जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥ बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥ अंत:करणीं धरिला थारा । आंतु शरीरा बाहेरी हा ॥३॥ निळा म्हणे अवघाचि हरि । आम्हां घरीं दारीं दाटला ॥४॥