तुमचा भरंवसा धरोनी मानसीं – संत निर्मळा अभंग

तुमचा भरंवसा धरोनी मानसीं – संत निर्मळा अभंग

तुमचा भरंवसा धरोनी मानसीं ।
दृढ पायांसी शरण आलें ॥१॥
आतां कळेल तो रावा विचार ।
मी आपुला भार उतरिला ॥२॥
मांडीवरी मान ठेविली संपूर्ण ।
पुढील कारण जाणोनियां ॥३॥
निर्मळा म्हणे तारा अथवा मारा ।
तुमचें तुम्ही सारा वोझें आतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुमचा भरंवसा धरोनी मानसीं – संत निर्मळा अभंग