क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति – संत निवृत्तीनाथ हरिपाठ

क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति – संत निवृत्तीनाथ हरिपाठ


क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति ।
अवघी हॆ क्षिती ऎकरूपॆं ।। १।।
शांति दया पैसॆ क्षमा जया रूप ।
अवघॆची स्वरूप आत्माराम ।। २।।
निंदा द्वॆष चॆष्टा अभिमान भाजा ।
सांडूनियां भजा कॆशवासी ।। ३।।
निवृत्ति तिष्ठतु ऎकरूप चित्त ।
अवघींच समस्त गिळियॆलीं ।। ४।।


राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.