घांट गर्जे महाव्दारीं । विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥ निळा उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥२॥ इटे उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥३॥ निळा म्हणे आवडी पोटीं । हदय सांठविला संपुष्टीं ॥४॥