जडला जीवीं तो नव्हेचि – संत निळोबाराय अभंग – ७८०
जडला जीवीं तो नव्हेचि परतां ।
चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥
बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें ।
राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥
अंत:करणीं धरिला थारा ।
आंतु शरीरा बाहेरी हा ॥३॥
निळा म्हणे अवघाचि हरि ।
आम्हां घरीं दारीं दाटला ॥४॥