तिहीं त्रिभुवनीं विस्तारिली कीर्ती – संत निर्मळा अभंग
तिहीं त्रिभुवनीं विस्तारिली कीर्ती ।
तो हा श्रीपती उभा विटे ॥१॥
अनाथाचा नाथ पतित पावन ।
हें आम्हां वचन सांपडलें ॥२॥
नाम धारकाच्या लागेन चरणीं ।
घेईन पायवणी पोटभरी ॥३॥
आनंदे निर्भर नाचेन महाद्वारीं ।
संत अधिकारी तेथीचे जे ॥४॥
निर्मळा करी प्रेमाची आर्ती ।
करोनी श्रीपति वोवाळित ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.