प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज – संत निवृत्तीनाथ हरिपाठ

प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज – संत निवृत्तीनाथ हरिपाठ


प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज ।
आम्हां बॊलता लाज यॆत सयॆ ।। १।।
काय करूं हरी कैसां हा गवसॆ ।
चंद्रसूर्य अंवसॆ ऎकसूत्र ।। २।।
तैसॆं करूं मन निरंतर ध्यान ।
उन्मनी साधन आम्हां पुरॆ ।। ३।।
निवृत्ति हरिपाठ नाम हॆंचि वाट ।
प्रपंच फुकट दिसॆ आम्हां ।। ४।।


राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.