कल्पना काजळी कल्पिलॆ कवळी – संत निवृत्तीनाथ हरिपाठ
कल्पना काजळी कल्पिलॆ कवळी ।
कैसॆनि जवळीं दॆव हॊय ।। १।।
टाकी हॆ कल्पना दुरित वासना ।
अद्वैत नारायणा भजॆं कां रॆ ।। २।।
मॊहाच्या जीवनीं नकॊ करूं पर्वणी ।
चिंती कां आसनीं नारायण ।। ३।।
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु ।
कल्पना साचारु हरी झाला ।। ४।।
राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.