आजिवरी तुम्हीं तयासीं पाळिलें – संत निर्मळा अभंग
आजिवरी तुम्हीं तयासीं पाळिलें ।
अपराध साहिले चोखियाचे ॥१॥
तयाचिया पाठी आमुचा कंटाळा ।
आला कां दयाळा सांगा मज ॥२॥
हीन दीन मी पातकांची राशी ।
शरण पायांसी जीवें भावें ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो दयाळ ।
म्हणोनी सांभाळ करा माझा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.