कां हो पांडुरंगा मज मोकलिलें – संत निर्मळा अभंग
कां हो पांडुरंगा मज मोकलिलें ।
पराधीन केलें जिणें माझें ॥१॥
किती हे जाचणी संसार घसणी ।
करिती दाटणी काम क्रोध ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ ।
लाविलासे चाळा येणे मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना ।
येऊं द्या करुणा देवराया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.