न होई पांगिला संसाराचे ठायीं – संत निर्मळा अभंग
न होई पांगिला संसाराचे ठायीं ।
आणिक प्रवाहीं पाडूं नको ॥१॥
चित्त शुद्ध करि मन शुद्ध करी ।
वाचे हरि हरि जप सदा ॥२॥
या परतें साधन आन नाहीं दुजें ।
हेंचि केशवराजे सांगितलें ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुंजाणा ।
अनुभवीं खुणा मना तूंचि ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.