अरूप बागडे निर्गुण – संत निवृत्तीनाथ अभंग
अरूप बागडे निर्गुण सवंगडें ।
खेळे लाडेंकोडे नंदाघरीं ॥ १ ॥
तें रूप संपुर्ण यशोदा खेळवी ।
कृष्णातें आळवी वेळोवेळां ॥ २ ॥
सागरजीवन सत्रावीची खुण ।
मेघ ती वर्षण वोळलीसे ॥ ३ ॥
निवृत्तिचें धन गोकुळीं श्रीकृष्णां ।
गयनी सहिष्णु प्रेमें डुल्ले ॥ ४ ॥
अरूप बागडे निर्गुण – संत निवृत्तीनाथ अभंग
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा