सिद्धीचे साधन नेणती – संत निवृत्तीनाथ अभंग
सिद्धीचे साधन नेणती ।
ते सिद्ध अधिक उद्धोध आनंदाचा ॥१॥
तें रूप सांवळें देवकीये लीळे ।
भोगिती सोहळे कृष्णरूपें ॥२॥
उन्मनी अवस्था लाविती ते मुनी ।
अखंडता ध्यानीं कृष्णसुख ॥३॥
निवृत्ति ठकार श्रुतीचा आकार ।
गोपाळ साकार अंकुरले ॥४॥
सिद्धीचे साधन नेणती – संत निवृत्तीनाथ अभंग
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा