रात्रंदिवस मन करी तळमळ – संत निर्मळा अभंग
रात्रंदिवस मन करी तळमळ ।
बहु हळ हळ वाटे जीवा ॥१॥
काय करूं आतां पाउलें न दिसती ।
पडिलीसे गुंती न सुटे गळे ॥२॥
बहु हा उबग आला संसाराचा ।
तोडा फांसा याचा मायबापा ॥३॥
निर्मळा म्हणे आतां दुजेपण ।
चोखियाची आण तुम्हां असे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.