चित्तीं माझें पांडुरंग । बैसला अभंग न ढळेसा ॥१॥ जातां दिवस जातां राती । स्वप्नीं जागृतीं सुषुप्तीं तो ॥२॥ देखतां डोळा ऐकतां कानीं । बोलतां वदनीं तोचि पुढें ॥३॥ निळा म्हणे बुध्दीमन । गेलीं विरोन त्यामाजीं ॥४॥