिवस, उद्या नाही म्हणनार आई, आईचेचे डोळे पाण्याने डबडबले. आईच होती ती. “ऐसी कळविण्याची जात” आईन पाठीवर घेतलं. माडीपासून पाय नाही. कोपरापासून हात नाही, पुत्र तिचा , कंबरेला लगोट, गळयात तुळशीची माळ, कपाळी टिळा ७०० वर्षापुर्वी पैठणात वाळवंटात किर्तन चालू होत.

भानुदास महाराजाचं, भानुदास महाराज नाथ महाराजांचे पंजोबा. भानुदासाचे चक्रकांत, चक्रकांत चे सुर्यकांत आणि सुर्यकांतचे नाथ महाराज, भानुदास महाराजांचे किर्तन चालु आहे. आई आणुन सोडलं. वाळवंट माणसांनी भरून गेलाय, चालता येत नाही. माणसातून रस्ता काढत, पोटावर फरपडत फरपडत समोर आला महाराजांच्या. ज्याला किर्तन ऐकायचे, त्यानी अगोदर येत जावं पुढे बसत जावं. किर्तनाला जावून जागा पकडा, किर्तनाला जागे रहा, बाबा यायच्या अगोदर किर्तनाला येत जाव, पुढे बसत जाय, हे भानुदास महाराज सांगत होते. महाराजाचे लक्ष गेल. आला का कुर्मदासा? आई बरोबर आलो. कशाला आईला त्रास दिलास, कुर्मदासा आता घरी कसा जाशिल? नाही बाबा आता मला घरी नाही जायचं, आमचं आजचं शेवटचं किर्तन.

आता काला करून निघणार आहे पंढरीला. उद्या काल्याचे किर्तन आहे. हो काल्याच किर्तन आहे. काला झाला कि हाला. साडेतीन वाजेपर्यंत सुपडा साफी काहीच शिल्लक राहत नाही. आम्ही सगळे पंढरीला जाणार. महाराज मी येऊ का पंढरीला किर्तनाला यायला आईच्या पाठकोळी याव लागत तुला. तुला कोण नेईल रे पंढरीला एवढ  लांब. महाराज तुम्ही फक्त हो म्हणा, तुम्ही मनापासून होय म्हणा महाराज, महाराज विनादाने म्हणाले होय ये. वारकरी झोपलेले पाहिले आणि कुर्मदास महाराज हे उठले, आणि गोदारीमध्ये स्नान केले, फरफडत फरफडत लोटांगन घालत पंढरीचा रस्ता धरला, तांबड फुटलं लोक उटु लागले. जाणारा येणाऱ्यास विचारू लागले,

अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो. पुढे जा मग पुढ विचार सकाळी १० वाजेपर्यंत कुर्मदासांनी फरफडत बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच मंदिर गाटलं. मोठ्याने वरडु लागले ऐका ऐका हो भानुदास महाराजंची दिंडी पंडरीच्या वाटेवर आली हो हो. कुणी कालवण आवाणे कुणी भाकरी आणाव्यात भानुदास महाराजंची दिंडी आली तोपर्यत खाण्यापिण्याची सोय केली .

बिना हाता पायाच्या कुर्मदासाला भानुदास महाराजांनी विचारलं कुर्मदासा कसा आलास रे? महाराज तुमच्या हो ने मला आणलं, भानुदास महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचे जेवण देऊन दुपारी प्रवचन झाल, हरिपाठ झाला, किर्तन झालं महाराज म्हणाले उद्याचा आपला मुक्काम मांजरसुंबा रात्री वारकरी झोपले कि फरफडत कुर्मदारा मांजरसुंबा गाठलं. तेथेही हाकारा केला व भोजनाची व्यवस्था केली, एक एक मुक्कमा मागे पडु  लागला येरमाळा बाशी असं करत करत त्यांनी कुडुरुवाडी   पासून जवळचं लऊळ हे गावं आहे. तेथे त्यांनी हाकारा दिला दिंडी मागुन आली महाराजाचं प्रवचण झालं. कुर्मदासाजवळ महाराज आले कुर्मदासा आत्ता एकच  मुक्काम राहिला आहे.

कूर्मदास म्हणाले नाही येऊ शकणार आता एवढ्या लांब, महाराजं म्हणाले एवढ्या लांब आला आणि एका मुक्कामासाठी  येणार नाही असं का म्हणतो? कुर्मदास पालथा होता तो उथाना झाला सगळं पोट सोलून निघालेलं, प्रचंड जखमा झालेल्या होत्या रक्त वाहत होत, जखमात खड़े रूतले होते, कुर्मदास थकुन गेला होता बोलायचा त्राण राहिलं नव्हत. निघाल्यापासुन पोटात अन्न नव्हतं.

सगळयासाठी अन्न गोळा केल पण स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही. का?

मलमुत्र कोण धुईल माझ ?

घरी आई धोत होती माझी म्हणून अन्न सोडलं हिंथे कोण धोईल? म्हणून अन्नपाणी सोडले. भानुदासाचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केले हे? कुर्मदास म्हणाले महाराज घरी राहुन काय कैलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर तरी आलो. आपण एकच करा?  उद्या पंढरपूरला गेल्यावर पांडूरंगाला दोनदा नमस्कार सांगा, सांगा पांडूरंगाला तुझ्या पायथ्याशी येयला कुर्मदासाचं पुण्य कमी पडलं. या  जन्मात पाहता नाही आले चरण माझ्या पांडूरंगाना एवढ  निरोप सांगा, भानुदासाचे पाय जड झाले. तसेच पंढरीला आले, चंद्रभागेचे स्नान केले. पांडूरंगाच्या दर्शनासाठी बारीला उभा राहिले, भानुदासाने पांडूरंगाकडे पाहिले व पांडूरंगाने भानुदासाकडे पाहिलं अन्तकरणातलं चिंतन पांडूरंगापर्यंत पोहचले. पांडूरंगाने रुक्मिणी मातेला सांगितलं लक्ष ठेव वारीवर लऊळल  जाऊन येतो, पांडूरंगाने गरुडाला आज्ञा केली. पांडूरंग कुर्मदासाजवळ आले, त्याचे शिरकमल  आपल्या मांडीवर घेतले. कुर्मदोरसला शुद आली, त्यांनी वर पाहिले.

भगवंताचं रूप दिसलं, पांडूरंग म्हणले कुर्मदासाला भी आंलोय तुझ्यासाठी भगवंता  तु आला माझ्यासाठी वर माझ्यासाठी हिच खरी पंढरी काळजी करू नको कुर्मदासा काय  पाहिजे तुला ते मागं कुर्मदास म्हणतो मला काही नक्की देयायचं असेल तर जन्मोजन्मी माझ सदगुरु मला लाभो , बाकी काही नको. आणि पांडूरंगाच्या मांडीवर शोत डोळे मिटले, अशीही ७०० वर्षापुर्वी घडलेली संत कथा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते हतबल होऊ नवा भक्तीच्या मार्गान् उपासनेच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर नर जन्मच सार्थक करून घेता येत. जे शेतकरी आत्महत्या करण्याचे विचार येताय त्यांना विचार कराय लावणारी हि एक  सत्य व संत था आहे.

क्रथा व लेखन

फिरोज आदम मुजावर ,मोडनीब

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *