सुख अणुमात्र नाहीं संसारी – संत निर्मळा अभंग
सुख अणुमात्र नाहीं संसारी ।
सदां हावभारी रात्रंदिवस ॥१॥
न घडे न घडे नामाचें चिंतन ।
संताचेम पूजन न घडेचि ॥२॥
न बैसे मन एके ठायीं निश्चळ ।
सदा तळमळ अहोरात्र ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुजाणा ।
पंढरीचा राणा जीवीं घरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.