जाणीवचि माझी गिळूनि ठेला । नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥ निढळवाणें मज करुनि ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥ ज्ञानासी तो हा वाढोचि नेदी । ग्रासिल्या उपाधी परमार्थिका ॥३॥ निळा म्हणे येणें नेलें आपपर । मोडियेली थार दोहिंकडे ॥४॥