गोमटे पाय देखिले दिठीं । समान नेहटी वीटेचिये ॥१॥ तैंचिपासुनी लागला छंद । याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥ कटांवरी कर तुळसीमाळा । चंदनाचा टिळा मुगुट माथा ॥३॥ निळा म्हणे वेढिलें वसन । विदयुल्लतें समान तेज त्याचें ॥४॥