जयाचेनि कृपामृतें । पोखें माझें जीवन भातें ॥१॥ कैसा विसरों मी यासी । एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥ नेणोनियां आपपर । केला माझा अंगिकार ॥३॥ निळा म्हणे शिकवा बोल । बोली बोलणें सुढाळ ॥४॥