जाणोनियां मनींचा हेत – संत निळोबाराय अभंग – ७८३
जाणोनियां मनींचा हेत ।
केलें सनाथ मजलागीं ॥१॥
कृपावंत संत सद्गुरु ।
भवार्णव तारुं मजलागी ॥२॥
बोलविली आरुषवाणी ।
श्रीहरिच्या गुणीं आपुलिये ॥३॥
निळा म्हणे नवलचि केलें ।
अंकिता गौरविलें निज अंकीं ॥४॥