संत निर्मळा अभंग

चहूंकडे देवा दाटला वणवा – संत निर्मळा अभंग

चहूंडे देवा दाटला वणवा – संत निर्मळा अभंग


चहूंकडे देवा दाटला वणवा ।
कां न ये कनवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे अंगी ।
सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ ।
लाविलासे चाळा येणें मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना ।
येऊं द्या करूणा देवराया ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चहूंकडे देवा दाटला वणवा – संत निर्मळा अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *